एक्स्प्लोर
Advertisement
BMC Election 2017 : 10 महापालिकांसाठी 56% मतदान
मुंबई : राज्यातील 10 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सरासरी 56.30 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर 11 जिल्हा परिषदा आणि 118 पंचायत समित्यांसाठी सरासरी 69.43 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी दिली.
21 फेब्रुवारीला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान झाले. गडचिरोली जिल्ह्यातील 4 पंचायत समित्या आणि त्या अंतर्गतच्या निवडणूक विभागात मात्र सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती.
यवतमाळ जिल्हा परिषदेचे 6 निवडणूक विभाग व पंचायत समितीच्या 12 निर्वाचक गणांत 73 टक्के; तर वर्धा जिल्हा परिषदेच्या 2 निवडणूक विभागात व पंचायत समितीच्या 4 निर्वाचक गणांत 68.99 टक्के मतदान झाले. काही किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत पार पडली.
महानगरपालिकेच्या मागील निवडणुकांत सरासरी 52 टक्के; तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांत सरासरी 68.99 टक्के मतदान झाले होते.
प्राथमिक अंदाजानुसार महानगरपालिकानिहाय मतदानाची टक्केवारी :
बृहन्मुंबई- 55.28 %
ठाणे- 58.11 %
उल्हासनगर- 50 %
पुणे- 55.5 %
पिंपरी-चिंचवड- 67 %
सोलापूर- 59.57%
नाशिक- 61.60%
अकोला- 55.91%
अमरावती- 55%
नागपूर- 53%
एकूण सरासरी- 56.30
प्राथमिक अंदाजानुसार जिल्हा परिषदनिहाय (पंचायत समित्यांसह) मतदानाची टक्केवारी :
रायगड- 71
रत्नागिरी- 64
सिंधुदुर्ग- 70
नाशिक- 68
पुणे- 70
सातारा- 70
सांगली- 65
सोलापूर- 68
कोल्हापूर- 70
अमरावती- 67
गडचिरोली- 68
सरासरी- 69.43
राज्यातील 10 महापालिका आणि 11 जिल्हा परिषदांसाठी मोठ्या उत्साहात मतदान झालं. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
विशेष म्हणजे यंदा मुंबईसह सर्वच महापालिकेच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे वाढलेल्या टक्केवारीचा फायदा कुणाला होतो आणि फटका कुणाला बसतो हे पाहणं महत्वाचं आहे.
या सर्वच महापालिकांसाठी येत्या 23 तारखेला सकाळी दहा वाजता मतमोजणी केली जाणार आहे.
मुंबईसह राज्यातील 10 पालिकांमध्ये 1268 जागांसाठी तब्बल 9 हजार 208 उमेदवार रिंगणात आहेत. तब्बल 21 हजार पोलिंग स्टेशनवर मतदान पार पडलं.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती
जिल्हा परिषदांच्या दुसऱ्या टप्प्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती आणि गडचिरोली इथं जिल्हा परिषदांचं मतदान झालं. मतदान भीतीमुक्त आणि चांगल्या वातावरणात पार पडावं यासाठी 33 हजार लोकांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
LIVE UPDATE 5.30 : मतदानाची वेळ संपली. मुंबईत दुपारी 3.30 पर्यंत मुंबईत 41.32 टक्के मतदानाची नोंद. नागपूर 4 पर्यंत 45 % मतदानाची नोंद
LIVE UPDATE : मुंबईकर यंदा मतदानाच्या टक्केवारीची नवी नोंद करण्याच्या तयारीत आहेत. कारण दुपारी 3.30 पर्यंत मुंबईत 41.32 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. गेल्यावेळी म्हणजेच 2012 मध्ये 44.75 टक्के इतकीच मतदानाची टक्केवारी नोंदवण्यात आली होती. त्यामुळे यंदा हा आकडा वाढण्याची चिन्हं आहे.
LIVE UPDATE : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमीर खान आणि मुंबई फर्स्ट एनजीओविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार, प्रचाराची वेळ संपल्यानंतरही मुलाखत देऊन सेनेची बदनामी होत असल्याचा आरोप, युवासेनेचे पदाधिकारी धर्मेंद्र मिश्रा यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार
LIVE UPDATE : महानगरपालिका निवडणुकांसाठी दुपारी 3.30 पर्यंतची मतदानाची टक्केवारी :
मुंबई- 41.32
ठाणे- 45.05
उल्हासनगर- 24.83
नाशिक- 43.33
पुणे- 43.00
पिंपरी चिंचवड- 43.80
सोलापूर- 43.00
अमरावती- 34.37
अकोला- 46.30
नागपूर- 40.00
सरासरी-
LIVE UPDATE : महानगरपालिका निवडणुकांसाठी दुपारी 1.30 पर्यंतचे मतदानाचे प्रमाण :
मुंबई- 32.17
ठाणे- 35.11
उल्हासनगर- 24.83
नाशिक- 30.63
पुणे- 30.52
पिंपरी चिंचवड- 30.86
सोलापूर- 32.00
अमरावती- 31.62
अकोला- 32.39
नागपूर- 29.95
सरासरी- 31.01
UPDATE : मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत 32.17 टक्के मतदान
LIVE UPDATE : पिंपरी चिंचवड शहरात विक्रमी मतदान, 1.30 वाजेपर्यंत 35.50 टक्के मतदानाची नोंद
UPDATE : ठाणे : अंबिका नगरमधील प्रभाग क्रमांक 17 मध्ये पैसे वाटताना काँग्रेसचे माजी नगरसेवक शहाजी जावीर यांना मारहाण, जावीर यांना वागळे इस्टेट पोलिसांनी ताब्यात घेतले
UPDATE : महानगरपालिका निवडणुकांसाठी सकाळी 11.30 पर्यंतचे मतदानाचे प्रमाण :
बृहन्मुंबई- 16.04
ठाणे- 19.30
उल्हासनगर- 12.87
नाशिक- 18.54
पुणे- 17.61
पिंपरी चिंचवड- 20.73
सोलापूर- 17.00
अमरावती- 19.58
अकोला- 19.24
नागपूर- 16.00
सरासरी- 17.07
UPDATE : सत्यजित भटकळ मतदानापासून वंचित, मतदार यादीत नाव नसल्याचा भटकळ यांना फटका
UPDATE : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात मतदानाचा हक्क बजावला
UPDATE : सकाळी 11.30 वाजेपर्यंत कुठे किती मतदान?
- नागपूर - 16 टक्के
- पुणे - 19.5 टक्के
- पिंपरी चिंचवड - 20.73 टक्के
- नाशिक - 18.50 टक्के
- ठाणे - 19.11 टक्के
- मुंबई - 16.40 टक्के
- उल्हासनगर - 12.43 टक्के
- अमरावती - 19.21 टक्के
UPDATE : ठाण्यात सकाळी 11.30 पर्यंत 19.11 टक्के मतदान
UPDATE : दहा महापालिकांसाठी सकाळी 9.30 पर्यंत मतदानाची टक्केवारी
- मुंबई : 8.07 टक्के
- ठाणे : 10 टक्के
- उल्हासनगर : 5.97 टक्के
- नाशिक : 7.15 टक्के
- पुणे : 10 टक्के
- पिंपरी चिंचवड : 7 टक्के
- सोलापूर : 9.5 टक्के
- अमरावती : 7 टक्के
- अकोला : 9 टक्के
- नागपूर : 9 टक्के
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
क्राईम
Advertisement