गोंदिया : ओबीसी (OBC) समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सतत आरोप प्रत्यारोप करत आहेत. यात अनेक जण खालच्या पाळीवर जाऊन टीका करत आहेत. आज भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महाविकास आघाडी सरकार (Maharashtra Government) आणि कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यावर अत्यंत कडक शब्दात टीका केली.
"महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री करोडो रुपयांचे घोटाळे करून जेलमध्ये आहेत. सत्तेचा माज त्यांना आला आहे. ओबीसी मंत्रांनी सुप्रीम कोर्टाने निर्णय देऊन आतापर्यंत ओबीसींना आरक्षण मिळवून दिले नाही. त्यामुळे सत्तेचा माज त्यांना आला आहे, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर केली.
"18 महिन्यांपासून मुख्यमंत्री कुठे आहेत? 12 कोटी जनतेचे काय?
"गेल्या 18 महिन्यांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Cm Uddhav Thackeray) मंत्रालयात येत नाहीत. राज्यातील 12 कोटी जनतेचे वाली कोण? असा प्रश्न उपस्थीत करत, "या सरकारने सर्व योजना बंद केल्या आहेत. हे सरकार हुकुमशाही करत आहे, शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कापत आहे, या सरकारने रोजगार हमी योजना बंद करून ठेवली, पिक विमा बंद आहे, पिक कर्ज योजना बंद आहे, विदर्भातील वैधानिक मंडळ बंद केलं. त्यामुळे या सरकारचं एकच घोषवाक्य आहे, ते म्हणजे "एक पाव डटाव गरिबी हटाव. अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केली.
महत्वाच्या बातम्या
- Election 2022 Dates : पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर, UP मध्ये 7 टप्प्यात मतदान, 10 मार्चला निकाल
- Election Guidelines : ओमायक्रॉनचं संकट, त्यात 5 राज्यात निवडणुका, नो रॅली, नो सभा, गाईडलाईन्स नेमक्या काय?
- Assembly Election 2022 : पाच राज्यांच्या निवडणुका 2024 च्या दृष्टीनंही महत्त्वाच्या , कुठल्या पक्षासाठी कशी प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे?