Breaking News LIVE : नदीम-श्रवण जोडीतील संगीतकार श्रवण राठोड यांचं कोरोनामुळं निधन

Breaking News LIVE Updates, 22 April 2021 : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Apr 2021 07:24 AM
नदीम-श्रवण जोडीतील संगीतकार श्रवण राठोड यांचं कोरोनामुळं निधन

Breaking News LIVE : नदीम-श्रवण जोडीतील संगीतकार श्रवण राठोड यांचं कोरोनामुळं निधन, संगीत क्षेत्राला मोठा धक्का



https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-april-22-2021-maharashtra-coronavirus-lockdown-news-983337

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील जांबिया-गट्टा पोलीस ठाण्यावर नक्षलवादी हल्ला

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील जांबिया-गट्टा पोलीस ठाण्यावर नक्षलवादी हल्ला करण्यात आला आहे. कुठलीही हानी झाली नाही, रात्री 12 च्या सुमारास लोकवस्तीकडून पोलीस ठाण्याच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. गावठी  ग्रेनेडचा वापर करून एक बॉंब देखील फेकला गेला, सुदैवाने बॉम्ब न फुटल्याने मोठी हानी टळली. पोलीस पथकाने प्रत्युत्तर देत गोळीबार केला. नक्षली सुमारे 50 च्या संख्येत असल्याची माहिती मिळत आहे. 

परभणीतील कोविड सेंटरची पालकमंत्री नवाब मलिक यांच्याकडून पाहणी 

राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री तथा परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी आज परभणीतील कोविड सेंटरची पाहणी करून उपलब्ध सुविधांचा आढावा घेतलाय. परभणी शहरातील आयटीआय, जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा परिषद येथील कोविड सेंटरची  रुग्णालयाची पाहणी केली. त्यांनी यावेळी काही रुग्णांशी ही संवाद साधलाय. यावेळी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

नाशिक : झाकीर हुसेन रुग्णालय दुर्घटना प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल

नाशिक : झाकीर हुसेन रुग्णालय दुर्घटना प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भद्रकाली पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. हलगर्जीपणा करत इतरांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्या प्रकरणी भादवी 304 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस आयुक्त दर्जाचा अधिकारी या घटनेची चौकशी करणार आहे. 

राज्यसभा खासदार आणि काँग्रेस नेते राजीव सातव यांना कोरोनाची लागण

काँग्रेस नेते तथा राज्यसभा सदस्य राजीव सातव यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे काल रात्री ते पॉझिटिव असल्याचा अहवाल त्यांना प्राप्त झाला असून ते सध्या दिल्लीतील आपल्या निवासस्थानी आयसोलेट होत उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती उत्तम असुन त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी आपली चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 

वाशिमच्या येवती गावात जुन्या वादावरून गावातील मेडिकल दुकानावर दगडफेक

वाशिम: वाशिमच्या येवती गावात जुन्या वादावरून गावातील एका मेडिकल दुकानावर एका गटाने दुसऱ्या गटावर लाठी-काठी दगडाने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना 20 तारखेची आहे. ही सर्व घटना cctv मध्ये कैद झाली आहे. दरम्यान दोन गटांमधील जुना वाद होता, असं असताना तक्रार का दिली म्हणून म्हणून मेडिकल दुकानवर हल्ला करून मारहाण केली. यामध्ये दुकान चालक गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटना सीसीटीव्हीत कैद होत असल्याचं लक्षात आल्यावर cctv  कॅमेरे तोडण्यात आले. या घटने प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून वाशिम ग्रामीण पोलीस घटनेचा तपास करत आहे.

वीज गेली जनरेटर सुरुच झाले नाही, रुग्णांना तातडीने हलवल्याने अनर्थ टळला; लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातील घटना

लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डेडिकेटेड कोविड रुग्णालयातील वीज मंगळवारी (20 एप्रिल) रात्री गेली. त्यातच तेथे असलेले जनरेटर सुरु झाले नाही. त्याचा परिणाम येथे आयसीयूमधील व्हेंटिलेटरवर असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्यामु्ळे पुढे अनुचित प्रकार घडू नये म्हणून या रुग्णांना तातडीने संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीत सुरु असलेल्या सेंटरमध्ये हलवण्यात आलं. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. याला संस्थेच्या अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दुजोरा दिला आहे.

'ब्रेक द चेन' अंतर्गत राज्यात कठोर निर्बंध; नवी नियमावली जारी

राज्यात आज (22 एप्रिल) रात्री आठपासून ब्रेक द चेन अंतर्गत अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत. राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

पार्श्वभूमी

दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर...


Maharashtra Coronavirus Crisis : 'ब्रेक द चेन' अंतर्गत राज्यात कठोर निर्बंध; शासनाकडून नवी नियमावली जारी, काय सुरु अन् काय बंद?


मुंबई : राज्यात आज (22 एप्रिल) रात्री आठपासून ब्रेक द चेन अंतर्गत अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत. राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. दिवसेंदिवस राज्यातील रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरही ताण आला आहे. तसेच राज्यात ऑक्सिनज, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि बेड्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशातच राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 'ब्रेक द चेन' अंतर्गत आज रात्री 8 वाजल्यापासून लागू होणारी सुधारित नियमावली प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. नव्या नियमावलीमध्ये अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. यामध्ये लग्न समारंभ दोन तासात आटोपून केवळ 25 जणांच्या उपस्थित सोहळा पार पाडावा, नाहीतर 50 हजारांचा दंडाची आकारण्यात येणार आहे. तसेच राज्यांतर्गत प्रवासासाठी ई पास नाही पण फक्त अंत्यसंस्कार, मेडिकल इमर्जन्सी आणि अत्यावश्यक सेवेसाठीच प्रवास करता येणार, असल्याचंही जाहीर करण्यात आलं आहे. 


राज्यात काल विक्रमी 67,438 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ


महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढ होत असल्याचं चित्र आहे.  काल 67  हजार 468 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, काल 54 हजार 985 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 32 लाख 68 हजार 449 रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 95 हजार 747 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.15 टक्के  झाले आहे.


राज्यात काल एकूण 568 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यूदर 1.54 टक्के आहे. आतापर्यंत एकूण 61 हजार 911 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल नोंद झालेल्या 568 मृत्यूंपैकी 303 मृत्यू मागील 48 तासातील आहेत. तर 160 मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 105 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीतील आहेत. 


घरोघरी जाऊन कोरोनाची लसीकरण मोहिम अशक्य, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती


लसीचा शरीरावर होणारा प्रभाव आणि मोठ्या प्रमाणात लस वाया जाण्याची शक्यता अशा विविध कारणांमुळे घरोघरी जाऊन लसीकरण मोहिम राबविणं शक्य नाही. अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून बुधवारी प्रतिज्ञापत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली. गेल्या सुनावणीत महाराष्ट्रातील एका बड्या राजकिय नेत्याला घरी जाऊन लस दिल्याबद्दल हायकोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केली होती.


राज्यात मागील महिन्याभरापासून कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच मुंबई उच्च न्यायालयात वकील ध्रुती कापाडिया आणि कुणाल तिवारी यांनी एक जनहित याचिका केली आहे. सर्वसाधारणपणे 75 वर्षे पूर्ण झालेल्या सगळ्याच ज्येष्ठ नागरिकांना लस घेण्यासाठी बाहेर जाणे शक्य नसल्यानं त्यांना घरोघरी जाऊन लस देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी या जनहित याचिकेत केलेली आहे. त्यावर मागील सुनावणीदरम्यान, ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्रतिज्ञापत्रावर बाजू मांडण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले होते. त्यानुसार बुधवारी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे उपसचिव सत्येंद्र सिंह यांनी आपलं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.