- मुख्यपृष्ठ
-
बातम्या
-
महाराष्ट्र
Breaking News LIVE | पुण्यातील कात्रजच्या नवीन बोगद्याच्या वरती असलेल्या टेकडीवरील झाडा झुडपांना मोठ्या प्रमाणात आग लागलीय
Breaking News LIVE | पुण्यातील कात्रजच्या नवीन बोगद्याच्या वरती असलेल्या टेकडीवरील झाडा झुडपांना मोठ्या प्रमाणात आग लागलीय
दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
10 Feb 2021 10:48 PM
विरार पोलिसांनी बुधवारी एका 8 महिन्यांच्या मुलीला 2 लाखांत विकण्यासाठी आलेल्या चार आरोपींना अटक करून, मुलीची सुखरूप सुटका केली आहे. यात दोन महिला आणि दोन पुरुष आहेत. यातील एक इसम हा डॉक्टर असल्याची माहिती पोलिसांनी दिलीच आहे. या चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्या चौघांना 16 फेब्रुवारीपर्यंत यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सांगलीत 8 सराफा व्यावसायिकांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल. आर्थिक व्यवहारात या लोकांनी फसवणूक केल्याने 82 वर्षीय हरिश्चंद्र खेडेकर यांनी रविवारी केली होती आत्महत्या. खेडेकर यांनी आत्महत्या पूर्वी लिहलेल्या चिट्ठीत या सराफांनी आर्थिक फसवणूक, पैशासाठी मानसिक त्रास दिल्याचा केला होता उल्लेख. आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि सावकारी कायदा,असे गुन्हे या सराफावर सांगली शहर पोलीस ठाण्यात दाखल
पुण्यातील कात्रजच्या नवीन बोगद्याच्या वरती असलेल्या टेकडीवरील झाडा झुडपांना मोठ्या प्रमाणात आग लागलीय. कात्रजच्या टेकडीला लागलेली ही आग नसल्यामुळे लागलेली असावी अशी शक्यता आहे. कात्रजच्या नवीन बोगद्यापासुन ही आग जुन्या बोगद्याच्या दिशेने वाढत चाललीय. या टेकडीवर काही हॉटेल्स असुन त्या हॉटेल्समधील सर्वांना सुरक्षितपणे खाली आनण्यात आलंय.
गेल्या दहा महिन्यांत वीजेचे एकही बील न भरणाऱ्या ग्राहकांना बसणार शॉक, पश्चिम महाराष्ट्रातील 14 लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होणार, प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले निर्देश, वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई पुढील तीन आठवड्यात होणार, आवश्यकता असल्यास हफ्ते करुन घ्या मात्र बिलं भरा, महावितरणचे आवाहन
भाजप नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी घेतले ताब्यात. सोमय्यांसह भाजपाचे जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, अलिबाग तालुकाध्यक्ष परशुराम म्हात्रे व इतर कार्यकर्त्यांना घेतले पोलिसांनी ताब्यात. सर्वांना अलिबाग पोलीस ठाण्यात नेण्यात आले.. गेल्या आठ तासांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू होते ठिय्या आंदोलन.
जालना येथे 2015 साली जप्त केलेली बनावट दारू आणि स्पिरिट पोलिसांकडून नष्ट करण्यात आलं, जालना शहरातील सदर बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीत जप्त केलेले 13 लाख रुपयांचे 200 लीटर स्पिरिट आणि बनावट देशी दारूचे 20 बॉक्स नष्ट करण्यात आले. ज्वलनशील पदार्थ असल्याने पोलिसांनी कोर्टात हा मुद्देमाल नष्ट करण्याची परवानगी मागितली. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क आणि सदर बाजार पोलिसांनी या जप्त मालाची व्हिलेवाट लावली.
मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे प्रभावित झालेल्या ऊर्जा विभागाच्या भरती मधील एसईबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे.
डॉन अरुण गवळीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या तो नागपूर कारागृहात कैद आहे. त्याच्या शिवाय आणखी 4 कैद्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सर्वांना स्वतंत्र सेलमध्ये एक एकटे ठेऊन उपचार सुरू आहेत.
साताऱ्यात सहा शिवशाही बसला आग, बस डेपोमध्ये पार्क असलेल्या बस आगीच्या भक्ष्यस्थानी, पहिली बस पेटवणारा पोलिसांच्या ताब्यात, आग का लावली याचं कारण अस्पष्ट
कोल्हापूर : महिलेच्या खून प्रकरणी अवघ्या तीन तासांत छडा. देवकार्य करण्याच्या बहाण्याने सोने लुटण्यासाठी आरोपीने महिलेची हत्या. शांताबाई शामराव आगळे वय 80 असं मृत महिलेचं नाव. संतोष परिटला राजारामपुरी पोलिसांनी केली अटक.
भारत-चीन सीमेवरुन मोठी बातमी, लडाख सीमेववरुन सैन्य मागे घेण्यास भारत आणि चीनची सहमती, चर्चेच्या नवव्या फेरीत परस्पर सहमतीने सैन्य मागे घेण्याचा निर्णय : सूत्र
माझ्या भाषणांमध्ये अडथळे निर्माण करणे हे एक सुनियोजित षडयंत्र : पंतप्रधान नरेंद्र मोदी
चंद्रपूर : अवघ्या 7 मिनिटांच्या फरकाने हुकले सरपंच पद. गोंडपिपरी तालुक्यातील तारडा गावातील प्रकार, 7 सदस्यीय ग्रामपंचायतीत बहुमत असलेला 4 सदस्यीय गट गेला होता सहलीला. मात्र, सरपंच आणि उपसरपंच पदाचा अर्ज दाखल करण्यासाठी ते ग्रामपंचायतीत 7 मिनिट उशिरा पोहचले. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज भरू दिला नाही आणि 3 सदस्य असलेल्या शिवसेना समर्थित गटाला मिळाले सरपंच आणि उपसरपंच पद.
PM Modi LIVE | मोदींच्या भाषणादरम्यान काँग्रेसच्या काही खासदारांचा सभात्याग
काँग्रेसवाल्यांनी कृषी कायद्याच्या कलरपेक्षा कन्टेन्टवर चर्चा करणं जास्त गरजेचं होतं : पंतप्रधान नरेंद्र मोदी
ही तर देवाचीच कृपा की आपला देश सुरक्षित राहिला; कारण देवाच्या रुपात डॉक्टर, सुरक्षादूत धावून आले : पंतप्रधान नरेंद्र मोदी
रायगड : किरीट सोमय्या यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरूच. गेल्या चार तासांपासून रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या कोर्लई येथील जमीन व्यवहाराच्या चौकशीची मागणी.
कोरोनाचा कालखंड हा भारतासाठी टर्निंग पॉईंट, कोरोना काळात देशाने स्वत:ला तर सावरलंच पण इतर देशांनाही मदत केली : पंतप्रधान नरेंद्र मोदी
भारत हे एकसंघ राष्ट्र होणार नाही, हा समज भारतवासियांनी मोडून काढला : पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोनाचा कालखंड हा भारतासाठी टर्निंग पॉईंट, कोरोना काळात देशाने स्वत:ला तर सावरलंच पण इतर देशांनाही मदत केली : पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशभक्तीला प्रोत्साहन देणाऱ्या भाषणासाठी देशवासियांच्या वतीने राष्ट्रपतींचे आभार : पंतप्रधान नरेंद्र मोदी
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संबोधन
बीड जिल्ह्याच्या जिव्हाळ्याच्या विषय असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने वार्षिक अर्थसंकल्पात ५२७ कोटी ६३ लाख ८८ हजार रुपयांची तरतूद केली आहे.रेल्वे मार्गासाठी हा निधी मंजूर केल्यामुळे प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे.यासंदर्भात खा.डॉ.प्रितम मुंडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन आभार मानले आहेत.त्यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात निधीची रेल्वेमार्गाच्या कामासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. असे प्रीतम मुंडे यांच्याकडून सांगण्यात आले
शिवसैनिक माजी सरपंच रमेश शेळके हत्या प्रकरणात पोलिसांकडून सख्ख्या मोठ्या भावाला आणि त्याच्या एका मुलाला अटक. सुपारी देऊन हत्या केल्याचा संशय. आरोपी भाऊ रामप्रसादने सह आरोपी अर्जुन दंडाईतला सुपारी दिल्याचा संशय.
भिवंडी तालुक्यातील बापगाव देवरुंग ग्रामपंचायतीवर सेनेचे वर्चस्व कायम ठेवले आहे . ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात नुकताच निवडुन आलेले पती पत्नी झाले सरपंच- उपसरपंच. पत्नी भारती बाळाराम गोडे सरपंचपदी तर, पती बाळाराम दिनकर गोडे यांची उप सरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे. विजय संपादन केल्यानंतर त्यांच्या समर्थकांकडुन गुलाल फटाक्यांच्या आतिषबाजी करत जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला व गावात बँडबाजा सह मिरवणूक देखील काढण्यात आली .
पारनेर तालुक्यातील किन्ही गावात कोरड्या विहिरीत बिबट्या पडला. शिकारीच्या शोधात धावत असताना अंदाज न आल्याने बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल. बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू....
ऊर्जा विभागातील भरतीचा मार्ग मोकळा. ECBC वर्गातील उमेदवारांना आता EWS चा लाभ मिळणार. ऊर्जा विभागाने काढले परिपत्रक.
लग्न म्हणाले की बस्ता आला आणि नवरा नवरीचे खास पोषाखही मुख्य आकर्षण असते. 16 फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीला होणाऱ्या देवाच्या विवाहाला बंगळुरुच्या व्यवसायाने फॅशन डिझायनर असलेल्या सविता चौधरी यांनी पेहराव बनवला आहे. विठुराया व रुक्मिणी मातेच्या विवाह पेहरवाची डिझाइन त्यांनी केली आहे. विठुरायाच्या बाराबंदीच्या अंगीवर शंख, चक्र व ओम या खुणा रंगीत मणी आणि मोत्याच्या साहाय्याने अतिशय आकर्षक पद्धतीने बनविल्या आहेत. तर रुक्मिणी मातेलाही पांढऱ्या शुभ्र उच्च प्रतीची रेशमी कांजीवरम साडी अर्पण केली आहे . सविता चौधरी यांनी बेंगळुरुमध्ये आपला फॅशन डिझायनिंगचा व्यवसाय सुरु केल्यावर पहिला पेहराव देवाचा बनवला आहे. वसंत पंचमी ते रंगपंचमी हा विठुरायाच्या विवाह सोहळ्याच्या कालावधीत देवाला व रुक्मिणी मातेला पांढरी वस्त्रे परिधान केली जात असतात यंदा कोरोनामुळे मात्र हा विवाहसोहळा केवळ मोजक्या मंडळींच्या उपस्थतीत साजरा होत असल्याने यंदा वऱ्हाडी मंडळींच्या संख्येला ब्रेक लागला आहे .
मावळ,पुणे- पुणे जिल्ह्यातील मावळ मधील टाकवे गावात नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या नावाने जादूटोणा,
सरपंच,उपसरपंच पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळमध्ये अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार समोर,
टाकवे गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अविनाश असवले,भूषण असवले आणि ऋषिनाथ शिंदे यांची नावे लिंबावर लिहून लिंबाला खिळे ठोकून ते खिळे मारलेले तीन लिंबू इंद्रायणी नदीतील पिंपळाच्या झाडाला ठोकण्यात आले होते ,
ग्रामपंचायत सदस्यांची नावे लिंबावर लिहून त्यात खिळे मारून लिंबू झाडाला ठोकून भीती पसरवण्याचा प्रयत्न,
वर्सोवा येथे यारी रोड वर सिलेंडरच्या गोदमाला आग लागून चार जण जखमी झाले आहेत.या प्रकरणी स्थानिकांनी हे सर्व अनधिकृतपणे सुरू असल्याचा आरोप केला आहे.घटनास्थळी स्थानिक आमदार भारती लव्हेकर पाहणीसाठी आल्या आहेत. या ठिकाणी जर अनधिकृत असे काही असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. माझ्याकडे अशा प्रकारे काही तक्रार आली नव्हती, मात्र ज्या आधी अधिकाऱ्याकडे आली होती आणि त्यांनी कारवाई केली नाही त्यांची चौकशी व्हावी असे आमदार लव्हेकर म्हणाल्या.
कोल्हापूर चित्रनगरीत अद्ययावत सोयीसुविधा पुरवण्यावर भर देण्यात येणार,
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती,
कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाच्या सद्यस्थितीचा अमित देशमुख यांनी घेतला आढावा,
आवश्यक असणारे सेट कायमस्वरूपी उभारणे, कलाकार आणि तंत्रज्ञासाठी वस्तीगृह उभारणे यावर भर देण्यावर चर्चा ,
राजर्षी शाहू महाराज आणि थोर व्यक्तींवर सिनेमा बनवण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग पुढाकार घेणार,
वर्सोवाच्या यारी रोड परिसरातील सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग लागली आहे.
अग्निशामक दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल. आग आटोक्यात आली असून सध्या कुलिंगचं काम सुरु आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ मधील टाकवे गावात नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या नावाने जादूटोणा
-सरपंच,उपसरपंच पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळमध्ये अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार समोर
-टाकवे गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अविनाश असवले,भूषण असवले आणि ऋषिनाथ शिंदे यांची नावे लिंबावर लिहून लिंबाला खिळे ठोकून ते खिळे मारलेले तीन लिंबू इंद्रायणी नदीतील पिंपळाच्या झाडाला ठोकण्यात आले होते
कोल्हापूर - महिलेचा मृतदेह राजाराम तलावात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार
,सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांच्या प्लास्टिक बॅगमध्ये अर्धवट मृतदेह निदर्शनास
,महिलची हत्या करून मृतदेह पाण्यात फेकल्याची प्राथमिक माहिती
,राजारामपुरी पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी जाऊन मृतदेह घेतला ताब्यात
,
शवविच्छेदनसाठी मृतदेह सीपीआर रुग्णालयात आणला
पुण्यातील लोणीकंद गावात सचिन शिंदे नावाच्या सराईत गुन्हेगाराची भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. सचिन शिंदेवर हत्येसह अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. शिक्रापुर आणि रांजणगाव एम आय डी सी भागामध्ये त्याची मागील काही वर्षांपासून दहशत होती. काही दिवसांपूर्वीच तो येरवडा कारागृहातुन जामिनावर बाहेर आला होता. मंगळवारी दुपारी सचिन शिंदे लोणीकंद गावातील मुख्य रस्त्यालगत उभा असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघा मारेकर्यांनी त्याच्यावर गोळीबार करुन पळ काढला. मानेजवळ गोळी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
भिवंडी खाडीपार परिसरात मच्छा कंपाऊंडमध्ये मोती कारखान्याला आग लागली आहे. या आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला आहे. आगीचे कारण अस्पष्ट असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 2 गाड्या दाखल झाल्या आहेत.
जलीकट्टू हा भारतीय चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर. अंतिम 15 चित्रपटांची यादी प्रसिद्ध. 25 एप्रिलला होणार आहेत यंदाचे 93 वे ऑस्कर अवॉर्डस.
याच सोहळ्यात बिट्टू या करिष्मा दुबे दिग्दर्शित शॉर्टफिल्मने प्रिलीमिनरी राउंडमध्ये धडक मारली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकमध्ये दाखल, जिल्हा वार्षिक योजनेचा प्रारूप आराखडा आढावा बैठकीसाठी उपस्थित, उत्तर महाराष्ट्रचा घेणार आढावा. नाशिक जिल्हा आढावा बैठकीला सुरुवात, पालकमंत्री छगन भुजबळ, आमदार आणि इतर अधिकारी उपस्थित,
यानंतर जळगांव, धुळे, नंदुरबारची होणार बैठक,
उत्तर महाराष्ट्रचे सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार
मुंबई : अजॉय मेहता यांची रेरा प्रमुख पदी नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.अजॉय मेहता हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार होते. त्यानंतर आता रेरा प्रमुख पदी नियुक्त होण्याची शक्यता आहे. रेरा प्रमुख पदी संजय कुमार, सतीश गवई हे अधिकारी होते.
बीड : केज येथे एका महाविद्यालयीन तरुणीने घरातील छताच्या पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी केज येथील धारूर रोड लगतच्या भवानी नगर येथे संपत्त चव्हाण यांची मुलगी तेजल संपत चव्हाण वय 19 वर्ष हिने राहत्या घरात छताच्या पंंख्याला साडीने गळफास घेेेऊन आत्महत्त्या केली. तेलजचे आई-वडील हे अहमदनगर येथे काम करीत होते. ती केज येेथे राजूबाई व गणपत चव्हाण या तिच्या आजी-आजोबांकडे रहात होती. तसेच तिचे चुलते हे परळी येथे कंत्राटी पद्धतीने पोस्टात काम करीत असल्याने तिने घरी कोणी नसताना चुलते विठ्ठल चव्हाण यांच्या घरातील छताच्या पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तेजल ही अंबाजोगाई येथील मराठवाडा महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. तिचे माजलगाव तालुक्यातील वानटाकळी येथील नात्यातील तरुणाशी लग्न ठरले होते. केज पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील व्यंकटेश लॉन्स येथे सुरू असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दोन गटांमध्ये तुफान वाद झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांचे कार्यकर्ते भुषण पाटील हे भाषण करीत असताना जिल्हा परिषदेचे माजी सभापती किरण पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी वाद घातल्याने अनिल गोटे आणि किरण पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समोरच वाद सुरू झाला. दरम्यान या वादामुळे धुळे शहरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दोन गट पडल्याचे चित्र पाहायला मिळाले
भिवंडी : भिवंडीच्या कोलीवली गावात जमिनीच्या वादातून दोन गटात तुफान राडा पाहायला मिळाला. कब्जेधारक द्वारकानाथ माळी आणि जमीन मालक मल्हार टावरे यांच्यात मागील काही वर्षांपासून जमिनी वरून वाद सुरू आहे. आणि हाच वाद आज उफाळून आलाय. एका चार चाकी गाडी मध्ये तलवार घेऊन पंधरा ते वीस जणांच्या टोळक्याने सदरील हल्ला केला आहे. या हल्ल्यात शेती देखील पेटवण्यात आली असून यातील तूर, मूग आणि वरवा या पालेभाज्यांचे पीक पेटवून देण्यात आलं आहे. दिवसा ढवळ्या घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या राड्याची माहिती पोलिसांना मिळताच भिवंडी तालुका पोलिसांनी तिघा जणांना ताब्यात घेतल आहे.
बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरुच आहे. रस्त्यावर खेळणाऱ्या आणखी चार बालकांवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला. आज दुपारी चारच्या सुमारास करवंड इथे ही घडली. या जखमी बालकांवर सामान्य रुग्णालय येथे सध्या उपचार सुरु आहेत. कुत्र्याने निशा सागर गवई (5 वर्ष), शेख असद शेख अन्वर (9 वर्ष), पूर्वा सुनील फाटे (11 वर्ष) आणि कार्तिक समाधान तारगे (वय 6 वर्ष) या मुलांचा चावा घेऊन त्यांना जखमी केलं. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी पिसाळलेल्या कुत्र्याला ठार केलं. दरम्यान या कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांकडून होत आहे.
करवंड येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात अजुन चार बालक जख्मी. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु. रस्त्यावर खेळणाऱ्या अजुन 4 बालकावर हल्ला करून एका पिसाळलेल्या कुत्र्याने जखमी केले ही घटना आज 9 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास ग्राम करवंड येथे घडली आहे. या जखमी बालकांवर सामान्य रुग्णालय येथे सध्या उपचार सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरूच आहे.
पुण्याच्या वानवडीत 22 वर्षीय तरुणी पूजा चव्हाणने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केलीये. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी आता स्थानिक भाजपकडून केली जातीये. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून तिने उडी घेतली होती. मूळची बीडच्या परळीची असणारी पूजा पुण्यात गेल्याच महिन्यात आली होती. सध्या ती चुलत भाऊ आणि एका मित्रासोबत राहत होती. बीएचं शिक्षण पूर्ण झालं होतं, इथं ती स्पोकन इंग्लिशच्या कोर्ससाठी आली होती. पण पुण्यात येऊन दोन आठवडे होण्यापूर्वीच तिने हे टोकाचं पाऊल उचललं होतं. मात्र यामागचं कारण अद्याप ही अस्पष्ट आहे. म्हणूनच आता तिने ही आत्महत्या नेमकी का केली याची चौकशी करण्याची मागणी स्थानिक भाजप कडून केली जातीये.
नांदेड:दारू दुकान हटवा मगच सरपंच उपसरपंच निवडा, धर्माबाद तालुक्यातील नायगाव धरण येथील संतप्त रंरागिनींचे ग्रामपंचायत समोर ठिय्या आंदोलन.
येऊ घातलेल्या माघ महिन्यातील गणेश जयंती, गणेशोत्सवासाठी राज्य शासनाकडून मार्गदर्शन सूचना जारी. मंडप, सजावट, मिरवणुका अनेक गोष्टींवर निर्बंध
सिंधुदुर्ग : खासदार नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा सुरु असताना शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी टोला लगावला. एवढ्या मोठ्या भारत देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंसारख्या एका नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर ते सिंधुदुर्गाचं दुर्दैव असेल, अशी बोचरी टीका विनायक राऊतांनी केली. बुडत्याला काडीचा आधार, असा टोलाही राऊतांनी लगावला.
भाईंदर : मीरा भाईंदर मध्ये मेट्रोच्या कामामुळे दुचाकी स्वारांचा जीव धोक्यात आला आहे. आतापर्यंत 8 दुचाकीस्वार घसरून पडल्याची घटना उजेडात आली आहे.
गोल्डन नेस्ट पोलीस स्टेशनपासून ते काशिमीरा परिसरापर्यंत मोठ्या प्रमाणात मेट्रोच्या कामा करता पत्रे लावण्यात आले आहेत. मेट्रोचे पिलर उभरण्या करता मोठ्या प्रमाणात रस्ता खोदुन पिलर उभारले जातात. मात्र खोदकामा दरम्यान पायलिंगचे पाणी बाहेर रस्त्यावर सोडले जाते. सोमवारी सकाळी 10 च्या सुमारास धर्मकाटा समोर मेट्रोचे काम सुरु असताना माती बाहेर पडल्याने रस्त्यावर सर्वत्र चिखल झाला आणि पाणी तसच पडून राहिल्याने त्यात अनेक दुचाकीस्वार घसरून जखमी झाल्याची घटना घडली आहे.
भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या जातीच्या दाखला प्रकरणी एकास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती. खासदारांचा बनावट जातीचा दाखला तयार केल्याच्या संशयावरून शिवसिद्ध बुळा यास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती. सोलापूर जात वैधता पडताळणी समितीने खासदारांचा जातीचा दाखला ठरवला होता अवैध. जिल्हा जात वैधता पडताळणी समितीने अक्कलकोट तहसीलदारांना बोगस दाखला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याचे दिले होते आदेश. याच प्रकरणी शिवसिध्द बुळा याचा बनावट दाखला तयार करण्यात हात असल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती. सोलापूर शहर गुन्हे शाखेने बुळा यास ताब्यात घेतल्याची पोलीस सूत्रांची माहिती.
सोलापूर : भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या जातीच्या दाखला प्रकरणी एकास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. खासदारांचा बनावट जातीचा दाखला तयार केल्याच्या संशयावरून शिवसिद्ध बुळा यास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोलापूर जात वैधता पडताळणी समितीने खासदारांचा जातीचा दाखला अवैध ठरवला होता. जिल्हा जात वैधता पडताळणी समितीने अक्कलकोट तहसीलदारांना बोगस दाखला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. याच प्रकरणी शिवसिध्द बुळा याचा बनावट दाखला तयार करण्यात हाथ असल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. सोलापूर शहर गुन्हे शाखेने बुळा यास ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
पाकिस्तानाहून भारतात परतलेल्या 65 वर्षीय हसीना दिलशाद अहमद यांचं निधन झालं. लाहोर तुरुंगात 18 वर्षे राहिलेल्या औरंगाबादच्या हसीना दिलशाद अहमद यांची नुकतीच सुटका झाली होती. त्यानंतर त्या तब्बल 18 वर्षानंतर 26 जानेवारीला औरंगाबादमध्ये आपल्या घरी परतल्या होत्या. पासपोर्ट चोरी गेलेल्या हसीना यांना पाकिस्तान पोलिसांनी हेर समजून अटक केली होती. आज त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.
जालना शहरापासून तीन किलोमीटर अंतरावरील मंठा रोडवरच्या जंगलात आज एका महिलेचा मृतदेह आढळून आला. दुपारच्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या माहितीवरुन घटनास्थळी गेल्यावर ही बाब निदर्शनास आली. मयत महिलेच्या अंगावर आणि डोक्यावर वार झालेले होते. प्रथमदर्शनी हा खून झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणी तालुका पोलीस सखोल तपास करत आहेत.
दौंड तालुक्यातील खडकी गावातील 21 वर्षीय तरुणी सरपंच पदी विराजमान
,
स्नेहल काळभोर यांची बिनविरोध सरपंच पदी निवड
,
स्नेहल काळभोर या उच्च शिक्षित आहेत
,
सर्वात कमी वयाच्या सरपंच पदी विराजमान
,
भाजप पुरस्कृत पॅनेलच्या स्नेहल काळभोर सरपंचपदी विराजमान,
नाशिकच्या भद्रकाली परिसरात काल रात्री गुंडांचा हैदोस, तड़ीपार गुंडाने टोळक्यासह धारदार शस्त्राने हल्ला करत तरुणाची केली हत्या, आकाश रजवे असे मयताचे नाव, हत्या करत तड़ीपार गुंड विशाल बैनवाल फरार
महाराष्ट्र काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष नाना पटोले आणि त्यांच्या पाठोपाठ महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत दिल्लीतील सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.. सोनिया गांधी यांची ते भेट घेणार आहेत
महाराष्ट्र काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष नाना पटोले आणि त्यांच्या पाठोपाठ महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत दिल्लीतील सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.. सोनिया गांधी यांची ते भेट घेणार आहेत
पंचगंगा नदीच्या प्रदूषणामुळे शिरोळ बंधाऱ्यावर लाखो मासे मृत
,
गेल्या दोन महिन्यातील ही दुसरी घटना
,
तेरवाड बंधाऱ्यावर देखील लाखो मासे पडले होते मृत
ट्रॅक्टर मोर्चातल्या आंदोलनातील आरोपी दीप सिद्धूला अटक करण्यात आली आहे. गुन्हा नोंदवल्यानंतर दीप सिद्धू जवळपास 14 दिवस बेपत्ता होता. पंजाबी अभिनेता आणि गायक अशी देखील दीपसिद्धूची ओळख आहे.
तपोवनमध्ये एनटीपीसीच्या वीज प्रकल्पाच्या बोगद्यात दोन दिवसानंतरही मदत कार्य सुरूच आहे.अडीच किलोमीटर लांब हा बोगदा प्रलयामुळे दोन्ही बाजूंनी बंद झाला आहे. त्यापैकी आत्ता केवळ पाचशे मीटर पर्यंत खोदकाम झाले आहे.
जामखेडचे जगन्नाथ राळेभात जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध होणार...
राळेभात माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे खंदे समर्थक...
मात्र राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यामुळे बिनविरोध निवड होणार...
सुजय विखे आणि रोहित पवारांच्या ऐनवेळी छुप्या युती मुळी माजी मंत्री राम शिंदे बॅकफूटला....
राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले यांचा निवडणूक अर्ज मागे...
मालवण : हडी मार्गावरील कांदळगाव राणेवाडी येथील उताराच्या रस्त्यावर मोटारसायकल व बोलेरो पीक अप गाडी यांच्यात झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. मोटारसायकल - बोलेरो यांच्यात समोरासमोर धडक बसल्याने या अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही.
2 दिवसांचा ब्रेक घेऊन आज परत इंधन दरवाढ झाली आहे. पेट्रोल 34 पैशांनी वाढले असून डिझेलचे देखील 36 पैशांनी महाग झाले आहे. परभणीत पेट्रोलचे दर 95.97 रूपये आणि डिझेल 85.14 रूपये आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा परिणाम म्हणून गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चांगलाच घसरत असल्याच चित्र बघायला मिळते आहे. नाशिकसह निफाडमध्ये काल यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली असून निफाडला 6 तर नाशिकमध्ये 9.2 अंशापर्यंत पारा घसरलाय, आ
मुंबई विद्यापीठात नव्याने स्थापन होत असलेले सेंटर फॉर एक्सलेंस इन मेरिटाईम स्टडीज हे सागरी अध्ययन केंद्र आजच्या आणि भविष्यकालीन गरजा ओळखून, उत्कृष्ट दर्जाचे संशोधन करून कुशल मनुष्य बळ तयार करणारे जागतिक दर्जाचे केंद्र व्हावे असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंग कोश्यारी यांनी केले. आज त्यांच्या हस्ते सेंटर फॉर एक्सलेंस इन मेरिटाईम स्टडीज या सागरी अध्ययन केंद्रांचे आभासी पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. यावेळी सन्माननीय उपस्थिती म्हणून नौदल प्रमुख एडमिरल करमबिर सिंह, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांच्यासह मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी, अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा तथा प्रभारी संचालिका सेंटर फॉर एक्सलेंस इन मेरिटाईम स्टडीज डॉ. अनुराधा मजुमदार आणि प्रभारी कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड हे उपस्थित होते.
पार्श्वभूमी
कोकणातील नवसाला पावणाऱ्या भराडीदेवीची यात्रा रद्द
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यातील आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी भाविकांना न येण्याचं आवाहन केलं आहे.
आंदोलनजीवी असल्याचा आम्हाला अभिमान : संजय राऊत
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'आंदोलनजीवी' वक्तव्यानंतर राजकीय प्रतिक्रियांनी जोर धरला आहे. काँग्रेसच्या वतीने "हा शेतकऱ्यांचा अपमान आहे", अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच संयुक्त किसान मोर्चाने आम्हाला आंदोलनजीवी असण्यावर गर्व असल्याचं म्हटलं आहे. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत आम्ही आंदोलनजीवी असल्याचा आम्हाला अभिमान आहे, असं म्हटलं आहे.
मालेगावमधील काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांचा पक्षाला रामराम
कॉंग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड झालेली असतानाच मालेगावमधील काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांनी आज आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मालेगावमध्ये माजी आमदार रशिद शेख यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत कॉंग्रेसचा बोलबोला होता. त्यानंतर पक्षाची धुरा त्यांचे पुत्र आसिफ शेख यांनी सांभळली. मात्र आज अचानक त्यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा थेट पक्षाध्यक्षांकडे पाठवत, आपण पक्षाचा राजीनाम देत असल्याचं पत्रकार परिषदेत जाहीर केलं. त्यामुळे मालेगाव शहरात कॉंग्रेस पक्षाला खिंडार पडल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
मुंबईत प्रियकराने स्वत:सह प्रेयसीला पेटवलं, दोघांचाही होरपळून मृत्यू
एका प्रियकरांनं प्रेमिकेला पेटवून देऊन नंतर स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुंबईतील जोगेश्वरीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याच्या प्रयत्नात करत प्रियकरानंही आत्महत्या केली. यात प्रियकराचा शनिवारी जळून मृत्यू झाला आहे. तर प्रेयसीला उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिचाही मृत्यू झाला.