एक्स्प्लोर

ED : भाजपने इक्बाल मिर्चीच्या कंपनीकडून देणगी घेतली? अनिल गोटे आज करणार ईडीकडे तक्रार

BJP : भाजपने मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मिर्चीशी संबंधित कंपनीकडून निवडणूक निधी घेतला असल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.

Anil Gote on BJP : 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी इक्बाल मिर्चीशी संबंधित कंपनीकडून भाजपने देणगी घेतला असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. याबाबत अनिल गोटे आज ईडीकडे तक्रार दाखल करणार आहेत. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मालमत्तेचा व्यवहार केल्याचा आरोप आहे. मलिक सध्या मनी लाँड्रिंगच्या आरोपात ईडीच्या कोठडीत आहेत. 

आजपासून, राज्याचे विधीमंडळ अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात विरोधी पक्ष भाजपकडून नवाब मलिक आणि अंडरवर्ल्ड संबंधाचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे. आता, भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांच्याकडून भाजप आणि इक्बाल मिर्चीच्या संबंधाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे.

अनिल गोटे यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर सन 2014-15 मध्ये इक्बाल मिर्चीशी संबंधित असलेल्या कंपनीकडून भाजपला 10 कोटींची देणगी मिळाली होती. 

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा उजवा हात असलेला आणि 1993 च्या मुंबई बाॅम्बस्फोट खटल्यातील मुख्य आरोपी इक्बाल मिर्चीशी संबंधित असलेल्या RKW Developers Pvt Ltd म्हणजेच पंजाब महाराष्ट्र बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी व सध्या तुरुंगात असलेल्या राकेश वाधवान याच्या कन्स्ट्रक्शन कंपनीच्या बॅंक खात्यातून ही देणगी देण्यात आल्याचा आरोप गोटे यांनी केला. 

भाजपला मिळालेल्या या देणगीची तक्रार अनिल गोटे  ईडीकडे करणार आहेत. अनिल गोटे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर ईडीकडून कोणती पावले उचलली जातील, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 

इक्बाल मिर्ची कोण होता?

मिर्चीच्या व्यवसायातून गुन्हेगारी जगतात आलेला इक्बाल मेमन हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जवळच्या सहकाऱ्यापैकी एक होता. इक्बाल मिर्चीचा हृदयविकाराच्या झटक्याने 2013 मध्ये मृत्यू झाला होता. मृत्यूच्या 9 वर्षानंतरही मिर्चीची चर्चा सुरू असते. मनी लाँड्रिंगच्या एका प्रकरणात ईडीने मिर्चीविरोधात आरोपपत्र दाखल केले. अंमली पदार्थाची  तस्करी करायचा. त्यानंतर दाऊदसाठी त्याने तस्करीचे काम सुरू केले असल्याचे म्हटले जाते. इक्बाल मिर्ची 1987 च्या सुमारास दुबईत पळून गेला होता. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टSaif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
Embed widget