एक्स्प्लोर

कोरोना लस ठरतेय प्रभावी! लसीकरण झालेल्या 0.04 टक्के जणांना कोरोनाची बाधा, केंद्राचा अहवाल

कोव्हॅक्सिनचा पहिल्या डोस 93, 56, 437 जणांना दिल्यानंतर यातील 4 हजार 208 म्हणजेच 0.04  टक्के जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले आहे.

नवी दिल्ली :  देशासह राज्यात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. दररोज कोरोनाबाधितांची संख्या नवनवे उच्चांक गाठत आहे. सोबतच कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचे आकडेही वाढले आहे. लसीकरणाची मोहिम देखील देशात वेगाने सुरू आहे. तरी देखील अनेकांच्या मनात लसीबद्दल शंका आहे त्यामुळे लोकांच्या मनात आज देखील लस घ्यावी की नाही असा संभ्रम आहे. परंतु केंद्र सरकारने याविषयी आकडेवारी जाहीर करत हा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्राने जाहीर केलेल्या या आकडेवारीनुसार कोरोनाविरुद्धची लस प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले आहे. 

भारतात 16 जानेवारीपासून लसीकरण सुरु झाल्यानंतर आतापर्यंत 12.7 कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण करण्यात आलं आहे. यासाठी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींचा वापर करण्यात आला आहे. लसीकरण मोहिमेत आतापर्यंत एकूण 1.1 कोटी कोव्हॅक्सिनचे डोस देण्यात आलेत. कोव्हॅक्सिनचा पहिल्या डोस 93, 56, 437 जणांना दिल्यानंतर यातील 4 हजार 208 म्हणजेच 0.04  टक्के जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले आहे. तर दुसऱ्या डोसनंतर देखील 0.04 टक्के जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आकडेवारीवरुन समोर येत आहे. तर कोव्हिशिल्डचे आतापर्यंत एकूण 11.6 कोटी डोस देण्यात आले आहेत.  

लस पहिला डोस घेतलेल्यांची संख्या पहिल्या डोसनंतर पॉझिटिव्ह दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या दुसऱ्या डोसनंतर पॉझिटिव्ह
कोव्हॅक्सीन  93, 56, 437 4208 (0.04%) 17, 37, 178 695 (0.04%)
कोव्हिशील्ड   10, 03, 02, 745 17,145 (0.02%) 1, 57,32,754 5014 (0.03%)

कोव्हिशिल्डचा पहिला डोस 10 कोटी 3 लाख 2 हजार 745 जणांना दिल्यानंतर यातील 17 हजार 145 म्हणजेच 0.02 टक्के जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. महत्त्वाचं म्हणजे, कोव्हिशिल्डचा दुसऱ्या डोस घेतल्यानंतर 0.03 टक्के जणांना कोरोना झाला आहे. कोव्हिशिल्डचा दुसरा डोस एकूण 1 कोटी 57 लाख 32 हजार  754 जणांना दिल्यानंतर यातील 5 हजार 14 जणांना कोरोना झाल्याचं समोर येत आहे. दिलासादायक बाब ही आहे की लसीकरणानंतर कोरोना होणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट होते आहे. त्यात लस टोचल्यानंतर कोरोना होण्याचे प्रमाण देखील कमी आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढावा हीच एक अपेक्षा या आकडेवारीवरुन समोर येत आहे. 


कोरोना लस ठरतेय प्रभावी! लसीकरण झालेल्या 0.04 टक्के जणांना कोरोनाची बाधा, केंद्राचा अहवाल

कोरोनाची पहिली लाट (2020) आणि दुसरी लाट (2021) अशी वयाची वर्गवारी केल्यानंतर काही गटात रुग्णांची वाढ झाली आहे. वयोगट 10-20 वर्ष, 30-40 वर्ष, 40-50 वर्षात कोरोनाच्या रुग्णांची किंचित वाढ झाल्याचं समोर आलं आहे. तर 50-60 वर्ष आणि 60-70 वर्ष वयोगटात देखील दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढली आहे. यात सर्वाधिक 30-40 वयोगटात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. ज्यात 2020 मध्ये 21.05 टक्के रुग्ण या वयोगटातील आढळून येत होते. तर आता 2021 मध्ये या वयोगटातील 21.15 टक्के रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे तिशी ते चाळीशीतील लोकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. 

देशात सध्याला 21.57  हून अधिक रुग्णांची संख्या बघायला मिळत आहे. ही संख्या मागील वर्षीच्या एकूण ॲक्टिव्ह रुग्णसंख्येच्या डबल झाली आहे. देशातील 146 जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट हा 15 टक्क्यांहून अधिक आहे. जो राज्य आणि केंद्र सरकारसाठी मोठा चिंतेचा विषय बनला आहे. पहिल्या लाटेत एका दिवसात 94 हजार सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. मात्र, दुसऱ्या लाटेत रोजची वाढणारी रुग्णसंख्या 2.95 लाखांच्या घरात पोहोचली आहे.

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
PM Modi Video Row : मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी, नरेंद्र मोदींचा व्हिडिओ हटवल्याचं प्रकरण तापलं, संसदीय समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे आक्रमक
मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी, मोदींचा व्हिडिओ हटवल्याचं प्रकरण तापलं, निशिकांत दुबे आक्रमक 
Prashant Kishor : भाजपच्या 'चाणक्या'सह राष्ट्रीय अध्यक्षांना धोबीपछाड, बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांच्या विजयाची पाच कारणे
भाजपच्या 'चाणक्या'सह राष्ट्रीय अध्यक्षांना धोबीपछाड, बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांच्या विजयाची पाच कारणे

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget