Parbhani : बंद खोलीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह, परभणीतील घटनेने खळबळ
Parbhani : बंद खोलीत पती-पत्नीचे मृतदेह सापडले आहेत. परभणीतील सेलूमधील घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Parbhani News Update : तीन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या जोडप्याचे राहत्या घरी मृतदेह आढळले आहेत. परभणी जिल्ह्यातील सेलूमध्ये ही घटना घडली असून या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या जोडप्याने आत्महत्या केली आहे की, त्यांचा घातपात झाला हे अद्याप समजू शकले नाही. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
परभणी येथील सेलूमध्ये ऑटो रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत असलेल्या गणेश अर्जुन अवटे याचा विवाह तीन वर्षांपूर्वी 28 वर्षीय प्रियांका यांच्याशी झाला होता. हे दोघेही सेलुच्या राजीव गांधी नगर येथे राहत होते. आज सकाळी गणेश आणि प्रियांका दोघेही झोपेतून उठले नाहीत ही बाब गणेशच्या बहिणीच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी तत्काळ ही गोष्ट त्यांच्या वडिलांना सांगितली.
गणेश यांच्या वडिलांनी त्याच्या खोलीचा दरवाजा तोडला. यावेळी घरात गणेशचा त्याच्या खोलीतील एका रॉडला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. तर त्याची पत्नी प्रियांका हिचा मृतदेह पलंगावर आढळून आला. गणेश याच्या वडिलांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.
दरम्यान, गणेश आणि प्रियांका यांनी आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला, याचा पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा लवकरात लवकर तपास करावा, अशी मागणी गणेश याच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Mumbai : प्रेयसीनं लग्नाला नकार दिला म्हणून तिच्या सात महिन्यांच्या भावाचा जीव घेतला! मुंबईतील धक्कादायक घटना
- Ulhasnagar: उल्हासनगरमध्ये उधारी मागितली म्हणून चायनिज विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला
- बीडमध्ये दोन तरुणांना 20 ते 25 जणांच्या टोळक्याकडून मारहाण, शहरात दहशतीचे वातावरण
- घर नावावर करण्यासाठी चक्क न्यायाधीशांच्या बनावट सही, शिक्याचा वापर; गुन्हा दाखल