(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Covid 19 LIVE Updates : भिवंडीत धोकादायक यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळली; तीन मजुरांचा मृत्यू तर तीन जण जखमी
Maharashtra Corona cases Updates: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
मुंबईतील हाफकिन संस्थेस कोवॅक्सीन लस उत्पादित करण्यास मान्यता
हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. केंद्र शासनाने ही परवानगी दिल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु होऊ शकते असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी आज मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, यासंदर्भात वैज्ञानिक तज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार ही मान्यता देण्यात आली असून कोवॅक्सीन बनविण्यास 1 वर्षांचा कालावधी दिला आहे. सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांनी उत्पादन सुरु करावे तसेच हाफकिन मध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी.
कोरोना साथीत मंत्री नितीन गडकरी अॅक्टिव्ह मोडवर!
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधील रुग्णांसाठी रेमडेसिवीर मिळावं म्हणून थेट दोन कंपनीच्या मालकांना फोन करुन मोठा सप्लाय निश्चित केला असल्याचं वृत्त समोर आलं होतं. तसेच नागपुरात कोरोनाची परिस्थिती गंभीर असताना नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस कुठे आहेत, असा सवाल काँग्रेसनं केला होता. मात्र नुसते नागपूरच नाही तर महाराष्ट्राची संपूर्ण कोविड परिस्थिती आणि रेमडेसिवीरची उपलब्धता यासाठी नितीन गडकरी अॅक्टिव्ह मोडवर असल्याची माहिती समोर आली आहे.
पालघर झुंडबळीला घटनेला एक वर्ष पूर्ण; भाजपच्यावतीनं मुंबई, नाशिक, पालघरसह काही ठिकाणी आंदोलनाचा इशारा
जिल्ह्यातील झुंडबळी हत्याकांडाला एक वर्ष पूर्ण झालं आहे . त्यामुळे या घटनेच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्यात. मुल पळवणारी टोळी गावात दाखल झाल्याच्या संशयावरून प्रक्षुब्ध जमावानं तिन साधूंची अमानुष मारहाण करत हत्या केली होती. मात्र या वर्षभरात या प्रकरणात अनेक घडामोडी घडल्यात. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या स्टेट सीआयडीनं याप्रकरणी 126 आरोपींविरोधात 4995 पानांचं पहिलं तर 5921 पानांचं पुरवणी आरोपपत्र कोर्टात दाखल केलं आहे. राज्य सरकारनं या घटनेची गंभीर दखल घेत या घटनेनंतर 165 संशयिंताना अटक करण्यात आली आहे. तर कासा पोलीस स्थानकांतील दोन पोलिसांना निलंबितही करण्यात आलं आहे. तसेच या घटनेची शिक्षा म्हणून पालघरचे एसपी गौरव सिंह यांनाही सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होतं.
भिवंडीत धोकादायक यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळली; तीन मजुरांचा मृत्यू तर तीन जण जखमी
वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या 6 जणांचा धरणात बुडून मृत्यू
- वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या 6 जणांचा धरणात बुडून मृत्यू,
मृतांमध्ये तरुण तरुणीचा समावेश,
वालदेवी धरणावर 9 जण गेले होते वाढदिवस साजरा करायला,
5 मुली आणि 1 मुलगा बुडाल्याची प्राथमिक माहिती,
धरणाजवळ सेल्फी काढण्याच्या नादात तोल गेल्याची चर्चा ,
वाडीवरहे पोलीस घटनास्थळी दाखल,
ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने शोधकार्य सुरू,
दिल्लीत कोरोनाचा कहर सुरुच,
दिल्लीत कोरोनाचा कहर सुरुच, एका दिवसात सर्वाधिक 19486 कोरोना रुग्णांचे निदान, तर 141 जणांचा मृत्यू
पोहण्यासाठी गेलेल्या खदाणीत बुडून तिघांचा मृत्यू
बीड शहरपासून जवळच असलेल्या पांगरबावडी शिवारात सायंकाळच्या सुमारास खदाणीत बुडून तिघांचा मृत्यू झाला आहे. सदरील तरुण हे बीड शहरातील गांधी नगर येथील आहेत. पोहण्यासाठी खदाणीत गेले असल्याची प्राथमिक माहिती आहे. दोघांचे मृतदेह सापडले असून एकाचा मृतदेहाचा शोध सुरु आहे.
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार, आज जिल्ह्यात तब्बल दीड हजार लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह
एका दिवसात तब्बल 1500 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 24 जणांचा मृत्यू,
शहरातील 371 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 7 जणांचा मृत्यू,
ग्रामीण भागात 1129 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आणि 17 जणांचा मृत्यू