राहुल गांधी आक्षेपार्ह ट्विट प्रकरण! याचिकेवरील सुनावणी पूर्ण, मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय ठेवला राखून
आक्षेपार्ह ट्विट प्रकरणी मानहानीचा खटला रद्द करण्याच्या मागणीसाठी लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली आहे.
मुंबई : आक्षेपार्ह ट्विट प्रकरणी मानहानीचा खटला रद्द करण्याच्या मागणीसाठी लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. याप्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने राहुल गांधींना बजावलेल समन्स रद्द करण्यासाठी तसेच खटल्याची प्रक्रिया रद्द करण्यासाठी राहुल गांधींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आपल्या विधानात (ट्विट) भाजप अथवा कोणत्याही राजकीय पक्षाचा उल्लेख नसल्याचा दावा करत राहुल गांधींनी भाजपच्या कार्यकर्त्याने दखल केलेल्या तक्रारीच्या मेंटेनेब्लिटीवर (ग्राह्यतेवर) प्रश्न उपस्थित केला आहे.
राहुल गांधी यांनी "चोरो के सरदार" आणि "कमांडर-इन-थिफ" असे शब्द वापरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष केल्याचा आणि ते भाजपचे नेते असल्यामुळे "चोरो के सरदार" हा शब्द पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याविरुद्ध असल्याचा तक्रारदार महेश श्रीश्रीमल यांचा युक्तिवाद आहे.
नेमकं प्रकरण काय?
राफेल करारावरून काँग्रेस आणि भाजप दरम्यान ऐकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारो सुरु होते. यावेली काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. या ट्विटमध्ये राहुल यांनी मोदींना 'चोरांचा सरदार' (कमांडर इन थीफ) संबोधून जोरदार हल्ला चढवला होता. कमांडर इन थीफ हे शब्द वापरताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा ट्वीटमध्ये कोणताही उल्लेख केला नव्हता. यानंतर भाजपानेही राहुल गांधी यांच्यावर कडाडून टीका केली. राहुल गांधी यांना काहीही कळत नाही. ते पढवून दिल्यासारखे बोलतात. देशाच्या पंतप्रधानाबाबत एकाही पक्षाच्या अध्यक्षाने कधीही अशाप्रकारे शब्द वापरून इतक्या खालच्या पातळीची टीका केलेली नाही. राहुल गांधी यांनी यावेळी मर्यादा सोडली असे केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं होतं.
भिवंडीत भाजप महिला मोर्चा कडून राहुल गांधी यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन
AI समिटदरम्यान काँग्रेसकडून गोंधळ घातल्याचा आरोप करत भाजपकडून भिवंडीत निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व भाजप भिवंडी महिला मोर्चाच्या अध्यक्षा कल्पना शर्मा यांनी केले. कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या पोस्टरवर जोडे मारून संताप व्यक्त केला तसेच काँग्रेसच्या भूमिकेचा तीव्र निषेध नोंदवला. AI समिटमध्ये झालेल्या कथित गोंधळामुळे देशाची प्रतिमा खराब होत असल्याचा आरोप करत अशा प्रकारांना भाजपकडून विरोध कायम राहणार असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
Before You Go
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
महत्त्वाच्या बातम्या





















