Chandrakant Patil : ...त्यांना माहिती नाही पाटील क्या चीज है, केंद्रीय नेतृत्वाच्या नाराजीवर चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण
Chandrakant Patil : केंद्रीय नेतृत्व माझ्यावर नाराज नसल्याचं स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.
Chandrakant Patil : केंद्रीय नेतृत्व माझ्यावर नाराज नसल्याचं स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या राज्यातील एकूणच कारभारावर केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. याबाबत चंद्रकांत पाटील यांना पुण्यात प्रश्न विचारला असता, त्यांनी केंद्रीय नेतृत्व नाराज नसल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, ‘केंद्रीय नेतृत्व माझ्यावर नाराज नाही. ज्या सुत्रांनी तुम्हाला हे सांगितलेय ते प्रकट करा. माझे श्रेष्टी काय म्हणतात, त्याला मी समर्थ आहे. गेल्या 42 वर्षे राजकारणात आहे. आमच्या कामगिरीवर केंद्रीय नेतृत्व पूर्णपमे समाधानी आहे.दिल्ली दौऱ्यातील बातम्यांचे सूञ आमच्या पक्षातले असू नाहीतर बाहेरचे.. त्यांना माहिती नाही पाटील क्या चीज है...!!!’ यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. नवाब मलिक यांचा पाळत ठेवत असल्याचा दावा हास्यास्पद आहे. पोलीस दल त्यांच आहे, गृहमंत्रिपदही त्यांच्याकडेच आहे, असे पाटील म्हणाले. आज, 28 नोव्हेंबर 2021 रोजी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दोन वर्ष पूर्ण केली. राज्यातील सरकारच्या कामगिरीवर पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटील यांनी टीकास्त्र सोडलं. राज्य सरकारमध्ये फक्त भ्रष्टाचारच सुरु असल्याचे ते म्हणाले. दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मी उद्धवजींचं अभिनंदन करणार नाही, निषेध करणार आहे असेही यावेळी पाटील म्हणाले.
ठाकरे सरकारवर टीका, काय म्हणाले चंद्रकांत पाटील -
महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षाच्या कामगिरीवर यावेळी चंद्रकांत पाटील यांनी टीकास्त्र सोडलं. ते म्हणाले की, ‘महाविकास आघाडी सरकारची अधोगती, सामान्य नागरिकांची झालेली ससेहोलपट ही गेले सात दिवस आम्ही मांडतोय. दोन वर्षांत विकासाची काम काहीच झाली नाहीत, एकच धंदा जोरातसुरु आहे तो म्हणजे पैशाचा. दोन वर्षात न चुकता भ्रष्टाचार झाला. ज्या पोलीस दलाच नाव जगभरात घेतलं जातं ते मुंबई पोलीस प्रमुखच गायब होते. 100 कोटी रुपये आणून देण्याचा आग्रह करत होते. अनेक दिवस राज्याचे गृहमंत्री क्राईमवर कंटोल करायचे तेच परागंदा झाले. असा सगळा भ्रष्टाचाराचा विषय राज्यात सुरु आहे. या सगळ्याचा वीट आलाय. 16 वर्षे हायकोर्टाने सस्पेशन कॅन्सल करुन वाझेंना पुन्हा सेवेमध्ये घेयचं काम मुख्यमंत्री करतात. वाझेंना नोकरीत परत घेण्याची जबाबदारी ही पूर्णपणे मुख्यमंत्री यांचीच आहे. ते नाकारु शकत नाहीत. राज्यातील सरकारमधील एक चतुर्थाश मंत्री वादात आहेत. या सरकारने एसटीचा संप चिरडून टाकला. आरक्षणासंबंधी सगळ्यांचा तोंडाला पान पुसली आहेत. ओबीसी आरक्षणासंबंधी ही तेच केलं. दोन वर्षे म्हणजे अनागोदी कारभार झालाय. गेल्या दोन वर्षात सरकारने घेतलेले निर्णय आत्तापर्यंत कोर्टात टीकलेले नाही.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live