Breaking News LIVE : आयसीएसई दहावी आणि आयएससी बारावी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार
Breaking News LIVE Updates, 23 July 2021: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
नागपूर : कोरोनाच्या काळात रेमडेसिवीरचा काळा बाजारात करणाऱ्यास तीन वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा, रेमडेसिवीरच्या काळाबाजारीमध्ये सुमारे 80 दिवसात निकाल देत शिक्षेस पात्र ठरलेले पहिलेच प्रकरण, या प्रकरणात आरोपी वार्ड बॉय महेंद्र रंगारी हा इंजेक्शन चोरताना सीसीटीव्ही कैद झाला असून पोलिसांनी सुद्धा इंजेक्शन हस्तगत केले होते, यात रेमडेसिवीर प्रकरणाचा निकाल लवकर लावण्याचे जाहीर केले असून जलदगतीने हा निकाल देण्यात आला, या प्रकरणात आरोपीला अपील करण्यासाठी अर्ज करत जमीन मागितल्याने आरोपीला पुढील जामीन सुद्धा मंजूर करण्यात आला आहे
आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षा आणि आयएससी बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या दुपारी 3 वाजता जाहीर होणार आहे.
विद्यार्थ्यांना बोर्डाच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.
इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
अंनिस पाठोपाठ सरकारी पक्षाच्या वतीनं उच्च न्यायालयात याचिका, संगमनेरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहेय
पुत्रप्राप्ती संदर्भात वादग्रस्त विधानाविरोधात याचिका दाखल. अंनिस ने यापूर्वी केली होती याचिका दाखल केली होती. काल सरकारी पक्षाच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
पार्श्वभूमी
Guru Purnima 2021 : गुरु: साक्षात् परब्रह्म! जाणून घ्या का साजरी केली जाते गुरुपौर्णिमा
भारतीयांच्या जीवनात गुरुचे स्थान हे सर्वोच्च असल्याचं समजलं जातं. एखाद्या मातीच्या गोळ्याला आकार द्यावा अशा पद्धतीने गुरु आपल्या विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे गुरुचे आभार मानण्यासाठी म्हणून भारतात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते. महाभारत या महाकाव्याचे निर्माते असलेल्या व्यास ऋषींच्या कार्याच्या स्मरणात भारतात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. गुरुपौर्णिमाचा संदर्भ हा प्राचीन भारताच्या इतिहासात सापडतो. आपल्या भारतात गुरु-शिष्य परंपरेला खूप मोठी परंपरा आहे. पुराणशास्त्राच्या दाखल्यानुसार, महाभारत या महाकाव्याचे निर्माता व्यास ऋषींनी आषाढी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या शिष्यांना आणि इतर ऋषींना वेद आणि पुराणांचे ज्ञान दिलं होतं. याच दिवसाचे स्मरण म्हणून गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.
राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मात्र कोकणात पावसामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. रत्नागिरी जिह्यातील चिपळूण आणि खेडमध्ये परिस्थिती बिकट आहे. कोकणातील याच परिस्थितीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतला, स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून कोकणातील पूर परीस्थितीची माहिती घेतली. तसेच केंद्र सरकारकडून सर्व मदत करण्याचेही आश्वासन दिले आहे.
पूर परिस्थितीसंदर्भात पंतप्रधान- मुख्यमंत्री यांची चर्चा
राज्यातील पूर परिस्थितीसंदर्भात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना राज्य शासनामार्फत बचाव कार्य कसे सुरू आहे त्याचप्रमाणे कुठल्या उपाययोजना केल्या जात आहेत त्याची माहिती दिली. बचाव आणि मदत कार्यात केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी मदत करेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
राज्यात अकरावी प्रवेशाची परीक्षा जर एसएससी अभ्यासक्रमाच्या धर्तीवर होणार असेल तर ही परीक्षा देणाऱ्या सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी सीईटीचा स्वतंत्र अभ्यासक्रम करता येईल का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारकडे केली आहे. अथवा केवळ 'सीईटी' देणाऱ्याच विद्यार्थ्यांना प्रवेशात प्राधान्य दिलं जाईल ही अट शिथिल करणार का? यावर राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत.
राज्य सरकारनं अकरावी प्रवेशाबाबत 28 मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकाला स्थगिती देण्याची मागणी करत अनन्या पत्की या विद्यार्थिनीनं ही याचिका आपले वडील योगेश पत्की यांच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर गुरूवारी न्यायमूर्ती आर. डी. धानुका आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. 28 मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, राज्य सरकारनं दहावीची परीक्षा रद्द झाल्यानं अकरावी प्रवेशासाठी कॉमन एंट्रन्स टेस्ट (सीईटी) घेणार असल्याचं जाहीर केलं. दहावीचं मुल्यांकन कसं केलं जाईल याचा फॉर्म्युलाही जाहीर करण्यात आलाय. मात्र तरीही साल 2020-21 च्या शैक्षणिक वर्षावर आधारीत अंतर्गत मुल्यांकनावर असमाधानी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन सीईटी घेतली जाईल आणि सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य दिलं जाईल, असंही या परिपत्रकात म्हटलेलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -