अंबाजोगाई येथील डॉक्टरांची प्रतिनियुक्ती रोखण्यासाठी भाजप आमदाराच्या सासऱ्यांचं उपोषण
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयातील डॉक्टरांची प्रतिनियुक्ती रोखण्यासाठी भाजप आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे तथा ज्येष्ठे नेते नंदकिशोर मुंदडा उपोषणाला बसले आहेत. पर्यायी डॉक्टरांची व्यवस्था झाल्याशिवाय डॉक्टरांना मुंबईला हलविण्यात येऊ नये, अशी मागणी त्यांनी केलीय.
बीड : अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयातील 56 डॉक्टरांना मुंबई येथे पाठवणार आहे. या निर्णयावरुन भाजप आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे तथा ज्येष्ठे नेते नंदकिशोर मुंदडा यांनी अधिष्ठाता कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. हा निर्णय अन्यायकारक असून ग्रामीण भागातील रूग्णसेवा विस्कळीत करणारा असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे पर्यायी डॉक्टरांची व्यवस्था झाल्याशिवाय डॉक्टरांना मुंबईला हलविण्यात येऊ नये, अशी मागणी नंदकिशोर मुंदडा यांनी केली आहे.
स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयात 518 खाटांना परवानगी आहे. परंतु, येथील दररोजची ओपीडी दोन हजारांपेक्षाही अधिक आहे. नियमितपणे सातशेपेक्षा अधिक रूग्ण ॲडमिट असतात. रूग्णालयासाठी अपेक्षित असलेल्यापैकी सध्या 35 टक्के डॉक्टरांची कमतरता आहे. त्यातच सध्या शासनाने या रुग्णालयात कोरोना रूग्णांसाठी वाढीव 300 खाटांची सोय केली आहे. सध्या आहे तेच डॉक्टर या वाढीव खाटांसाठी वापरले जाणार आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता स्वाराती रूग्णालयाला अतिरिक्त डॉक्टर आणि कर्मचारी देण्याची गरज होती.
या एरियात पुन्हा दिसलात तर हातपाय तोडू, अकोल्यात तरुणांची पोलिसांना धमकी
शासनाचा निर्यण चुकीचा स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयाला आवश्यकता असताना शासनाने येथील 56 डॉक्टरांना मुंबईला प्रतिनियुक्तीवर पाठविण्याचे आदेश दिले आहेत. हे सर्व डॉक्टर दररोज ओपीडी आणि शस्त्रक्रीया विभागात काम करणारे आहेत. परिणाणी याचा परिणाम स्वारातीमधील दैनंदिन तसेच संभाव्य कोरोना रूग्ण सेवेवर होणार आहे. त्यामुळे या डॉक्टरांना इथून हलवण्याअगोदर या रुग्णालयात पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी, अशी भूमिका नंदकिशोर मुंदडा यांनी घेतली आहे. दरम्यान हे आंदोलन करताना सोशल डिस्टन्सिंग पाळली जात असली तरी लॉकडाऊनमध्ये शिथिलता चालू असताना असे लोकांना जमवून आंदोलन केल्याची चर्चा रुग्णालय परिसरात होत आहे.
बीड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता विळखा कित्येक दिवस बीड जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये होता. मात्र, आता बीडमध्येही कोरोनाने हळूहळू हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. बीडमध्ये कोरोना बाधितांची संख्या 50 जवळ पोहचली आहे. यापैकी आतापर्यंत 5 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बीड जिल्ह्यात आतापर्यंत एकाचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.
बीड जिल्ह्यातील 2 कोटी 84 लाख रुपयांची रक्कम थकित,शेतकऱ्यांना अडीच महिन्यांपासून दुधाचा मोबदला नाही