एक्स्प्लोर
नवी मुंबईत पार्किंगविना फ्लॅटला परवानगी नाही : हायकोर्ट

मुंबई: नवी मुंबईतील ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. यावर उपाय म्हणून यापुढे कोणत्याही नवीन बांधकामांना परवानगी देताना, बिल्डर्सना प्रत्येक फ्लॅटमागे किमान एक पार्किंग देणं बंधनकारक करा, अन्यथा त्यांना बांधाकामाची परवानगी देऊ नका, असे आदेश मुंबई हायकोर्टाने महापालिकेला दिले.
मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर आणि एम एस सोनाक यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले.
पार्किंगसाठी जागा नसल्याने लोक रस्ते आणि फुटपाथासारख्या सार्वजनिक ठिकाणी गाड्या पार्क करतात. त्याचा फटका ट्रॅफिकला बसतो. वारंवार तक्रार आणि निर्देश देऊनही नवी मुंबई महापालिकेनं यावर काहीच उपाययोजना केली नाही. त्यामुळे अखेरीस सामाजिक कार्यकर्ता संदीप ठाकूर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली.
यावर एक फ्लॅट एक पार्किंग, हा नियम सक्तीचा करूनच नवीन बांधकामांना परवानगी देण्याचे आदेश, मुंबई उच्च न्यायालयानं नवी मुंबई महापालिकेला दिलेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
