Election 2022 EC Guidelines : कोरोना महामारी आणि ओमायक्रॉन संकटामध्ये उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका सात टप्यात पार पडणार आहेत. तर पंजाब गोवा, उत्तराखंड राज्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात पार पडणार आहेत. मणिपूरमध्ये दोन टप्यात निवडणूका होणार आहेत. 10 मार्च रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निवडणूकांची घोषणा करताना निवडूक आयोगाने कोरोना नियमांचं पालन होणार असल्याचे सांगितलं. कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने निर्बंध लागू केले आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा कालावधी एक तासाने वाढण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. निवडणूकीसाठी आयोगाने नियमावली जारी केली आहे, पाहूयात काय आहे...


आजपासूनच कोड ऑफ कंडक्ट अर्थात आचारसंहिता लागू होईल.
पाच राज्यांच्या या निवडणुकीसाठी काम करणारे सर्व निवडणूक कर्मचारी लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झालेलेच असतील. 
पाच राज्यांच्या या निवडणुकीत उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज ऑनलाइन पद्धतीने दाखल करण्याचाही पर्याय आहे. हा पर्याय बंधनकारक नसेल तर ऐच्छिक आहे.
प्रचारादरम्यान कोरोना नियमांचं पालन करणे बंधनकारक असेल. 
संपर्कविरहीत प्रचार व्हावा यासाठी दूरदर्शनवर सर्व पक्षांना मिळणारा कालावधी दुप्पट करण्याचा निर्णय करण्यात आला आहे.
15 जानेवारीपर्यंत रॅली, सभा, रोड शो, साईकल आणि बाईक रॅलीवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. त्यानंतर परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल.
रात्री आठनंतर सकाळी आठ पर्यंत निवडणूक प्रचारावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच डोअर टू डोअर प्रचारासाठी पाच लोकांना परवानगी देण्यात आली आहे. 
80 पेक्षा जास्त वय असणारे, दिव्यांग आणि कोरोनाबाधित असणाऱ्यांसाठी पोस्टल बॅलेट वोटिंग असणार असेही सांगण्यात आले.
प्रत्येक विधानसभा मतदार केंद्रावर महिलांसाठी महिलांद्वारे संचालित मतदान केंद्र असणार आहे. तसेच दिव्यांग व्यक्तीसाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअरची सुविधा असणार आहे.
प्रत्येक मतदान केंद्रावर मास्क आणि सॅनिटायझेशनची व्यवस्था करण्यात येईल. 
निवडणूक आयोगाकडून नागरिकांसाठी सीव्हिजिल अॅपची घोषणा करण्यात आली.. या अॅपवर कोणत्याही नियमांच्या उल्लंघनाची माहिती अपलोड करता येईल. त्यावर फक्त फोटो घेऊन अपलोड करायचा आहे. पुढच्या 100 मिनिटांत त्यावर कारवाई केली जाईल.
नियमांचं उल्लंघन केल्यास डिझास्टर मॅनेजमेंट अॅक्ट, आयपीसीनुसार शिक्षा होऊ शकते.


कोणत्या राज्यात कधी मतदान?
उत्तर प्रदेश 
पहिला टप्पा - 10 फेब्रुवारी रोजी मतदान
दुसरा टप्पा - 14 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान
तिसरा टप्पा  - 20 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान
चौथा टप्पा - 23 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान
पाचवा टप्पा - 27फेब्रुवारी 2022
सहावा टप्पा - 3 मार्च 2022 रोजी मतदान
सातवा टप्पा - सात मार्च 2022 रोजी मतदान



पंजाब - 14 फेब्रुवारी  2022


उत्तराखंड - 14 फेब्रुवारी  2022 


गोवा - 14 फेब्रुवारी  2022 


मणिपूर -


पहिला टप्पा - 27 फेब्रुवारी 2022


दुसरा टप्पा - तीन मार्च 2022