Kadam Hospital Abortion Case: वर्धेतील कदम रुग्णालयाच्या परिसरात मानवी कवट्या आणि काही अवशेष आढळल्यानं संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजली आहे. एका अल्पवयीन मुलीनं संबंधित रुग्णालयात तिचा गर्भपात करण्यात आल्याची पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या साहाय्यानं फॉरेन्सिक पथकाच्या साहाय्यानं शोधकार्य सुरु केलं. ज्यात धक्कादायक माहिती समोर आलीय. कदम रुग्णालयाच्या परिसरात आतापर्यंत 12 कवट्या आणि 54 हाडे आढळून आले आहेत. 


मिळालेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीनं 5 जानेवारी रोजी कदम रुग्णालयात तिचा गर्भपात करण्यात आल्याची आर्वी पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी रुग्णालयातील डॉ. रेखा कदम यांना बेड्या ठोकल्या. या प्रकरणी पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या पथकानं तपासणी केली असता समोर आलेलं दृश्य भयावह होतं.


पोलिसांनी बुधवारी रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या गोबरगॅसच्या खड्ड्याची तपासणी केली. त्यावेळी पोलिसांना नवजात भ्रूणाचे 11 कवट्या, 54 हाडे आणि वापरलेले ग्लोज, सीरींज, प्लास्टिक पिशव्या ईत्यादी मिळालं. त्यावेळी शोधकार्यात पुन्हा एक कवटी सारखा अवयव आढळून आला आहे. या परिसरात आतापर्यंत एकूण 12 कवट्या आणि 54 हाडे आढळून आले आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी आरोपींविरोधात नेमकी कोणती कारवाई करण्यात येते? तसेच पोलीस तपासा आणखी काय पुढे येते? हे पाहणे महत्वाचं ठरेल.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha