राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील
'सिल्वर ओक'वर पवार-अदानींमध्ये दोन तास बैठक; कोणत्या मुद्यांवर झाली चर्चा?
मागील काही महिन्यांपासून विविध कारणांनी चर्चेत असलेले उद्योजक गौतम अदानी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी बंद दाराआड चर्चा केली. मागील काही दिवसात राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणांवर घडल्या आहेत. विविध चर्चांना उधाण आले होते. त्या पार्श्वभूमीवर आज अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. वाचा सविस्तर
खारघर दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्या 14 पैकी 12 जण सात तासांपासून होते उपाशी, पोस्ट मॉर्टम अहवालातून धक्कादायक बाब उघड
खारघर दुर्घटनेबाबत महत्त्वाची बातमी आहे. दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्या 14 पैकी 12 जणांनी सहा ते सात तासांपासून काहीच खाललं नव्हतं, असं पोस्ट मॉर्टम अहवालात स्पष्ट झालं आहे. उर्वरित दोन जणांनी काही खाल्लं होतं की नाही ते स्पष्ट होऊ शकलेलं नाही. वाचा सविस्तर
उद्या शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचं शिबिर, प्रसिद्धीपत्रकात अजित पवारांचं नाव नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत उद्या घाटकोपरमध्ये विभागीय कार्यकर्ता शिबिर होणार आहे. या शिबीराच्या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीपत्रकात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे नाव नाही. त्यामुळं या कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित राहणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय. वाचा सविस्तर
आमदार नितीन देशमुखांची जलसंघर्ष यात्रा रोखली, कार्यकर्त्यांसह देशमुखांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख जल संघर्ष यात्रा घेऊन नागपूरच्या सीमेवर दाखल झाले आहेत. मात्र पोलिसांनी त्यांची संघर्ष यात्रा मध्येच अडवली आहे. आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. 10 एप्रिल रोजी अकोल्यातून यात्रेला प्रारंभ झाला होता. उद्या (21 एप्रिल) नितीन देशमुख आणि त्यांचे सहकारी खारपण पट्ट्यातील पाणी समस्येला घेऊन उपमुख्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर जाऊन आंदोलन करणार होते. मात्र, त्यापूर्वीच नितीन देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेतलं आहे. वाचा सविस्तर
नाशिकमध्ये बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे; औद्योगिक क्षेत्रात खळबळ
नाशिक शहरात (Nashik) एकाच वेळी 20 हून अधिक बांधकाम व्यावसायिकांच्या (Builder) कार्यालये, घरे, फार्म हाऊस आणि साईट कार्यालयांवर आयकर विभागाने (Income Tax Raid) छापे टाकल्याचे समोर आले आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून एकाच वेळी झालेल्या छापीमारीने बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. वाचा सविस्तर