एक्स्प्लोर

BJP : भाजप स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वारसांचा सन्मान करणार? रणजित सावरकर यांना आमदारकी मिळण्याची शक्यता

Ranjit Savarkar : रणजित सावरकर यांच्या नावाचा राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत समावेश होण्याची शक्यता आहे. 

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या वारसांना संधी देण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वारस रणजित सावरकर यांना आमदारकी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत रणजित सावरकर यांचा समावेश होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

संघ आणि दिल्लीतील नेत्यांची रणजित सावरकर यांच्या नावाला पसंती असल्याची माहिती असून रणजित सावरकर यांना संधी देऊन हिंदुत्व अधिक बळकट करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या नावाला सहमती देतील अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. 

महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या काळात 12 नावांची यादी राज्यपालांकडे दिली होती. राज्यपालांनी त्यावर कोणताही निर्णय घेतला नव्हता. आता राज्य सरकार बदलल्यानंतर नव्या सरकारकडून नवी यादी राज्यपालांना देण्यात येणार आहे. 

रणजित सावरकर यांच्याविषयी थोडक्यात
रणजित सावरकर हे व्यवसायाने इंजिनियर आहेत. सुरुवातीला त्यांनी महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये सहाय्यक प्रबंधक म्हणून काम केले. आपद व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ते जिल्हाधिकारी यांच्यात थेट व्हिडीओ संपर्क व्हावा यासाठी स्थापन केलेल्या उपग्रह संपर्क यंत्रणेच्या संरचनेत त्यांचा मोलाच्या सहभाग होता.

रणजित सावरकर यांनी 'सावरकर स्मारक डॉट कॉम' या संकेतस्थळाची निर्मिती केली. त्यावर सावरकरांचं मराठी आणि इंग्रजी साहित्य निःशुल्क उपलब्ध आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी 12 भारतीय भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आलेले सावरकर साहित्य स्मारकाच्या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध होईल. आता ब्रेल लिपीतही सावरकर साहित्य उपलब्ध आहे.

महत्त्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Maharashtra Live blog updates: ठाणे रेल्वे स्थानकात RTO चे भरारी पथक हजर; मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर होणार कारवाई
Maharashtra Live blog updates: ठाणे रेल्वे स्थानकात RTO चे भरारी पथक हजर; मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर होणार कारवाई
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Embed widget