एक्स्प्लोर

नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात जाणं टाळलं, वरळी येथील नियोजित सभा रद्द

नारायण राणे यांनी ऐनवेळी आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात जाणं का टाळलं? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला उद्यापासून सुरुवात होणार आहे .मात्र या यात्रेत नारायण राणे यांनी पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचा युवा चेहरा असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात सभा घेणं टाळलं आहे.

भाजपच्या नियोजनानुसार नारायण राणे उद्या दुपारी दीड वाजता वरळी मतदारसंघात भेट देणार होते. वरळी नाका येथील भिवंडीवाला चाळीत नारायण राणे यांची सभाही नियोजित केली होती. पण ऐनवेळी नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. जन आशीर्वाद यात्रेच्या नव्या मार्गातून वरळी मतदारसंघ वगळला आहे. त्यामुळे नारायण राणे यांनी ऐनवेळी आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात जाणं का टाळलं? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.

यासंदर्भात जन आशीर्वाद यात्रेचे समन्वयक सुनील राणे यांच्याशी संपर्क साधला असता वरळीत जाऊन परत येणे सोयीचे नव्हते. त्यामुळे हा बदल केला, असा दावा राणे यांनी केला. नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेची सुरुवातीपासूनच चर्चा आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट देणार असल्यामुळे ही यात्रा चर्चेत आली. शिवसेनेचे नेते आणि खासदार विनायक राऊत यांनी स्मृती स्थळाला भेट देण्यास विरोध केला.
आणि आता नारायण राणे यांनी वरळी मतदार संघात जाणं आणि सभा घेणं टाळलं. यामुळे पुन्हा एकदा जन आशीर्वाद यात्रेची चर्चा सुरू झाली आहे. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात जाणं टाळण्यामागे पडद्याआड काही घडामोडी घडल्या का? याची चर्चा सुरू झाली आहे.

16 ऑगस्टपासून महाराष्ट्रात  भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड या मोदींच्या मंत्रिमंडळात नव्याने समावेश झालेले हे नेते महाराष्ट्रभर जन आशीर्वाद यात्रेला सुरूवात केली. नारायण राणे यांच्यावर मुंबईसह कोकणाची जबाबदारी देण्यात आली आहे. भारती पवार पालघर जिल्हयातील आदिवासी भाग आणि उत्तर महाराष्ट्रात यात्रा करणार आहेत. कपिल पाटील यांच्याकडे ठाणे, नवी मुंबईची जबाबदारी आहे. तर मराठवाड्यात भागवत कराड आणि रावसाहेब दानवे हे जन आशीर्वाद यात्रेचे नेतृत्व करणार आहेत.

संबंधित बातम्या :

नारायण राणेंसारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही : विनायक राऊत

जन आशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणे बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचे दर्शन घेणार

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar On Ajit Pawar : अजितदादांच्या अपघातामागील लोकांना वाचवणारा मफलरवाला नेता कोण? 16 तारखेला राजकीय बॉम्ब फुटणार? रोहित पवार पत्रकार परिषदेत कोणता खुलासा करणार?
अजितदादांच्या अपघातामागील लोकांना वाचवणारा मफलरवाला नेता कोण? 16 तारखेला राजकीय बॉम्ब फुटणार? रोहित पवार पत्रकार परिषदेत कोणता खुलासा करणार?
Maharashtra Live News Updates: गेल्यावर्षी मांजरा नदीला महापूर, यंदा पात्र भेगाळलेलं; सांगली जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली
Maharashtra Live News Updates: गेल्यावर्षी मांजरा नदीला महापूर, यंदा पात्र भेगाळलेलं; सांगली जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली
SIR Maharashtra : राज्यातील 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा; 'एसआयआर' मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
राज्यातील 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा; 'एसआयआर' मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
Navi Mumbai Crime News: प्रेमसंबंधाचा दुर्दैवी शेवट! लॉजमध्ये नेऊन आधी प्रेयसीला ठार केलं, मग स्वत: ही गळ्याला दोर लावला, नवी मुंबईतील उलवे परिसरात नेमकं काय घडलं?
प्रेमसंबंधाचा दुर्दैवी शेवट! लॉजमध्ये नेऊन आधी प्रेयसीला ठार केलं, मग स्वत: ही गळ्याला दोर लावला, नवी मुंबईतील उलवे परिसरात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sinhagad Technical Educational Institute: सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
SIR Maharashtra : राज्यातील 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा; 'एसआयआर' मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
राज्यातील 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा; 'एसआयआर' मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
Vasai-Virar Railway Accident News: वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेगळं वेळण; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून NDA प्रवेशाची चाचपणी, नेमकं काय काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेगळं वेळण; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून NDA प्रवेशाची चाचपणी, नेमकं काय काय घडतंय?
Chhatrapati Sambhajinagar Bus Accident: छत्रपती संभाजीनगरमध्ये बसचा भीषण अपघात; पुलाचा कठडा तोडून बस खाली कोसळली, हादरवणारे 5 फोटो
छत्रपती संभाजीनगरमध्ये बसचा भीषण अपघात; पुलाचा कठडा तोडून बस खाली कोसळली, हादरवणारे 5 फोटो
Chandrakant Patil : बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
Rinku Singh : 43 कोटी वाचवण्यासाठी दोन खेळाडूंना रिलीज करा,रिंकू सिंगला केकेआरचा कॅप्टन करा, माजी क्रिकेटपटूनं फॉर्म्युला सांगितला...
केकेआरनं 'त्या' दोघांना रिलीज करावे, 43 कोटी वाचवावे, रिंकूला कॅप्टन बनवा, सल्ला कोणी दिला?
Embed widget