Rohit Pawar Ajit Pawar Meet: यशवंतराव चव्हाण यांचा आज 40 वा स्मृतिदिन आहे. यानिमित्त कराडमधील प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar), रोहित पवार (Rohit Pawar), श्रीनिवास पाटील अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळावर दाखल झाले होते. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) तेथे पोहचले होते. यादरम्यान अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झाली. या भेटीत अजित पवारांनी रोहित पवारांना मिश्किल टोला लगावला. (Karad Ajit Pawar Rohit Pawar Meet)


ढाण्या थोडक्यात वाचलास- अजित पवार (Karad Ajit Pawar Rohit Pawar Meet)


अजित पवार आणि रोहित समोर येताच दोघांची भेट झाली. यावेळी ढाण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं, असा अजित पवारांनी रोहित पवारांना मिश्कील टोला लगावला. यावर सभा झाली असती तर निकाल वर-खाली झाला असता, अशी कबुली रोहित पवारांनी दिली. अजित पवार माझे काका आहेत, म्हणून मी पाया पडलो. शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणे माझी जबाबदारी आहे, असंही रोहित पवारांनी सांगितले.


अजित पवारांच्या भेटीनंतर रोहित पवार काय म्हणाले?


अजित पवार माझे काका आहेत, म्हणून मी पाया पडलो. शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणे माझी जबाबदारी आहे. माझी सभा झाली असती, तर अडचण झाली असती..असं विधान देखील अजित पवारांनी केलं. यावर रोहित पवारांना विचारले असता नक्कीच अजित पवारांनी सभा झाली असती तर वर-खाली झालं असतं, उलटंही होऊ शकलं असतं. पण ते बारामतीमध्ये अडकून पडले होते, त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही. शेवटी अजित पवार मोठे नेते आहेत, निर्णय त्यांचा होता. त्यांचे आमदार देखील मोठ्या प्रमाणात निवडून आले आहे. चांगली गोष्ट आहे, मी त्यांचे अभिनंदन देखील केलं, असं रोहित पवार यांनी सांगितले. 


कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांचा निसटता विजय-


कर्जत-जामखेडमध्ये महाविकास आघाडीचे आमदार रोहित पवार यांचा 1243 मतांनी विजय झाला आहे. रोहित पवार यांना 1 लाख 27 हजार 676 मतं मिळाली. तर महायुतीचे आमदार राम शिंदे यांना 1 लाख, 26 हजार 433 मतं मिळाली आहे. अपक्ष रोहित चंद्रकांत पवार यांना 3489 मतं मिळाल्याचा फटका रोहित पवार यांना बसल्याचं पाहायला मिळालं. तर अपक्ष राम नारायण शिंदे यांना 392 नोटाला 601 मतं मिळाली.


Karad Ajit Pawar Rohit Pawar Meet 'थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर तुझं काय झालं असतं?', VIDEO:



संबंधित बातमी:


Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं डिकोडिंग, जनतेच्या मँडेटचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या सविस्तर