Nitin Deshmukh : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Mla Nitin Deshmukh) जल संघर्ष यात्रा घेऊन नागपूरच्या (Nagpur) सीमेवर दाखल झाले आहेत. मात्र पोलिसांनी त्यांची संघर्ष यात्रा मध्येच अडवली आहे. आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. 10 एप्रिल रोजी अकोल्यातून यात्रेला प्रारंभ झाला होता. उद्या (21 एप्रिल) नितीन देशमुख आणि त्यांचे सहकारी खारपण पट्ट्यातील पाणी समस्येला घेऊन उपमुख्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर जाऊन आंदोलन करणार होते. मात्र, त्यापूर्वीच नितीन देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेतलं आहे. जवळपास 500 च्या वर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.


पोलिस देशमुखांना घेऊन अकोल्याच्या दिशेनं 


आमदार नितीन देशमुख यांच्या संघर्ष यात्रेला नागपूरच्या सीमेवर धामना या गावात पोलिसांनी स्थानबद्द केले होते. यावेळी त्या परिसरात मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अखेर पोलिसांनी आमदार देशमुखांसह त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. पोलिस आता देशमुखांना घेऊन अकोल्याच्या दिशेनं रवाना झाले आहेत. 10 एप्रिलला नितीन देशमुख यांची जल संघर्ष यात्रा सुरु झाली होती. उद्या ही यात्रा फडणवीस यांच्या घरासमोर पोहोचणार होती. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी आमदार नितीन देशमुखांसह त्यांच्या कार्यकर्त्यांना अडवून ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी कायद्याचा दुरुपयोग करत आम्हाला मारहाण केली. माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांवर गृहमंत्री फडणवीस यांचा प्रचंड दवाब आहे. मात्र, काहीही झालं तरी आम्ही माघार नसल्याचे देशमुख म्हणाले.


यात्रेनं 250 किलोमीटरचे अंतर केलं होत पार 


पोलिसांनी आधीच सर्व तयारी केली होती. मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अखेर देशमुखांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं. खारपण पट्ट्यातील पाणी समस्येला वाचा फोडण्यासाठी त्यांनी ही यात्रा सुरु केली होती. या यात्रेनं 250 किलोमीटरचे अंतर पार केलं होतं. अद्याप 30 किलोमीटर अंतर जाणं बाकी होतं. त्यापूर्वीच कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.  


आमदार देशमुखांच्या अटकेनंतर संजय राऊतांचं ट्वीट


आमदार नितीन देशमुख यांनी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करुन राज्य सरकारवर टीका केली आहे. पाणी प्रश्नावर अकोला ते नागपूर  यात्रा काढणाऱ्या आमदार नितीन देशमुखांना अटक झाली आहे. नागपूरच्या हद्दीबाहेर पोलिसांनी रोखले. खारघर येथे श्रीसेवक पाण्याशिवाय तडफडून मारले. आता विदर्भात पाणी पाणी आक्रोश केला म्हणून अटक केले. महाराष्ट्रात जणू मोगलाई अवतरली आहे. सरकार जनतेलाच घाबरु लागल्याचे संजय राऊतांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Nitin Deshmukh ACB Inquiry : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांची आज ACB कडून चौकशी, देशमुख शक्तिप्रदर्शन करणार