एक्स्प्लोर

भाजपला काँग्रेसचा दे धक्का! वर्ध्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट; दत्ता मेघे यांचे पुतणे अभ्युदय मेघे काँग्रेसमध्ये

वर्ध्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट आलाय. भाजप नेते आणि माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुतणे अभ्युदय मेघे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. नाना पटोले यांनी अभ्युदय मेघेंचं पक्षात स्वागत केलंय.

Maharashtra Assembly Election 2024 वर्धा : वर्ध्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे. वर्ध्यात एकेकाळी काँग्रेसमध्ये (Congress)  दबदबा असलेले माजी खासदार दत्ता मेघे (Datta Meghe) यांनी सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपात प्रवेश करून काँग्रेसला मोठा धक्का दिला होता. त्यानंतर मेघे परिवार गेल्या दहा वर्षात भाजपच्या खांद्याला खांदा लावून कार्य करीत असल्याचे चित्र होते. पण काल (गुरुवारी, ता. 8 ऑगस्ट) मात्र दत्ता मेघे यांचे पुतणे अभ्युदय मेघे यांच्या निमित्ताने आता खांदेपालट झाला असल्याचे चित्र वर्ध्यात आहे.

दत्ता मेघे यांचे पुतणे असलेले अभ्युदय मेघे (Abyuday Meghe) यांनी मुंबई येथे काँग्रेस मध्ये प्रवेश घेतला आहे. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली अभ्युदय मेघे यांच्या खांद्यावर काँग्रेसचा दुपट्टा टाकत प्रवेश करण्यात आला आहे. यावेळी बाळासाहेब थोरात हे देखील उपस्थित होते. यावेळी डाव मांडत भाजपकडून  नेते ओढून घेण्यात काँग्रेस यशस्वी ठरली आहे. अभ्युदय मेघे यांच्या काँग्रेस प्रवेशाला दत्ता मेघे यांचे समर्थन नसल्याची प्रतिक्रिया अभ्युदय मेघे यांनी दिलीय. 

दत्ता मेघे यांच्याकडून माझ्या काँग्रेस प्रवेशाला समर्थन नाही - अभ्युदय मेघे 

लोकसभा निवडणुकानंतर आता विधानसभा (Vidhansabha) निवडणुकांसाठी राजकीय पक्ष कामाला लागेल असून यंदा महायुती (Mahayuti)विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. त्यामुळे, गतवेळेसच्या तुलनेत यंदा जागावाटपात सर्वच पक्षांच्या वाट्याला कमी जागा येणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे, जागावाटपानंतर विधानसभा निवडणुकीत मोठी बंडखोर होण्याची चिन्हे आहेत. एकीकडे महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते दिल्लीत एकत्र येऊन विधानसभा निवडणुकांची रणनीती आखत आहेत, दुसरीकडे राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडून पक्षात येणाऱ्यांचं स्वागत केलं जात आहे. भाजप नेते आणि माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुतणे अभ्युदय मेघे यांचा काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश झालाय. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अभ्युदय मेघेंचं पक्षात स्वागत केलंय.   

पक्ष प्रवेशानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का

राज्यात काका-पुतण्यांचं राजकारण चांगलंच चर्चेत आहे, बारामतीमधील पवार कुटुंब असो, बीडचं मुंडे कुटुंब असो किंवा नुकतेच आपल्या पुतण्यासाठी निवडणुकांच्या राजकारणातून राजकीय संन्यास घेतलेले प्रकाश सोळंके असो. काका-पुतण्याचा वाद किंवा काका विरुद्ध पुतण्या निवडणुकांच्या रणांरगणात हे चित्र पाहायला मिळत आहे. आता, काँग्रेसनेही एक पुतण्या फोडला असून भाजपा धक्का दिलाय. काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले अभ्युदय मेघे हे भाजप नेते तथा माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुतणे आहेत. मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते आज त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला.

आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये वर्धा विधनासभा मतदारसंघातून उमेदवारीकरिता त्यांनी अर्ज सादर केल्याची माहिती आहे. विविध सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातुन अभ्युदय मेघे यांचा जनसंपर्क असून अभ्युदय मेघे वर्धा सोशल फोरमचे ते अध्यक्षही आहेत. अभ्युदय मेघे यांच्या प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण, अभ्युदय यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आल्यास पक्षातील इतर इच्छुक उमेदवारांचं काय होणार, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पॅरिसला चाललेलं पायलटने आंतरराष्ट्रीय विमान जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
पॅरिसला चाललेलं पायलटने आंतरराष्ट्रीय विमान जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
Raj Thackeray Vs Uddhav Thackeray: तुमच्या घरात सुनेला जाच होतो वाटतं; उद्धव ठाकरेंना खाष्ट सासू म्हणणाऱ्या राज ठाकरेंना किशोरी पेडणेकरांनी सुनावलं
अमितच्या बायकोशी शर्मिला ठाकरे खाष्ट सासूप्रमाणे वागतात का? किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंवर बोचरा वार
Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Trending : मिटिंगला आले नाही म्हणून बॉसने करिअरवर वरवंटा फिरवला, एका फटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
ऑफिस मिटिंग जॉईन केली नाही म्हणून बॉसचं डोकं फिरलं, एका झटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anil Deshmukh Nagpur : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक; 4 जणांवर गुन्हा दाखलTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  11 AM :19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaParinay Phuke on Anil Deshmukh : निवडणूक डोळ्यासमोर ठेवून देशमुखांनी कुभांड रचलं - परिणय फुकेABP Majha Headlines :  9 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पॅरिसला चाललेलं पायलटने आंतरराष्ट्रीय विमान जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
पॅरिसला चाललेलं पायलटने आंतरराष्ट्रीय विमान जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
Raj Thackeray Vs Uddhav Thackeray: तुमच्या घरात सुनेला जाच होतो वाटतं; उद्धव ठाकरेंना खाष्ट सासू म्हणणाऱ्या राज ठाकरेंना किशोरी पेडणेकरांनी सुनावलं
अमितच्या बायकोशी शर्मिला ठाकरे खाष्ट सासूप्रमाणे वागतात का? किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंवर बोचरा वार
Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Trending : मिटिंगला आले नाही म्हणून बॉसने करिअरवर वरवंटा फिरवला, एका फटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
ऑफिस मिटिंग जॉईन केली नाही म्हणून बॉसचं डोकं फिरलं, एका झटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी, फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Embed widget