एक्स्प्लोर

Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी मांडली कैफियत; थेट पत्र लिहून वाचला तक्रारींचा पाढा

Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी थेट पत्र लिहून वाशिम जिल्ह्यातील पक्षाची कैफियत मांडली आहे. यावेळी पत्रातून अनेक तक्रारींचा पाढा वाचलाय.

Washim News वाशिम : लोकसभा निवडणुकीमध्ये (Maharashtra Loksabha Election2024) महाराष्ट्रात महायुतीचा दारुण पराभव झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या या घोषणेने भाजपसह (BJP) महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ही घोषणा करुन एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याचीही चर्चा आहे. हा निर्णय घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी एकप्रकारे डॅमेज कंट्रोल करुन विरोधकांच्या टीकेची धार बोथट करुन टाकल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाऊन अमित शाह (Amit Shah) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी पोहोचले. अमित शाहांसोबत झालेल्या भेटीनंतर मोठा निर्णय झाला असून देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची विनंती फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपदी कायम राहून देवेंद्र फडणवीस हे आता पक्षसंघटनेसाठी काम करणार आहेत.

तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या या निर्णयाला कडाडून विरोध करत पक्षातील कैफियत मांडली आहे. यासाठी वाशिम जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून  तक्रारींचा पाढा वाचला आहे. सध्या या पात्रांची चांगलीचे चर्चा जिल्ह्यात रंगतान दिसत आहे.

नेमके पत्रात काय म्हटले आहे? 

या पत्रात वाशिम जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या दहा वर्षांत वाशिम जिल्ह्यात भाजप पक्षाची वाताहत होट असताना आम्ही जवळून पाहत असून जिल्ह्यातील काही दिवंगत नेत्यांनी आपला खूप दिवस गैरसमज केल्याचे म्हटले आहे. वाशिम जिल्ह्यात अनेक अनुभवी आणि  कर्तृत्ववान कार्यकर्ते मोठे न करता, रिसोडच्या नेत्याला आणि त्याच्या अकार्यश्रम पोराला पक्षात घेतलं आणि रिसोड-मालेगावची धुरा त्यांचा कडे दिली. त्याचा परिणाम असा झाला की, त्यांनी रिसोड- मालेगावमध्ये आपलीच हुकूमशाही चालू केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

ज्या रिसोड मालेगावमध्ये आपण  2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड लीड घेतली होती, आजी ती लीड 2024 च्या निवडणुकीत 4 पट मागे आली. पाटणी कुटुंबाला 2014 मध्ये पक्ष संघठनेची धुरा दिली. त्यांनी भाजप म्हणजे आपल्या घरची जहागिरी समजून, पक्षात आपल्या आमदारकीचा फायदा होईल अशाच नियुक्त्‌या केल्या. चांगले कार्यकर्ते अक्षरशः संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही यात करण्यात आला आहे. 

अन् जिल्ह्यातून विरोधी उमेदवाराने घेतली जास्त लीड

वाशिम जिल्ह्यात अनेक उत्तम संघठन चालवू शकणारे कार्यकर्ते असतांना दिवंगत नेत्यानी आपला गैरसमज करून अकार्यक्षम जिल्हा अध्यक्ष वाशिम जिल्ह्यावर लादला. मात्र जिल्हा अध्यक्ष पक्ष वाऱ्यावर सोडून फक्त एका परिवाराची चाकरी करतो. त्याचा स्वतःच्या गावात लोकसभा निवडणुकीत आपण मतदानात मागे आहोत. निवडणुकीच्या काळात जिह्याची दशातर फार खराब होती, बूथ किट सुद्धा कार्यकर्तांन पर्यंत पोहचविण्याच नियोजन अध्यक्ष सक्रिय राहून करू शकले नाहीत, परिणाम आपल्या समोर आहेतच यवतमाळ-वाशिम लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त लीड विरोधी उमेदवाराने वाशिम जिल्ह्यातून घेतली. असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. आता या पात्राची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर तिसऱ्या दिवशीही इंद्रायणी फेसाळलेलीच; प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दावा पुन्हा फोल
मुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर तिसऱ्या दिवशीही इंद्रायणी फेसाळलेलीच; प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दावा पुन्हा फोल
Salman Khan Firing Case : 'भाईजान'ला संपवण्यासाठी तुर्कीचे पिस्तुल, 25 लाखांची सुपारी; बिष्णोई गँगविरोधात आरोपपत्र दाखल
'भाईजान'ला संपवण्यासाठी तुर्कीचे पिस्तुल, 25 लाखांची सुपारी; बिष्णोई गँगविरोधात आरोपपत्र दाखल
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
Drone on Manoj Jarange house: अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचा मुक्काम असलेल्या घरावर ड्रोनच्या घिरट्या, गावकऱ्यांची पोलिसांत तक्रार
मध्यरात्री आकाशात ड्रोनची घरघर ऐकू येताच मनोज जरांगे घराच्या गच्चीवर गेले अन्....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9:00AM : 2 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 02 JULY 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 8 AM:  02 JULY  2024Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा :  7:30 AM:  02 JULY  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर तिसऱ्या दिवशीही इंद्रायणी फेसाळलेलीच; प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दावा पुन्हा फोल
मुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर तिसऱ्या दिवशीही इंद्रायणी फेसाळलेलीच; प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दावा पुन्हा फोल
Salman Khan Firing Case : 'भाईजान'ला संपवण्यासाठी तुर्कीचे पिस्तुल, 25 लाखांची सुपारी; बिष्णोई गँगविरोधात आरोपपत्र दाखल
'भाईजान'ला संपवण्यासाठी तुर्कीचे पिस्तुल, 25 लाखांची सुपारी; बिष्णोई गँगविरोधात आरोपपत्र दाखल
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
Drone on Manoj Jarange house: अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचा मुक्काम असलेल्या घरावर ड्रोनच्या घिरट्या, गावकऱ्यांची पोलिसांत तक्रार
मध्यरात्री आकाशात ड्रोनची घरघर ऐकू येताच मनोज जरांगे घराच्या गच्चीवर गेले अन्....
Akshay Kumar :  हिट चित्रपटासाठी आसुसलेल्या अक्षय कुमारच्या चित्रपटाचा रिलीज आधीच विक्रम
हिट चित्रपटासाठी आसुसलेल्या अक्षय कुमारच्या चित्रपटाचा रिलीज आधीच विक्रम
Juhi Chawla On Shahrukh Khan : 'क-क-क किरण'कसा झाला  बॉलिवूडचा आयकॉनिक डायलॉग? जुही चावलाने सांगितला किस्सा
'क-क-क किरण'कसा झाला बॉलिवूडचा आयकॉनिक डायलॉग? जुही चावलाने सांगितला किस्सा
कुठे रोहित शर्मा अन् कुठे तू.. शाहिद आफ्रिदी बाबर आझमवर भडकला, म्हणाला... 
कुठे रोहित शर्मा अन् कुठे तू.. शाहिद आफ्रिदी बाबर आझमवर भडकला, म्हणाला... 
Team India : रोहित शर्मानंतर सलामीला कोण येणार? पाच दावेदार चर्चेत 
Team India : रोहित शर्मानंतर सलामीला कोण येणार? पाच दावेदार चर्चेत 
Embed widget