एक्स्प्लोर

Nitesh Rane : 'नारायण राणेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिली होती, लवकरच वस्त्रहरण करु'; नितेश राणेंचा आरोप

नारायण राणे यांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सुपारी दिली होती, असा खळबळजनक आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

Nitesh Rane on Uddhav Thackeray : नारायण राणे Narayan Rane) यांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा त्यांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सुपारी दिली होती, असा खळबळजनक आरोप भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. नितेश राणेंनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर हा गंभीर आरोप केला आहे. आता म्याव म्याव संपू द्या, त्यानंतर आम्ही व्याजासकट वस्त्रहरण सुरु करु असा इशाराही नितेश राणेंनी दिला आहे. नितेश राणेंच्या या आरोपानंतर खळबळ उडाली आहे. 

योग्य वेळ आल्यानंतर आम्ही वस्त्रहरण करु

याबाबत एबीपी माझाने आमदार नितेश राणे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी ते म्हणाले की, काल नाशिकचे आमदार सुहास कांदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेच्या संदर्भातील घटनेचा उल्लेख केला आहे. यावरुन शिवेसनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोणत्या मानसिकतेचे आहेत हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर झाले ते पहिले नाही. याच्या अगोदर पण असंख्य घटना घडल्या आहेत. नारायण राणे यांनी ज्यावेळी शिवसेना सोडली, त्याच्यानंतर असे अनुभव आले असल्याचे नितेश राणे म्हणाले. म्हणून योग्य वेळ आल्यानंतर आम्ही वस्त्रहरण करु असे नितेश राणेंनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्याबाबत वेगळी प्रतिमा घडवली जात आहे. ते आजारी आहेत, ते सोज्वळ आहेत, असं दाखवलं जात आहे. पण ते जर दुसऱ्याच्या जीवावर उठत असतील, दुसऱ्याला मारण्यासाठी सुपाऱ्या देत असतील तर असा माणूस स्वच्छ मनाचा नसल्याचे नितेश राणे म्हणाले.

महाराष्ट्राच्या जनतेला सगळं समजलं पाहिजे 

योग्य वेळी सगळी माहिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणली जाईल असेही राणेंनी यावेळी सांगितले. काल सुहास कांदे यांनी जी घटना सांगितली. त्यानंतर मी ही माहिती समोर आणली आहे. फक्त एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ही गोष्ट झाली नसल्याचे राणे म्हणाले. आज सगळीकडे फिरुन उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे सहानभुती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण महाराष्ट्राच्या जनतेला कळाले पाहिजे की उद्धव ठाकरे नेमके कसे आहेत, असेही राणे म्हणाले. स्वत:चे वडील आजारी असल्याची चिंता यांनी वाटते पण दुसऱ्यांच्या वडलींना जेवणाच्या ताटावरुन उठवून अटक करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा त्यांना काही वाटत नाही असेही नितेश राणे यावेळी म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळी धमक्या येत होत्या, त्यावेळी राणेसाहेबांसारख्या शिवसैनिकांनी जीवाची पर्वा न करता तासनतास घराच्या बाहेर राहून संरक्षण दिलं आहे. त्याच व्यक्तिला असा सुपाऱ्या दिल्या जात असल्याचा आरोप राणेंनी केला.
  
सध्या शिवसेनेते मोठी फूट पडली आहे. अशातच दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. तसेच भाजपच्या काही नेत्यांकडूनही शिवसेनेवर टीका केली जात आहे. यातच नितेश राणे यांच्याकडून एक ट्वीट करण्यात आलं आहे. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. नारायण राणेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिली होती असा आरोप त्यांनी ट्वीटमध्ये केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेच्या मुद्यावरुन राजकारण तापलं असतानाच नितेश राणे यांनी हे नवीन ट्वीट केलं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग
Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?
Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
मुंबई महापालिकेसाठी ठाकरे विरुद्ध शिंदे सेना; सदा सरवणकरांच्या मुलीला तिकीट, जोगेश्वरीत कुणाला संधी?
मुंबई महापालिकेसाठी ठाकरे विरुद्ध शिंदे सेना; सदा सरवणकरांच्या मुलीला तिकीट, जोगेश्वरीत कुणाला संधी?
Embed widget