एक्स्प्लोर

भाजप खासदार शरद बनसोडेंची भरसभेत कमरेखालची भाषा

भाजप खासदार शरद बनसोडेंनी शाळेत असताना त्यांना झालेल्या गुप्तांगाच्या दुखण्याची कहाणी भरसभेत सांगितली.

सोलापूर : कुठे, कधी, कसे तारे तोडावेत, याचं भान राहिलं नाही की काय होतं हे सोलापूर जिल्ह्यात बघायला मिळालं. सोलापूर जिल्ह्यातले खासदार शरद बनसोडे यांना हातात माईक मिळाला आणि ते वाट्टेल ते बरळू लागले. इतकं बरळले की त्यांना 'चाबरा खासदार' अशी उपाधीच मिळाली आहे. भर सभेत सभ्यतेची पातळी सोडली, बाया-बापड्यांसमोर गुप्तांगाची गोष्ट सांगितली, सुशीलकुमार शिंदेंसमोर अकलेचे तारे तोडले, यंदाच्या आंबटशौकीन खासदार पुरस्काराचे मानकरी कोण? नाव फक्त एक... शरद बनसोडे... सोलापुरातल्या पनमंगरुळ या त्यांच्या जन्मगावी काल एका डॉक्टरांची एकसष्ठी होती. त्या कार्यक्रमात बनसोडे अनेक पुड्या सोडत होते. पण भाषण रंगात आलं आणि साहेबांचाही तोल सुटला. सायबांनी शाळेत असताना त्यांना झालेल्या गुप्तांगाच्या दुखण्याची कहाणी भरसभेत सांगितली. ते कन्नडमध्ये सांगत होते... मी लहानपणी आठवी-नववीत असताना एकदा झाडावरुन पडलो. त्यामुळे माझे गुप्तांगच सरकले. माझे वडील मला दवाखान्यात घेऊन गेले, तेव्हा डॉक्टरांनी मला चड्डी काढण्यास सांगितलं. मग काय, माझी पंचाईतच झाली. मी वडिलांकडे बघितलं तर ते डॉक्टरांना 'बघून घ्या' असं सांगत तिथून निघून गेले. डॉक्टरांनी एका बाजूला पकडून जोरात हिसका मारला आणि मी बेशुद्ध पडलो. त्यानंतर त्रास कमी झाला. तेव्हापासून औषध नाही की काही नाही. बनसोडे असे सुटले होते, की त्यांना आवरणं अवघड झालं होतं. अखेर प्रेक्षकांमधूनच आरडाओरड सुरु झाली. खासदार महाशय जरा गांगरले. पण त्यानंतरही बनसोडेंनी कडी केली. गुप्तांगाची कहाणी कन्नडमधून कळली नसेल, तर मराठीतनं सांगू का? असा आर्ची स्टाईल डायलॉग मारला. अखेर आयोजकांनीही खासदार महोदयांना आवरतं घ्यायला लावलं आणि बनसोडेंनी माईक सोडला. बनसोडेंचा हा पहिला किस्सा नाही. भाषणबाजीत मोकळेढाकळे असलेले बनसोडे याआधीही अनेकदा आपल्या वक्तव्यांनी वादात अडकले आहेत. पण आता मात्र बनसोडेंनी आपल्याच कमरेखालच्या अश्लाघ्य विनोदाने हद्द केली. त्यामुळे बनसोडेसाहेब, जरा बोलताना स्वतःला आवरा! पाहा व्हिडिओ :

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget