एक्स्प्लोर
सर्वाधिक उत्पन्न असलेल्या देशभरातील आमदारांत लोढा दुसऱ्या स्थानी : ADR
सर्वाधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या देशभरातील वीस आमदारांमध्ये महाराष्ट्रातील चौघांचा समावेश आहे.

मुंबई : सर्वाधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या देशभरातील 20 आमदारांमध्ये महाराष्ट्रातील चार आमदारांचा समावेश आहे. भाजप आमदार मंगलप्रभात लोढा दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांचं वार्षिक उत्पन्न 34.66 कोटी रुपये आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म अर्थात एडीआर या संस्थेच्या अहवालातून ही माहिती आणि आकडेवारी समोर आली आहे. एडीआरने देशभरातील आमदारांचं सर्वेक्षण या अहवालासाठी केले आहे.
देशभरातील एकूण तीन हजार 145 आमदारांची सर्वाधिक वार्षिक उत्पन्नानुसार क्रमवारी लावण्यात आली आहे. त्यापैकी टॉप 20 आमदारांमध्ये महाराष्ट्रातील चौघांनी स्थान मिळवलं आहे.
प्रख्यात उद्योगपती आणि भाजप आमदार मंगलप्रभात लोढा देशात दुसऱ्या क्रमांकावर आहेत. लोढा यांचं वार्षिक उत्पन्न 34.66 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे लोढांनी आपण नोकरी करत असल्याचा उल्लेख केला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील दिलीप सोपल सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांचं वार्षिक उत्पन्न 9.85 कोटी रुपये आहे. त्यांचा वकिली आणि शेतीचा व्यवसाय आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर 17 व्या स्थानावर आहेत. त्यांचं वार्षिक उत्पन्न 5.61 कोटी रुपये आहे.
विसाव्या क्रमांकावर काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत. चव्हाणांचं वार्षिक उत्पन्न 4.56 कोटी रुपये असून त्यांनी व्यवसाय म्हणून शेतीचा उल्लेख केला आहे.
देशात सर्वाधिक कमाई असणाऱ्या आमदारांच्या यादीत कर्नाटकातील काँग्रेस आमदार एन. नागराजू पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांचं वार्षिक उत्पन्न 157.04 कोटी रुपये आहे.
विशेष म्हणजे सर्वात कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या 20 आमदारांच्या यादीत महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे. बावनकुळेंचं वार्षिक उत्पन्न 9.09 लाख रुपये आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
