एक्स्प्लोर

शिक्षणासाठी टॅब घेऊन दिला नाही म्हणून सतरा वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

ऑनलाईन शिक्षणासाठी टॅब घेऊन दिला नाही म्हणून सतरा वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या केली. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील भोजगावमध्ये ही घटना घडली.

बीड : कोरोनामुळे सगळीकडे शाळा बंद असल्याने ऑनलाईन शिकवणीवर भर दिला जात आहे. मात्र, ऑनलाइन शिक्षणासाठी घरच्यांनी टॅब घेऊन दिला नाही म्हणून एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. अभिषेक संत, असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव असून गेवराई तालुक्याच्या भोजगावमध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे ऑनलाईन शिक्षणावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

अभिषेकने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. पुढील शिक्षणासाठी त्याला टॅब हवा होता. टॅब घेऊन देण्यासाठी अभिषेक आपल्या वडिलांपाशी रोज हट्ट धरत असे. गेवराईच्या भोजगावमध्ये राहणाऱ्या संत कुटुंबीयांची घरची परिस्थिती जेमतेम असल्याने अभिषेक इयत्ता पाचवीपासून नगर जिल्ह्यात एका वसतिगृहात राहून शिक्षण घेत होता. लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाल्या आणि अभिषेक आपल्या गावी परतला. केवळ संत कुटुंबातच नाही तर गावात सुद्धा अभिषेक हुशार मुलांमध्ये गणला जायचा.

नवउद्योजकांसाठी 'विको'चे संजीव पेंढारकरांचा उपक्रम, ऑनलाईन कोर्सच्या माध्यमातून मार्गदर्शन

आई-वडील उसतोड कामगार अभिषेकचे कुटुंबीय दरवर्षी उसतोडणीला जातात. यातूनच त्यांनी आपल्या दोन मुलांचं शिक्षण पूर्ण केलं आहे. मात्र, सध्या पेरणीचे दिवस असल्याने घरात आर्थिक अडचण होती. शाळा सुरू झाली नाही म्हणून टॅब घेण्यासाठी घरचे देखील चालढकल करत होते. कोरनामुळे आधीच अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. आपल्या पोराला चांगलं शिक्षण मिळावं असं कोणत्या आई-बापाला वाटत नाही? पोटाला चिमटा घेऊन पै-पै करुन आपल्या पोटच्या गोळ्याला मोठं करण्याचे स्वप्न याही आईवडिलांनी बघितलं होतं. पण मोबाईल टॅब सारख्या शुल्लक गरजेला अभिषेक बळी पडला अन् त्याने आयुष्य संपवले.

शिक्षण विभागाकडून ऑनलाईन शिक्षणासाठी गाईडलाइन्स तयार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात शाळा व महाविद्यालये सुरु करता येणार नसल्याने नवं शैक्षणिक वर्षाची सुरुवात डिजिटली, ऑनलाईन पद्धतीने सुरु करणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. शाळांनी सुरु केलेल्या ऑनलाईन वर्गाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर आणि सुरक्षिततेवर होऊ नये, यासाठी काही गाईडलाईन्स शिक्षण विभागाकडून तयार करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप या सूचनांचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला असून त्यांची परवानगी मिळाल्यानंतर हे निर्देश शाळा व इतर शैक्षणिक संस्थांना जारी करण्यात येणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

Pune Suicide | पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांची गळफास घेऊन आत्महत्या

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Amol Mitkari: 'शब्दाला किंमत असते, तो पाळला गेला तर विश्वास वाढतो'; अमोल मिटकरींनी फडणवीसांना 'त्या' वचनाची आठवण करुन दिली, म्हणाले...
'शब्दाला किंमत असते, तो पाळला गेला तर विश्वास वाढतो'; अमोल मिटकरींनी फडणवीसांना 'त्या' वचनाची आठवण करुन दिली, म्हणाले...
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Sanjay Raut: हे कसले जेन -Z? यात सगळी भाजप अन् संघ परिवारातली मुलं आणि नातवंड; मोहन भागवतांच्या मुंबईतील संवाद कार्यक्रमावरून संजय राऊतांच्या हल्लाबोल
हे कसले जेन -Z? यात सगळी भाजप अन् संघ परिवारातली मुलं आणि नातवंड; मोहन भागवतांच्या मुंबईतील संवाद कार्यक्रमावरून संजय राऊतांच्या हल्लाबोल
Tukaram Mundhe: नियमानुसार काम जमत नसेल तर राजीनामे देऊन घरी जा! तुकाराम मुंढे एफडीएच्या 29 कर्मचाऱ्यांना इशारा
नियमानुसार काम जमत नसेल तर राजीनामे देऊन घरी जा! तुकाराम मुंढे एफडीएच्या 29 कर्मचाऱ्यांना इशारा

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Embed widget