एक्स्प्लोर

भाजप-शिवसेना-मित्रपक्षांच्या महायुतीवर शिक्कामोर्तब, मात्र अद्याप जागावाटपाचा सस्पेंस कायम

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येऊन युतीची घोषणा करणार, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलंं होतं. मात्र अखेर ही बहुचर्चित घोषणा पत्रकाद्वारे करण्यात आली.

मुंबई :  शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांच्या महायुतीची घोषणा आज अखेर पत्राद्वारे करण्यात आली आहे. मात्र ज्या गोष्टीची अवघ्या राजकीय विश्वात उत्सुकता आहे, त्या जागावाटपाचा फॉर्म्युला मात्र अद्याप जाहीर झालेला नाही. दरम्यान उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येऊन युतीची घोषणा करणार, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. मात्र अखेर ही बहुचर्चित घोषणा पत्रकाद्वारे करण्यात आली. काय म्हटले आहे पत्रकात  राज्यात गेली 5 वर्ष यशस्वीपणे राज्यकारभार करीत महाराष्ट्राला एका नव्या उंचीवर नेण्याचे काम महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात केले आणि आता लोकशाही परंपरेप्रमाणे पुन्हा एकदा आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत. शिवसेना पक्षप्रमुख  उद्धवजी ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्य मित्रपक्षांचे नेते सर्वश्री केंद्रीय मंत्री  रामदास आठवले, महादेव जानकर,  विनायक मेटे,  सदाभाऊ खोत यांच्याच झालेल्या चर्चेअंती  महाराष्ट्र विधानसभेची आगामी निवडणूक ही महायुती म्हणून लढविण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. त्यानुसार आम्ही महायुतीची घोषणा करीत आहेत. या महायुतीत कोणता पक्ष कोणती व किती जागा लढविणार, इत्यादी तपशील लवकरच जाहीर केला जाईल. ही महायुती महाराष्ट्रामध्ये राज्यातील जनतेचा अभूतपूर्व आशीर्वाद प्राप्त करेल, हा विश्वास आम्ही व्यक्त करीत आहोत.  भाजप-शिवसेना-मित्रपक्षांच्या महायुतीवर शिक्कामोर्तब, मात्र अद्याप जागावाटपाचा सस्पेंस कायम या पत्रकावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या सह्या आहेत. दरम्यान, हे पत्रक येण्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी महायुतीची घोषणा केली होती. संपूर्ण महाराष्ट्राला ज्याची उत्सुकता लागली आहे की त्या शिवसेना, भाजपा आणि मित्रपक्षांची महायुती होणार आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. मात्र याबाबत अधिकृत घोषणा ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे करतील, असे ते म्हणाले. जागावाटपाचं देखील ठरलं आहे. सहमती पूर्ण झाली आहे. सहमती हा फॉर्म्युला आहे, असेही ते म्हणाले. भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी आज रात्री कधीही येऊ शकते. जागावाटपात काहींवर अन्याय होईल अशी शक्यता आहे. मात्र ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना भविष्यात  न्याय दिला जाईल, असेही ते म्हणाले. आमची अधिकृत यादी दिल्लीहून प्रकशित होते, यादी आल्यानंतर प्रत्येक उमेदवारांना घरी जाऊन एबी फॉर्म दिले जातील, असेही पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच देवेंद्र फडणवीस यांना पत्र; चांदिवाल आयोगाच्या अहवालचा दाखला देत MPSC च्या प्रस्तावित न्यायिक चौकशीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले....
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच देवेंद्र फडणवीस यांना पत्र; चांदिवाल आयोगाच्या अहवालचा दाखला देत MPSC च्या प्रस्तावित न्यायिक चौकशीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले....
Gokul Election: गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत मोठी अफवा पसरताच सतेज पाटील सावध झाले, लगेच फोन फिरवून म्हणाले...
गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत मोठी अफवा पसरताच सतेज पाटील सावध झाले, लगेच फोन फिरवून म्हणाले...
Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Vasai Crime: मुलगा अन् त्याच्या मित्राकडून छळ, सततच्या त्रासाला कंटाळलेल्या पित्याने मृत्यूला कवटाळलं; मुलीची शेवटची भेट घेत बॅग दिली अन् धावत्या लोकलसमोर झोकून दिलं, वसई हादरली!
मुलगा अन् त्याच्या मित्राकडून छळ, सततच्या त्रासाला कंटाळलेल्या पित्याने मृत्यूला कवटाळलं; मुलीची शेवटची भेट घेत बॅग दिली अन् धावत्या लोकलसमोर झोकून दिलं, वसई हादरली!

व्हिडीओ

Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
Navnath Ban On Rohit Pawar MPSC Protest Pune: रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
Devendra Fadnavis On Raj Thackeray: राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
राज ठाकरे म्हणाले, SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
Mumbai Pune Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Rohit Pawar and Vikram Pachpute: पुढच्या निवडणुकीत तू कसा निवडून येतो बघतोच! रोहित पवारांचा सर्वांदेखत अजितदादा स्टाईल इशारा, नेमकं काय घडलं?
पुढच्या निवडणुकीत तू कसा निवडून येतो बघतोच! रोहित पवारांचा सर्वांदेखत अजितदादा स्टाईल इशारा, नेमकं काय घडलं?
Embed widget