एक्स्प्लोर
ब्रेडच्या किमतीत वाढ, मोठा लोफ चार रुपयांनी महाग
400 ग्रॅम लोफची किंमत साधारण 22 रुपयांवरुन 25 वर पोहचली आहे, तर 800 ग्रॅमचा लोफ 44 रुपयांवरुन 48 वर गेला आहे.
मुंबई : सँडविच असो वा ऑम्लेट, नाश्ता असो किंवा जेवण, ब्रेड हा अनेकांसाठी पोट भरताना आधार ठरतो. मात्र याच ब्रेडच्या किमती वाढल्या आहेत. ब्रेडचा लहान लोफ तीन रुपयांनी, तर मोठा लोफ चार रुपयांनी महागला आहे.
विब्स, ब्रिटानिया, मॉडर्न यासारख्या अनेक मोठ्या कंपनींनी आपल्या ब्रेडच्या किमती वाढवल्या आहेत. 400 ग्रॅम लोफची किंमत साधारण 22 रुपयांवरुन 25 वर पोहचली आहे, तर 800 ग्रॅमचा लोफ 44 रुपयांवरुन 48 वर गेला आहे. लवकरच स्थानिक बेकरीमालकही ब्रेडच्या किमती वाढवू शकतात.
मैद्याच्या वाढत्या किमती आणि प्लास्टिकबंदी यांचा फटका ब्रेडला बसल्याचं म्हटलं जातं. 50 किलोची मैद्याची पोती 1150 रुपयांवरुन 1300 रुपयांवर गेल्यामुळे ब्रेडच्या किमतींवर परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे ब्रेड निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर इकोफ्रेण्डली प्लास्टिक वापरणं कठीण जात असल्याचं ब्रेड मॅन्युफॅक्चरर सांगतात.
सर्वसामान्यांसोबतच रस्त्याशेजारी खाद्यपदार्थ विकणाऱ्यांनाही ब्रेडच्या वाढत्या किमतीचा फटका बसण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे साहजिकच विविध प्रकारची सँडविचेस, ब्रेड पकोडा-कटलेट आणि तत्सम पदार्थ महागण्याची चिन्हं आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
Advertisement