एक्स्प्लोर
नागपूरच्या महापौरपदी भाजपच्या नंदा जिचकार विराजमान
नागपूर : महाराष्ट्राच्या उपराजधानीला महापौर मिळाला आहे. नागपूरच्या महापौरपदी भाजपच्या नंदा जिचकार विराजमान झाल्या आहेत. उपमहापौरपदी भाजपच्या दीपराज पार्डीकर यांची निवड झाली आहे. नागपूर महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे जिचकार यांची निवड ही केवळ एक औपचारिकता होती.
महापौरपदाच्या मतदानावेळी नंदा जिचकार यांना 108 मतं मिळाली, तर काँग्रेसतर्फे महापौरपदाच्या उमेदवार असलेल्या स्नेहा निकोसे यांना 26, तर बसपच्या उमेदवार वंदना चांदेकर यांना 10 मतं मिळाली. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया संपन्न झाली.
नागपूरचे उपमहापौर दीपराज पार्डीकर
उपमहापौरपदाच्या मतदानावेळी भाजपच्या दीपराज पार्डीकर यांना 108, बसपच्या नरेंद्र वालदे यांना 10 तर काँग्रेसच्या नितीश ग्वालबन्सी यांना 28 मतं मिळाली.
नागपूर महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. पालिकेत भाजपचे 108 नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपची ही सर्व मतं जिचकार यांना मिळाली आहेत. काँग्रेसचे हरीश ग्वालवंशी उशिरा आल्याने मतदान करु शकले नाहीत. मात्र काँग्रेसचे 29 नगरसेवक निवडून येऊनही काँग्रेसला 26 च मतं मिळाली आहेत.
नागपूर महापालिका
- भाजप - 108
- शिवसेना - 2
- काँग्रेस - 29
- राष्ट्रवादी - 1
- मनसे - 0
- इतर - 11
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
क्राईम
करमणूक
Advertisement