एक्स्प्लोर
बर्थडे गिफ्ट जीवावर, सेल्फी घेताना मुंबईत तरुणाचा मृत्यू
मिरा रोड : सेल्फीच्या वेडापायी मुंबईत आणखी एका तरुणाला जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे. यंदाच्या वाढदिवसाला वडिलांनी दिलेलं मोबाईल फोन हे गिफ्टच त्याच्या मृत्यूचं कारण ठरलं आहे.
मिरा रोडला राहणाऱ्या 13 वर्षीय मोहम्मद खानचा 24 ऑक्टोबर रोजी वाढदिवस होता. नवीन मोबाईलमधून सेल्फी काढण्यासाठी 4 नोव्हेंबरला मोहम्मद आणि त्याचे मित्र मिरा रोड स्टेशनवर आले. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर उभा राहून मोहम्मद सेल्फी घेत होता.
त्यावेळी आलेल्या एक्स्प्रेसच्या वेगाचा त्याला अंदाज आला नाही आणि मोहम्मदच्या शरीराच्या चिंधड्या करत ट्रेन निघून गेली. झाल्या प्रकारानं घाबरलेल्या त्याच्या मित्रांनी कोणालाच काही न सांगता तिथून पळ काढला.
मोहम्मद घरी परतला नाही म्हणून त्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. त्याचा तपास सुरु असताना तीन दिवसांनंतर मोहम्मदच्या मित्राच्या घराजवळच्या सीसीटीव्हीत मोहम्मद येताना दिसला. अधिक चौकशी केली असता त्याच्या मित्रांनी सगळी हकिकत सांगितली आणि हा प्रकार उघड झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
रायगड
Advertisement