एक्स्प्लोर

Breaking News LIVE : कोल्हापुरातील दत्त साखर कारखान्यातील तीन कामगारांचा मृत्यू

Breaking News LIVE Updates, 25 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये

Key Events
Breaking News Live Updates Maharashtra news latest Marathi headlines 26 April 2021 Breaking News LIVE : कोल्हापुरातील दत्त साखर कारखान्यातील तीन कामगारांचा मृत्यू
Breaking News

Background

तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील रासायनिक कारखान्यांनी सोडलेल्या विषारी वायूमुळे नागरिकांना त्रास, भीतीचे वातावरण

बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातून बेकायदेशीर पणे मोठ्या प्रमाणात विषारी वायू सोडल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या कोलवडे गावात या वायूचा प्रंचड त्रास नागरिकांना होऊ लागला. यामुळे काही नागरिकांना चक्कर येण्याच्या घटना देखील घडल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यांनी वायू प्रदूषण पुन्हा मोठ्या प्रमाणात सुरु केल्याचं दिसून आलं आहे. टाळेबंदी असल्याचा फायदा घेत प्रदूषणकारी उद्योजक बेकायदेशीरपणे विषारी वायू हवेत सोडत असल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री 10 च्या सुमारास औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या कोलवडे गावात मोठ्या प्रमाणात विषारी वायू मिश्रित धूर संपूर्ण गावात पसरला. काही वेळात नागरिकांना डोळे चुरचुरणे, घसा खवखवणे आणि चक्कर येण्याच्या घटना घडू लागल्याची माहिती कोलवडे येथील सामाजिक कार्यकर्ते मनिष संखे यांनी दिली. यातच हवे पेक्षा जड असलेल्या या वायु मिश्रित धुरामुळे श्वास घेण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आलं. गावकऱ्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सर्व अधिकाऱ्यांचे फोन बंद असल्याचं आढळून आलं. एवढी मोठी घटना घडूनही एकही अधिकारी याठिकाणी रात्रीच्या वेळी उपलब्ध नसल्याने प्रदूषणकारी कारखान्यांचे फावत चालले आहे.

राज्यात काल दिवसभरात 66 हजार 191 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; तर 61 हजार 450 रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. राज्यात काल दिवसभारत 66 हजार 191 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 61 हजार 450 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 35 लाख 30 हजार 60 रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत.  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.19 टक्के  झाले आहे. राज्यात एकूण 6 लाख 98 हजार 354 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात काल एकूण 832 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यूदर 1.51 टक्के आहे. आतापर्यंत एकूण 64 हजार 760 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल नोंद झालेल्या 832 मृत्यूंपैकी 360 मृत्यू मागील 48 तासातील आहेत. तर 244 मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 228 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीतील आहेत.

एकाच वेळी तीस जणांवर अंत्यसंस्कार! बीडच्या अंबाजोगाईतील भीषण परिस्थिती 

बीड : कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची बातमी दाखवून आम्ही घाबरवत नाहीत तर कोरोनाचे निर्बंध न पाळणाऱ्यांना भानावर आणण्यासाठी ही बातमी... कोरोनाचे निर्बंध पाळा हे अनेक वेळा सांगून सुद्धा लोक ऐकत नाहीत. शनिवार आणि रविवार म्हणजे काल आणि आज अंबाजोगाईमध्ये एकूण तीस जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.यातील 28 जणांना अग्निडाग तर दोन जणांचा दफनविधी करण्यात आला.  अंबाजोगाई नगरपालिकेकडून हे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. रोज कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीतील हे छप्पर आता सुद्धा कमी पडू लागले.

मागच्या दोन आठवड्यापासून बीड जिल्ह्यामध्ये एक हजार पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. वाढणाऱ्या रुग्णांसोबत रूग्णांच्या मृत्यूचा आकडा सुद्धा वाढत आहे. काल आणि आज म्हणजे शनिवार व रविवार या दोनच दिवसात अंबाजोगाईत कोरोनामुळे मृत झालेल्या 30 रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 28जणांना अग्निडाग तर दोन जणांचा दफनविधी करण्यात आला.  काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी एकाच सरणावर आठ जणांना अग्निडाग दिला होता का पुन्हा दिसणारे हे दृश्य थरकाप उडवणारे आहे..

20:17 PM (IST)  •  26 Apr 2021

आज 71,736 रुग्ण बरे होऊन घरी, आज राज्यात 48,700 नवीन रुग्णांचे निदान

आज 71,736 रुग्ण बरे होऊन घरी, आज राज्यात 48,700 नवीन रुग्णांचे निदान. राज्यात आज 524 करोना बाधित रुग्णाांच्या मृत्यूची नोंद

17:53 PM (IST)  •  26 Apr 2021

कोल्हापुरातील दत्त साखर कारखान्यातील तीन कामगारांचा मृत्यू

कोल्हापुरातील दत्त साखर कारखान्यातील तीन कामगारांचा मृत्यू, पाणी शुद्धीकरण टँकमध्ये पडून तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती, टँकमध्ये पडलेल्या एकाला वाचवण्यासाठी गेलेले दोन कामगारांचा देखील मृत्यू

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
Nashik Crime News: साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...

व्हिडीओ

Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO
Praniti Shinde Solapur Speech : बाळासाहेब प्रकरणावर भाष्य, भाजपवर टीका;प्रणिती शिंदेंचं जबरदस्त भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
Nashik Crime News: साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूनही पलटवार
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूनही पलटवार
Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
Nashik Crime News : दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
Latur Municipal Election 2026: भांडी विक्री करून उदरनिर्वाह ते सात वर्षांची समाजसेवा, अजितदादांच्या राष्ट्रवादीने निवडणुकीत 'हिरा' शोधला; सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी
भांडी विक्री करून उदरनिर्वाह ते सात वर्षांची समाजसेवा, अजितदादांच्या राष्ट्रवादीने निवडणुकीत 'हिरा' शोधला; सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी
Embed widget