Maharashtra Assembly Election Result 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election Result 2024) चा निकाल जाहीर झाला आहे. यंदाच्या विधानसभेत महायुती (Mahayuti) घवघवीत यश मिळवत सत्तेची चावी आपल्याकडे राखण्यात यशस्वी ठरली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यंदा लाडकी बहीण योजना महायुतीच्या प्रचाराचा केंद्रबिंदू ठरली. निवडणुकीत राज्यातील राज्यातील मतदारांनी महायुतीचं पारडं जड केलं.राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये रिंगणात असलेल्या २५० हून अधिक महिला उमेदवारांपैकी एकूण २१ महिला आमदार झाल्या आहेत. यात महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्हींचा समावेश आहे. महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्हीतून प्रत्येकी ३० महिला उमेदवार विधानसभेत होत्या. यात भाजपकडून ११ महिला आमदार झाल्या आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने १३२ जागा जिंकल्या यातील ११ ठिकाणी महिला उमेदवार जिंकल्या आहेत.


महिला उमेदवार रिंगणात


भाजप- १८ 
शिवसेना (एकनाथ शिंदे)- ८
अजित पवार (राष्ट्रवादी)4
शरद पवार ( राष्ट्रवादी) ११ 
 शिवसेना (उद्धव ठाकरे) 10
 काँग्रेसने 9 महिला उमेदवारांना तिकिटे दिली होती.


भाजपच्या विजयी महिला आमदारांची यादी


चिखली - श्वेता विद्याधर महाले
भोकर - श्रीजया अशोकराव चव्हाण 
जिंतूर - बोर्डीकर मेघना दीपक साकोरे
वसई - स्नेहा पंडित 
कल्याण पूर्व - सुलभा गणपत गायकवाड
बेलापूर - मंदा म्हात्रे
दहिसर - चौधरी मनिषा अशोक
पर्वती - माधुरी सतीश मिसाळ
शेगाव - मोनिका राजीव राजळे
केज - नमिता अक्षय मुंदडा
फुलंब्री - अनुराधा अतुल चव्हाण


शिंदे गटाकडून विजयी महिला आमदार कोण?


मंजुळा गावित (साक्री) 
संजना जाधव (कन्नड) या शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. 


अजित पवार गट


सुलभा खोडे (अमरावती), 
सरोज अहिरे (देवळाली), 
सना मलिक (अनुशक्तीनगर) 
आदिती तटकरे (श्रीवर्धन)


महाविकास आघाडी


ठाकरे गट


ऋतुजा लटके (अंधेरी पूर्वमधून) 


प्रवीणा मोरजकर (कुर्ला मतदारसंघातून)


काँग्रेस


ज्योती गायकवाड  (धवारी मतदारसंघातून)


2019 मध्ये काय स्थिती होती?


२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत प्रमुख पक्षांकडून एकूण ४५ महिला उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यापैकी २४ महिला आमदार झाल्या होत्या. २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी २४ महिलांना आमदार होण्याची संधी मिळाली होती. २०२४ मध्ये महिला आमदारांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत घटली असून २१ महिला आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. म्हणजे एकूण आमदारांच्या संख्येत महिला आमदारांची संख्या केवळ ८ टक्के एवढीच आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इतिहासात आतापर्यंत एकूण ४६१ महिला आमदार झाल्या आहेत. मागील वर्षीच्या महिला आमदारांची संख्या घटल्याचं चित्र आहे.


हेही वाचा:


राज्यातील सत्तास्थापन लांबणीवर? मुख्यमंत्रीपदी कोण, तिढा कायम; 27, 28 नोव्हेंबरला महायुती सरकार स्थापन होण्याची शक्यता