Breaking News LIVE : Breaking News LIVE : उद्या मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रे सुरू राहणार, आज BMCला दीड लाख कोविशिल्ड लशींचा पुरवठा
Breaking News LIVE Updates, 24 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये..
LIVE
Background
Covaxin Vaccine Prices : सीरम पाठोपाठ भारत बायोटेककडूनही कोरोना लसीच्या किमती जाहीर; काय असतील दर?
भारत बायोटेकने संपूर्ण स्वदेशी लस COVAXIN लसीच्या प्रति डोसच्या किमतीची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितलं की, राज्य सरकारसाठी प्रति डोस 600 रुपये आणि खाजगी रुग्णालयांसाठी 1,200 रुपये प्रति डोस दराने देण्यात येणार आहे. भारत बायोटेकने सांगितलं की, केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार, आम्ही कोवॅक्सिन लसीच्या डोसच्या किमतींची घोषणा केली आहे.
यापूर्वी बुधवारी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ने सांगितलं होतं की, "कोविड-19 लस 'कोविशील्ड' ची किंमत राज्य सरकारसाठी 400 रुपये प्रति डोस आणि खासजी रुग्णालयांसाठी 600 रुपये प्रति डोस असणार आहे.
'उत्पादन वाढवण्यासाठी गुंतवणुकीची गरज', कोविशिल्डच्या किंमतीवरील चर्चेवर सीरमचं स्पष्टीकरण
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आज कोविड 19 प्रतिबंधक लस कोविशिल्डच्या किंमतीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. आगाऊ निधी मिळाल्यामुळे सुरुवातीला या लसीची किंमत जागतिक पातळीवर कमी होती, परंतु आता लस उत्पादन वाढवण्यात गुंतवणुकीची आवश्यकता आहे, असं स्पष्टीकरण सीरमने दिलं आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आज कोविड 19 प्रतिबंधक लस कोविशिल्डच्या किंमतीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. आगाऊ निधी मिळाल्यामुळे सुरुवातीला या लसीची किंमत जागतिक पातळीवर कमी होती, परंतु आता लस उत्पादन वाढवण्यात गुंतवणुकीची आवश्यकता आहे, असं स्पष्टीकरण सीरमने दिलं आहे.
राज्यात शनिवारी 67,167 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, तर 63,118 रुग्णांची कोरोनावर मात
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. आज 67 हजार 160 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज 63 हजार 818 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 34 लाख 68 हजार 610 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.02 टक्के झाले आहे. राज्यात आज 676 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.51 टक्के आहे.
मुंबई गेल्या 24 तासात 5867 कोरोना बाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 5867 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 5 लाख 29 हजार 817 वर पोहोचली आहे. सध्या 78 हजार 226 एकूण सक्रिय रुग्ण आहेत.
बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील कोलावडे गावात अचानक धूर सदृश्य वायू गळती
पालघर : बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील कोलावडे गावात अचानक धूर सदृश्य वायू गळती, वायू गळती झाल्याचा प्राथमिक अंदाज, गावातील नागरिकांना चक्कर, मळमळणे, डोळे चरचरणे असे प्रकार सुरू, काही नागरिकांना रुग्णालयात पाठविल्याची माहिती https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-25-april-2021-983793
आज राज्यात ६६,१९१ नवीन रुग्णांचे निदान
आज ६१,४५० रुग्ण बरे होऊन घरी, आज राज्यात ६६,१९१ नवीन रुग्णांचे निदान, राज्यात आज ८३२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद
कोल्हापुरातील ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटांसह पावसाची जोरदार हजेरी
कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाला पावसाने झोडपले, चंदगड, नेसरी भागात मुसळधार पाऊस, अनेक गावांमधील वीजपुरवठा खंडित, विजांच्या कडकडाटांसह पावसाची जोरदार हजेरी, उकाड्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना मोठा दिलासा
उद्या मुंबईतील सर्व लसीकरण केेंद्रे सुरू राहणार, आज मुंबई महापालिकेला दीड लाख कोविशिल्ड लशींचा पुरवठा
उद्या मुंबईतील सर्व लसीकरण केेंद्रे सुरू राहणार, आज दीड लाख कोविशिल्ड लशींचा पुरवठा मुंबई महापालिकेला झाला ,
कोव्हॅक्सिन लशीचा साठा मर्यादीत असल्यानं ज्यांचा दुसरा डोस कोव्हॅक्सिनचा असणाराय त्यांनाच ती दिली जाणाराय,
मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांची माहिती,
आज लशींचा तुटवडा असल्यानं १३२ पैकी केवळ ३७ लसीकरण केंद्रे मुंबईत सुरू होती
चंद्रपूर : वाघाच्या अवयवांची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या 4 जणांना वन विभागाकडून अटक
चंद्रपूर : वाघाच्या अवयवांची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या 4 जणांना वनविभागाने केली अटक... आरोपींकडून वाघाची 12 नखं, 4 दात आणि 15 मिश्या जप्त, गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाला माहिती मिळाली की काही जण वाघाचे अवयव विकण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळे वनविभागाने सापळा रचून या चौघांना चंद्रपूर तालुक्यातील चेकबोर्डा - चेकनिंबाळा मार्गवर अटक केली.