Breaking News LIVE : रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची मुंबई येथे नियुक्ती
Breaking News LIVE Updates, 20 August 2021 : देश-विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर...
रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची मुंबई येथे नियुक्ती. निधी चौधरी यांची मुंबईतील आयटी विभागाच्या संचालक पदी नियुक्ती. डॉ. महेंद्र कल्याणकर यांची रायगडच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती.
पुण्यातील आंबील ओढा परिसरातील बांधकामे हटवण्यास पुणे सत्र न्यायालयाने दिलेली स्थगिती आज न्यायालयाने उठवलीय. त्यामुळे महापालिकेने कारवाई करायची ठरवल्यास आंबील ओढा परिसरातील बांधकामांविरोधात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येऊ शकते. विशेष म्हणजे वरिष्ठ न्यायालयात अपील करेपर्यंत तरी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यास मनाई करण्यात यावी ही आंबील ओढा परिसरातील नागरिकांची मागणीही न्यायालयाने फेटाळलीय. पुणे महापालिकेकडून 24 जुनला आंबील ओढा पात्रातील अतिक्रमणे हटवण्याचा प्रयत्न झाल्यावर स्थानिकांकडून त्याला जोरदार विरोध झाला होता आणि राजकिय आरोप-प्रत्यारोप ही झाले होते. मात्र, दुपारी स्थानिकांकडून न्यायालयात दाद मागण्यात आल्यावर कारवाईला स्थगिती देण्यात आली होती.
राज्यातील नगरपंचायत, नगर परिषद निवडणुकांची तयारी सुरू.सुमारे 150 नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीची तयारी. 23 ऑगस्टपासून निवडणुकांच्या पूर्वतयारीला सुरुवात होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रभागनुसार प्रारूप आराखडा बनविण्याचे निर्देश दिले आहे.
मुखेड तालुक्यातील बामणी येथील रहिवाशी ITBP मधील असिस्टंट कमांडन्ट सुधाकर शिंदे छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जिल्ह्यात झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात शहीद.
भारतात राहून तालिबानचे व तालिबानच्या कारवायाला समर्थन करणाऱ्या विरोधात सांगलीत तक्रार. स्वरा भास्कर, मौलाना सज्जाद नोमानी, शफीकुरहमान बर्क, शायर मुन्नवर राणा यांच्या विरोधात सांगली मधील विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल.
पुण्यातील लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाकडून आर्मी स्टेडियमला ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता खेळाडू निरज चोप्राच नाव दिलं जणार आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते सोमवारी हा नामकरण सोहळा पार पडणार आहे. त्याचबरोबर टोकिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या 16 भारतीय खेळाडूंचा यावेळी सत्कारही करण्यात येणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह सोमवारी सकाळी पुण्यात येणार असून ते आधी लष्कराच्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी या संस्थेच्या सर्वसाधारण सभेस उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी चार वाजता आर्मी स्टेडीयमचा नामकरण सोहळा होणार आहे.
सोनिया गांधींसोबतची बैठक संपली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षावरून तर शरद पवार हे त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानाहून या ऑनलाईन बैठकीस उपस्थित होते. उद्धव ठाकरेंसह देशातील प्रमुख विरोध पक्षनेत्यांसह सोनिया गांधींनी बोलावली ऑनलाईन बैठक होती. केंद्रातील भाजप सरकारविरोधात, विरोधकांन एकत्र आणून मोट बांधण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. शेतकरी आंदोलनासह, महागाई, अर्थ व्यवस्थेसमोरील प्रश्न, बेरोजगारी, कोविड 19 सह इतर महत्त्वाच्या मुद्यांवर बैठकीत चर्चा झाली
बुलडाण्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील तढेगावजवळ समृद्धी महामार्गाच्या कामावरील टिप्परला अपघात, अपघातात आठ मजुरांचा मृत्यू, 12 मजूर गंभीर जखमी
मंत्रालयाच्या गेटवरती विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न, मंत्रालयाच्या गार्डन गेटला घडली घटना,
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघातील व्यक्ती असल्याची माहिती,
स्थानिक पोलिसांच्या संदर्भात मंत्रालायत घेऊन आले होते तक्रार,
सदर व्यक्तीला पोलीस सेंट जॉर्ज हॉस्पिटल मध्ये घेऊन गेली असल्याची माहिती,
पोलिसांच्या जाचाला कंटाळून पुण्यात घटना घडल्या नंतर आज मंत्रालयात पुनरावृत्ती?
नांदेड : आज नांदेड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणा विषयीचा मूक मोर्चा छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वात मूक मोर्चा स्थळी प्रचंड जनसमुदाय उसळला.नांदेड,हिंगोली, परभणी, लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव मोर्चात सामील.
आज खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वात नांदेड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळास्थळी या मराठा मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलंय. कोरोना काळानंतर मराठा समाजाचा पहिला मूक मोर्चा नांदेड येथे प्रचंड गर्दीसह होत आहे. मोर्चा स्थळी मोर्चात सहभागी होणाऱ्या नागरिकांना मास्क, सॅनीटायजर वाटप करण्यात येत आहे. परंतु अशा कोरोना काळातही मोठ्या प्रमाणात सकल मराठा समाज मोठ्या प्रमाणात मोर्चा स्थळी दाखल झालाय. त्यामुळे सोशल डिस्टन्स व कोरोना नियमांचा मात्र फज्जा उडालाय. पण जिल्हा प्रशासनाची ही गर्दी रोखण्यासाठी व नियोजन करण्यात मोठी दमछाक होताना दिसतेय.
पुण्यात हडपसर परिसरात चोरट्यानी घरफोडी करून 88 लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. सोन्याचे दागिने, चांदी, खडे या वस्तू लंपास करण्यात आल्या आहेत. यामध्ये बंद घर फोडून घरातील 155 तोळे सोने, 20 किलो चांदी तसेच काही परदेशी चलन चोरीला गेलं आहे. विवेक चोरघडे याच्या बरकत बंगला फोडून अज्ञात चोरट्याने ही चोरी केली आहे. चोरघडे कुटुंबिय सोमवारी देवदर्शनाला गेले असता हडपसर फुरसुंगी येथून त्याच्या घरातून अज्ञात चोरट्यानी ही घरफोडी केली आहे. याबाबत हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज विरोधी पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. या डिजिटल बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि ममता बॅनर्जी उपस्थित राहणार आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज आठ वर्षं पुर्ण होतायत. या निमित्ताने अनिसकडून डॉक्टर दाभोलकरांची जिथे हत्या झाली त्या विठ्ठल रामजी पुलापासून ते पुणे महापालिकेतील महात्मा फुलेंच्या पुतळ्यापर्यंत अनिसचे अध्यक्ष अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली निर्भय मॉर्निंग वॉकचे आयोजन करण्यात आलं. डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येमागील मुख्य सूत्रधारांना अटक करण्यात यावी अशी मागणी अनिसकडून यावेळी करण्यात आली.
औरंगाबादतील दीक्षा शिंदे या 14 वर्षांच्या मुलीने देशाच्या शिरेपेचात मानाचा तुरा रोवलाय. नासाच्या पॅनेलमध्ये तिची नियुक्ती झाली आहे. तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाल्याची माहिती तिने यावेळी दिली. कृष्णविवर आणि देव यासंदर्भात ती अभ्यास करत होती . तिच्या शास्त्रीय दृष्टिकोनातील लेखनाला आता नासाच्या वेबसाइटवर प्रसिद्धी मिळणार आहे. तिने जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांची अनेक पुस्तके वाचली आहेत. याच पुस्तकातून प्रेरणा मिळाल्याचं दीक्षा सांगते.
इतके निर्बध लावून देखील शर्यतीचे मैदान पार पडले. मोठा जनसमुदाय आणि बैलप्रेमी या शर्यतीसाठी उपस्थित राहिला, यावरून शर्यत सुरू व्हावी ही किती आग्रही मागणी आहे हे लक्ष्यात येते. आता नियम मोडले म्हणून जरी आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी ते गुन्हे आनंदाने स्वीकारू असं सदाभाऊ खोत म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन घोषणा केली होती की 2024 पर्यंत देशातील सर्व गरिबांना वेगवेगळ्या माध्यमातून व्हिटॅमिन, आयर्न आणि इतर पोषक घटक असलेले तांदूळ देण्यात येणार आहे. देशातील ज्या लोकांमध्ये पोषणाची कमी आहे त्या लोकांमध्ये या घटकांची कमतरता दूर करण्याचे लक्ष्य आहे. पंतप्रधानांनी केलेल्या या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी आता सरकार रोड मॅप तयार करत आहे.
सायन्स मॅग्जिन असलेल्या द लॅन्सेन्टच्या एका आकडेवारीनुसार, आपल्या देशातील प्रत्येकी दुसरी महिला ही कुपोषणाची बळी आहे. त्याचप्रमाणे देशातील प्रत्येकी चौथे बालक हे कुपोषणाचे बळी आहे. भारतातील प्रत्येकी तिसरे बालक हे लहान उंचीचे आहे. तसेच भारतातील प्रत्येकी पाचवे बालक हे शारीरिकरित्या दुर्बल आहे. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताचा जगात 94 वा क्रमांक लागतोय.
नागपूर : दोन महिन्यांपूर्वी भारतात / नागपुरात बेकायदेशीर राहत असल्याच्या आरोपात नूर मोहम्मद नामक अफगाणिस्तानी नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर प्राथमिक चौकशी करून नूर मोहम्मदला नागपूर पोलिसांनी हद्दपार करत अफगाणिस्तानला परत पाठवले होते. तोच नूर मोहम्मद आता तालिबानच्या एका तुकडीत हातात बंदूक घेऊन सहभागी झाल्याचे फोटो सध्या वायरल होत आहेत. वायरल होत असलेला तो फोटो नूर मोहम्मदचाच आहे की, नाही? हे ठामपणे सांगता येणं शक्य नसल्याचं नागपूरच्या पोलीस आयुक्तांचं म्हणणं आहे.
सांगली : गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यतीचे ठिकाण बदलत अखेर शर्यती भरवल्या. झरे-वाक्षेवाडीच्या हद्दीत असलेल्या एका डोंगरावर बैलगाडा शर्यती सुरु केल्या. अनेक जिल्ह्यातून बैलप्रेमी या शर्यतीसाठी दाखल झाले आहेत. पोलीस, प्रशासन यांची संचारबंदी, नाकाबंदी झुगारून शर्यती भरवण्यात आल्या आहेत. एकूण 7 बैलगाड्यांची शर्यत लावून या शर्यतीचा शुभारंभ करण्यात आला.
झरे-वाक्षेवाडीच्या हद्दीत शर्यत घेतलेल्या डोंगरावर प्रचंड लोकांची गर्दी पाहायला मिळाली. राज्यभरातील अनेक भागांतून बैलप्रेमी आले आहेत.
पार्श्वभूमी
Malnutrition : भारत कुपोषणमुक्त होणार? केंद्राकडून रोड मॅप तयार करण्याचं काम सुरु
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन घोषणा केली होती की 2024 पर्यंत देशातील सर्व गरिबांना वेगवेगळ्या माध्यमातून व्हिटॅमिन, आयर्न आणि इतर पोषक घटक असलेले तांदूळ देण्यात येणार आहे. देशातील ज्या लोकांमध्ये पोषणाची कमी आहे त्या लोकांमध्ये या घटकांची कमतरता दूर करण्याचे लक्ष्य आहे. पंतप्रधानांनी केलेल्या या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी आता सरकार रोड मॅप तयार करत आहे.
सायन्स मॅग्जिन असलेल्या द लॅन्सेन्टच्या एका आकडेवारीनुसार, आपल्या देशातील प्रत्येकी दुसरी महिला ही कुपोषणाची बळी आहे. त्याचप्रमाणे देशातील प्रत्येकी चौथे बालक हे कुपोषणाचे बळी आहे. भारतातील प्रत्येकी तिसरे बालक हे लहान उंचीचे आहे. तसेच भारतातील प्रत्येकी पाचवे बालक हे शारीरिकरित्या दुर्बल आहे. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताचा जगात 94 वा क्रमांक लागतोय.
जीडीपीचे नुकसान
देशातील पाच वर्षांच्या आतील बालकांच्यामध्ये होणाऱ्या मृत्यूपैकी 68 टक्के मृत्यू हे कुपोषणामुळे होत असल्याचं स्पष्ट आहे. कुपोषणामुळे देशाला दरवर्षी 7400 कोटी रुपयांचे नुकसान होतंय. अविकसित बालकं ही प्रौढ झाल्यानंतर इतरांच्या तुलनेत 20 टक्के कमी आर्थिक लाभ मिळवतात हेही स्पष्ट झालं आहे.
या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गरिबांना 2024 पर्यंत आता फोर्टिफाईड तांदूळ देण्याची घोषणा केली आहे. या तांदळाची निर्मिती करताना त्यामध्ये व्हिटॅमिन, आयर्न आणि इतर 12 पोषक घटक मिसळली जाणार आहेत. सुरुवातीला हा प्रकल्प पायलट बेसिसवर राबवण्यात येणार आहे.
Aghanistan News : नागपुरातून अफगाणिस्तानात परत पाठवण्यात आलेला नूर मोहम्मद तालिबानी तुकडीत सहभागी?
दोन महिन्यांपूर्वी भारतात / नागपुरात बेकायदेशीर राहत असल्याच्या आरोपात नूर मोहम्मद नामक अफगाणिस्तानी नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर प्राथमिक चौकशी करून नूर मोहम्मदला नागपूर पोलिसांनी हद्दपार करत अफगाणिस्तानला परत पाठवले होते. तोच नूर मोहम्मद आता तालिबानच्या एका तुकडीत हातात बंदूक घेऊन सहभागी झाल्याचे फोटो सध्या वायरल होत आहेत.
वायरल होत असलेला तो फोटो नूर मोहम्मदचाच आहे की, नाही? हे ठामपणे सांगता येणं शक्य नसल्याचं नागपूरच्या पोलीस आयुक्तांचं म्हणणं आहे.
विशेष म्हणजे, पोलिसांनी नूर मोहम्मदला ताब्यात घेतलं होतं, तेव्हा त्याच्या मोबाईल फोनमध्ये काही तालिबानी व्हिडीओ आढळले होते, तसेच तो काही तालिबानी नेत्यांचे ट्विटर फॉलो करत असल्याचंही पोलिसांना आढळलं होतं. तेव्हा नूरच्या शरीरावर बंदुकीच्या गोळीचे व्रण दिसून आले होते. मात्र, नंतर नागपूर पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत नूर मोहम्मदनं नागपुरात कुठलेही बेकायदेशीर कृत्य केलं नसल्याचं लक्षात घेऊन पोलिसांनी त्याला हद्दपार करण्याचा निर्णय घेत त्याला परत पाठविलं होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -