Breaking News LIVE : राज्यातील दहावीची परीक्षा रद्द, बारावीची परीक्षा होणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

Breaking News LIVE Updates, 19 April 2021 : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 Apr 2021 06:49 AM
राज्यातील दहावीची परीक्षा रद्द, बारावीची परीक्षा होणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

राज्यातील दहावीची परीक्षा रद्द, बारावीची परीक्षा होणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

राज्यात लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता,15 दिवस लॉकडाऊन लावण्याची अनेक मंत्र्यांची मागणी

राज्यात लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता, कॅबिनेटमध्ये निर्णय होण्याची शक्यता, 15 दिवस लॉकडाऊन लावण्याची अनेक मंत्र्यांची मागणी, सूत्रांची माहिती

सातारा : शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रा रद्द, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक चैत्र यात्रा कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात  आली आहे याबाबतचे आदेश जिल्‌हाधिकारी शेखर सिंह यांनी आज जारी केले आहेत. शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक यात्रेचा 17 ते 27 एप्रिल या कालावधी होणार असून यात्रेचा मुख्य दिवस 23 व 24 एप्रिल 2021  हा आहे. शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रेस सातारा जिल्ह्यातील तसेच सोलापूर, अहमदनगर, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, सांगली, उस्मानाबाद, बीड  या जिल्ह्यातूनही भाविक मोठया प्रमाणावर येत असून जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांना आपल्या जिल्ह्याच्या सीमेवर अटकाव करण्यात येणार असल्यामुळे कोणीही या यात्रेसाठी येऊ नये असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेशात  नमूद केले आहे.

सातारा : कोयना परिसरात सलग दोन भूकंपाचे धक्के

सातारा : कोयना परिसरात सलग दोन भूकंपाचे धक्के, पहिला धक्का 3 वाजून 22 मिनिटांनी पहिला धक्का तर दुसरा 03 वाजून 42 मिनिटांनी, दोन्ही भूकंपाचे धक्के सोम्य, सलग झालेल्या दोन भुकंपाच्या धक्क्यांमुळे कोयना परिसरात भीतीचे वातावरण

अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे निधन

#BreakingNews | अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे निधन


 


महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ चित्रपटातून नांदलस्कर यांचा बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर प्रवेश केला होता. ‘जिस देश में गंगा रहता है’ (गोविंदा), ‘तेरा मेरा साथ है’ (अजय देवगण), ‘खाकी’ (अमिताभ बच्चन) यांच्याबरोबर काम करायची संधी त्यांना मिळाली. ‘चाल जाए पर वचन न जाए’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ या हिंदी चित्रपटांतही त्यांची भूमिका होती.

अत्यावश्यक वस्तूंची दुकाने 7 ते 11 खुली राहणार, तर सकाळी 7 ते रात्री 8 यावेळेत डोम डिलिव्हरी

राज्यातील सर्व किराणा, भाजी दुकाने, फळ दुकाने , डेअरी, बेकरी, कनफेकशनरी, सर्व खाद्य दुकाने ( चिकन, मटन, पोल्ट्री , फिश सह), कृषि उत्पादनशी संबंधित दुकाने , पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने, येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने ही दररोज सकाळी 7 ते सकाळी 11 या वेळेतच सुरू राहतील.


 





पेशव्यांचे वंशज आणि हिंदवी स्वराज्य महासंघाचे कार्याध्यक्ष महेंद्रसिंह पेशवा यांचे कोरोनामुळे निधन

पेशव्यांचे वंशज आणि हिंदवी स्वराज्य महासंघाचे कार्याध्यक्ष  महेंद्रसिंह पेशवा यांचे कोरोनामुळे निधन झाले. राज्यात कोरोनाचा विळखा आणखी गंभीर वळणावर 

पुणे : मार्केट यार्डजवळ पार्किंगमधे उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाने पेट घेतला

पुणे : मार्केट यार्ड जवळ गंगाधाम, फेज 2 येथे आज सकाळी पार्किंगमधे उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाने पेट घेतला. या संदर्भातली माहिती तातडीने अग्निशामक दलाला कळवण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेवर पोहोचत आग आटोक्यात आणली. कुठलीही जीवित हानी झाली नाही.

पुणे मार्केटयार्ड शनिवार- रविवार राहणार बंद, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय

मार्केटयार्ड मध्ये होणारी गर्दी लक्षात घेता कोरोना संक्रमणाची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळेच पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील किराणा, भाजीपाला, फळविभाग शनिवार रविवार बंद ठेवून इतर दिवस 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याचा निर्णय बाजार समितीने घेतलाय, यानुसार पुण्यातील मार्केटयार्ड मध्ये फळे भाजीपाला व्यापार दिवसाआड सुरु राहणार
मार्केटयार्ड मध्ये खरेदी आणि विक्रीसाठी होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने खबरदारी चा उपाय म्हणून परिसरातील गाळे दिवसाआड सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, उद्या म्हणजे बुधवारपासून होणार या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे

पीक कर्जाची रक्कम घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याची पैशाची थैली बाईकस्वारने पळविली 

मोताळा येथील स्टेट बँकेतून रमेश आत्माराम शिंबरे या शेतकऱ्याने 50 हजार रुपयांचे पीक कर्ज काढले होते. मोताळा शहरातील मुख्य रस्ता पार करताना मागून आलेल्या एका बाईकस्वाराने शिंबरे यांच्या हातातील पैशाची थैली हिसकावून घेतली आणि पसार झाला. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. अगोदरच कोरोनामुळे खचलेला हा शेतकरी या घटनेने हवालदिल झाला आहे. या घटनेची तक्रार बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

सोलापुरातील होटगी रोड विमानतळ परिसरात भीषण आग

सोलापुरातील होटगी रोड विमानतळ परिसरात पुन्हा एकदा भीषण आग लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. काल रात्री साडेअकराच्या सुमारास विमानतळ परिसरात आग लागली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. वाळलेले गवत आणि वाऱ्यामुळे आग झपाट्याने पसरत होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ दाखल झाल्या. जवळपास 5 गाड्या पाण्याचा मारा केल्यानंतर आग आटोक्यात आली. रात्री जवळपास 1 वाजेपर्यंत अग्निशमन दलाचे अधिकारी आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते. घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलीस दलातील अधिकारी देखील विमानतळ परिसरात दाखल झाले होते. मागील 10 ते 11 वर्षापासून हे विमानतळ बंद आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गवत वाढत असतं. मागील वर्षी देखील दोन वेळा विमानतळातील गवताला आग लागली होती. यंदा पुन्हा आग लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

पार्श्वभूमी

1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण, केंद्र सरकारचा मोठा निर्णय


कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत केंद्र सरकारने लसीकरणासंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व जण लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीत आज हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.  


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉक्टर, टास्क फोर्स आणि औषध निर्मिती कंपन्यांसोबत बैठक घेतली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. जास्तीत जास्त भारतीयांना कमीत कमी वेळेत लस दिली जावी यासाठी सरकार मागील एक वर्षापासून प्रयत्न करत आहे. देशात लसीकरण वेगाने सुरु आहे, पुढेही ही गती कायम राहणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.


सर्वांना कोरोनाची लस दिली जावी अशी मागणी देशभरातून केली जात आहे. लसीकरणाचा हा तिसरा टप्पा असणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स आणि 60 वर्षांवरील नागरिकांचा समावेश होता. तर दुसऱ्या टप्यात 45 वर्षांवरील सर्वांच लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.


भारतात अतापर्यंत 12.38 कोटीहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या


काल सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार भारतात 18,37,373 सत्राद्वारे लसीच्या 12,38,52,566 मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये 91,36,134 आरोग्य कर्मचारी ( पहिली मात्रा ), 57,20,048 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा ), 1,12,63,909 फ्रंट लाईन कर्मचारी ( पहिली मात्रा), 55,32,396 फ्रंट लाईन कर्मचारी (दुसरी मात्रा ), 60 वर्षावरील 4,59,05,265 लाभार्थी ( पहिली मात्रा ), 40,90,388 (दुसरी मात्रा ), 45 ते 60 वयोगटातल्या 4,10,66,462 ( पहिली मात्रा ) आणि 11,37,964 (दुसरी मात्रा )  यांचा समावेश आहे.


Johnson & Johnsonकडून भारतात लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी, परवान्यासाठी अर्ज दाखल


Johnson & Johnson ने भारत सरकारकडे आपल्या सिंगल डोस कोरोना वॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलसाठी परवानगी मागितली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने आयात लायसेंसचीही मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी भारत सरकारनं लसीकरण अभियान जलद करण्याच्या दृष्टीने विदेशी लसीच्या आपातकालीन वापरासाठी मंजुरी देण्याची प्रक्रिया अधिक जलद केली आहे.


कंपनीने आपल्या अर्जावर निर्णय घेण्यासाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना (सीडीएससीओ) च्या कोविड-19 वर विशेषज्ञ समितीची बैठक लवकर बोलावण्याचंही आवाहन केलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 एप्रिल रोजी 'सुगम' ऑनलाईन पोर्टलमार्फत 'ग्लोबल क्लिनिकल ट्रायल डिवीजन' मध्ये आवेदन करण्यात आलं होतं. यासंदर्भात सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही कारणांमुळे जॉनसन अॅन्ड जॉन्सनने सोमवारी पुन्हा अर्ज दाखल केला होता. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.