Maharashtra Breaking News LIVE : राजधानी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनामध्ये आग, राज्यपालांसाठी आरक्षित असलेल्या कक्षामध्ये आग

Maharashtra Breaking News LIVE Updates, 26 July 2021: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 26 Jul 2021 11:48 AM
आयआयटीमध्ये प्रवेशासाठी जेईई (अॅडव्हान्स) 2021 ची परीक्षा 3 ऑक्टोबरला होणार

आयआयटीमध्ये प्रवेशासाठी जेईई (अॅडव्हान्स) 2021 ची परीक्षा 3 ऑक्टोबरला होणार, सर्व कोविड-प्रोटोकॉलचे पालन होणार परीक्षा, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची ट्विटरद्वारे माहिती

हिंगोलीत बेवारस वाहनांच्या लिलावाला मोठी गर्दी, विविध पोलीस ठाण्याच्या 198 दुचाकींचा लिलाव 

हिंगोली जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशन अंतर्गत असलेली बेवारस वाहने पोलीस अधीक्षक कार्यालयात जमा करून त्यांचा आज लिलाव आयोजित करण्यात आला होता. तब्बल 198 वाहनं असल्याने कमी दरात आपल्याला वाहन मिळेल, या आशेने या लिलावाला हिंगोली करांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र लिलाव करताना पोलिसांनी या 198 गाड्यांचा एकत्रित लीलाव केला जाणार असल्याचे जाहीर केले. तेव्हा या ठिकाणी जमलेली प्रचंड गर्दी कमी झाली. सध्या लिलाव प्रक्रिया सुरु असून 198 दुचाकींसाठी 2 लाखांच्या वरती बोली बोलणाऱ्यास ही वाहन सुपूर्द करन्यात येणार आहेत. 

चंद्रपुरात भोजनालय चालविणाऱ्या संचालक दाम्पत्याची आत्महत्या

चंद्रपूर : चंद्रपुरात भोजनालय चालविणाऱ्या संचालक दाम्पत्याची आत्महत्या, बल्लारपूर रोड वरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया समोरिल ममता भोजनालयचे मालक होते. चंद्रभान दुबे (60 वर्ष) आणि त्यांची पत्नी मंजू दुबे (50) यांचे मृतदेह भोजनालयात आढळले. लगतच्या टॉवर टेकडी जूनोना रोड बाबुपेठ येथे वास्तव्य होते. गळफास लावलेल्या अवस्थेत दोघांचे भोजनालयात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. तेसच मृतदेह कुजलेल्या स्थितीवरून ही आत्महत्या 3 ते 4 दिवसांपूर्वीची असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळालेलं नाही. शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.

नाशकात भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

नाशिक : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दौरा आटोपत ना आटोपतो तोच भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. भाजपमधील कट्टपा कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. कोणाचेही नाव न घेता  माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्यांकडे रोख करणारे होर्डिंग लावण्यास सुरुवात झाली आहे.


नाशिकरोड प्रभाग सभापती निवडणुकीत दोन नगरसेवक  गैरहजर राहिल्याने मीरा हांडगे यांचा पराभव झाला आणि शिवसेनेचे प्रशांत दिवे विजयी झाले, निवडणुकीची जबाबदारी माजी आमदार प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप याच्यावर सोपवण्यात आली होती. त्यांच्या सांगण्यावरून नगरसेवक गैरहजर राहिल्याचा दावा करत भाजपशी गद्दारी करणाऱ्या, पाठीत खंजीर खुपसणाऱ्याची लवकर हकालपट्टी करा या आशयाचे होर्डिंग्ज लावायला सुरुवात झाली आहे. वादग्रस्त होर्डिंगमुळे भाजापत खळबळ उडालीय. पक्षात खूप लोक नाराज आहेत. पण बोलण्याची हिम्मत कोणी करत नाही असा दावा,  मीरा हांडगे यांचा मुलगा युवा मोर्चा माजी सरचिटणीस सचिन हांडगे यांनी केला आहे. 
राजधानी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनामध्ये आग, राज्यपालांसाठी आरक्षित असलेल्या कक्षामध्ये आग

राजधानी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनामध्ये आग, राज्यपालांसाठी आरक्षित असलेल्या कक्षामध्ये आग

महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे निधन

रायगड  : महाड येथील माजी आमदार माणिकराव जगताप यांचे निधन.. 


काँगेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे मुबई येथील रुग्णालयात मृत्यू... 


 मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना माणिकराव जगताप यांचा मृत्यू... 


माणिकराव जगताप हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष होते ... 


गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते..

पार्श्वभूमी

Jalgaon : धक्कादायक... जळगावात क्षुल्लक कारणावरुन उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार


क्षुल्लक कारणावरुन जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार कण्यात आला. या हल्ल्यातून कुलभूषण पाटील थोडक्यात बचावले. या घटनेमुळे परिसरात भितीचं वातावरण पाहायला मिळत आहे. क्रिकेट खेळण्यावरुन दोन गटांत हाणामारी झाली होती. त्यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. याच रागातून राजपूत गटाच्या चार जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. सुदैवाने या गोळीबारात कुलभाषण पाटील हे स्वतःचा बचाव करण्यात यशस्वी झाल्यानं, मोठा अनर्थ टळला. ही घटना कुलभूषण पाटील यांच्या राहत्या घराजवळ म्हणजेच, पिंपराला येथील मयूर कॉलनी परिसरात घडली.  


रविवारी दुपारी खोटेनगर परिसराजवळ असलेल्या मैदानावर नितीन राजपूत आणि महेंद्र राजपूत या दोघांमध्ये क्रिकेट खेळण्यावरून जोरदार वाद उफाळून आला. हा वाद सोडवण्यासाठी दुपारच्या सुमारास उपमहापौर कुलभाषण पाटील गेले होते. त्यावेळी या दोघांतील वाद मिटविण्यास कुलभूषण पाटील यांना यश मिळालं खरं, पण पुन्हा दोन तासांनी मात्र एका इनोव्हातून आलेल्या चार जणांनी रस्त्यावरच कुलभूषण पाटील यांना अडवून भांडणात मध्यस्थी का केली? अशी विचारणा केली. तसेच कुलभूषण पाटील यांना मारहाण करण्याचा प्रयत्नही केला. यावेळी गाडीतील एकानं सोबत आणलेल्या बंदुकीतून  कुलभूषण यांच्यावर गोळीबार केला. मात्र नेम चुकल्याने ते बचावले. यावेळी कुलभूषण यांनी आपल्या राहत्या घराच्या मागे पळ काढून आपला बचाव केला. गाडीतून आलेल्या तिघांनी ते घरात घुसले असतील अशी शक्यता पाहता त्यांच्या घरावरही तीन राउंड फायर करून पलायन केलं, अशी माहिती प्रत्यक्ष दर्शींनी दिली आहे.  


Maharashtra Landslide : रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यात दरड कोसळून 89 जणांचा मृत्यू, 34 बेपत्ता; NDRF ची माहिती


राज्यात आठवडाभर सुरु असलेला पावसाने हजारो घरं उद्ध्वस्त केली. रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगली येथे पूरपरिस्थिती आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटनाही घडल्या आहे. या दरडींखाली अनेक निष्पाप जीव गेले आहेत. NDRF ने जारी केलेल्या आकडेवारी नुसार रायगड, रत्नागिरी, सातारा या तीन जिल्ह्यात एकूण सहा ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना समोर आल्यात.


या घटनांमध्ये एकूण 89 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच 34 अद्यापही बेपत्ता आहेत. म्हणजेत मृतांची संख्या वाढण्याची भीती याठिकाणी व्यक्त होत आहे. कारण दोन दिवसांहून अधिकचा वेळ झाला असून येथील बचावकार्य अद्यापही सुरुच आहे. मुसळधार कोसळणारा पाऊस, खचलेले रस्ते, उन्मळून पडलेली झाडे यामुळे एनडीआरएफ आणि इतर यंत्रणांना इथे पोहोचण्यास उशीर झाला. बचावकार्यासाठी लागणारी यंत्रसामुग्रीही अनेक अडथळ्यांमुळे येथे वेळेत पोहोचू शकली नाही.


IPL 2021, MI vs CSK : IPL 21 पुन्हा 19 सप्टेंबरपासून सुरु होणार, मुंबई-चेन्नईत होणार पहिला सामना


इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2021 चं 14 वं सत्र पुन्हा एकदा सुरू होणार आहे. आयपीएल 2021 च्या बायो बबलमध्ये कोरोनाने प्रवेश केल्यामुळे आयपीएल मधेच थांबवली गेली होती. पण आता आयपीएल लीग पुन्हा एकदा 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.


पहिला सामना मुंबई आणि चेन्नईत


आयपीएल 2021 च्या दुसर्‍या टप्प्यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाईल. 14 व्या मोसमातील उर्वरित 31 सामने दुबई, अबू धाबी आणि शारजाह येथे खेळवले जाणारा आहेत, असं सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचा अंतिम सामना 15 ऑक्टोबरला दुबईमध्ये खेळला जाईल.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.