एक्स्प्लोर

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांच्यावर केंद्रीय नेतृत्व नाराज, ठाकरे सरकारला प्रत्युत्तर देण्यास अपयशी: सूत्र

Chandrakant Patil : महाविकास आघाडी सरकारला चोख प्रत्युत्तर देण्यात चंद्रकांत पाटलांना अपयशी ठरल्याचा ठपकाही ठेवण्यात आलाय.

Chandrakant Patil : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर दिल्ली हायकमांड नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काल दिल्लीत झालेल्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संघटनमंत्री बी. एल.संतोष यांनी चंद्रकांत पाटील यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एबीपी माझा खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे. केंद्र सरकारच्या योजना राज्यात नीटपणे पोहोचवल्या नसल्याने केंद्रीय नेतृत्व चंद्रकांत पाटील यांच्यावर नाराज असल्याचं समजतेय. महाविकास आघाडी सरकारला चोख प्रत्युत्तर देण्यात चंद्रकांत पाटलांना अपयशी ठरल्याचा ठपकाही ठेवण्यात आलाय.

गेल्या काही दिवसात चंद्रकांत पाटील राज्य भाजपचं नेतृत्व करत असताना त्यांचा कारभार सर्वसमावेशक नसल्याच्या तक्रारी होत्या. हाच धागा पकडून काल झालेल्या तीन तासांच्या बैठकीत दिल्ली हायकमांडने चंद्रकांत पाटील यांची शाळा घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यातील महा विकास आघाडी विरोधात रान उठवण्यात अपयश आल्याचेही भाजपच्या हायकमांडने निदर्शनास आणून दिले. येणाऱ्या काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी कार्यपद्धतीत सुधारणा करावी अशा सूचनाही भाजपा हायकमांडने दिल्या आहेत. 

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर नाराजी नेमकी कशामुळे?
राज्य भाजपातील नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव
पुणे आणि कोल्हापूर वगळता चंद्रकांत पाटील यांचा राज्यभर संघटनात्मक बांधणीसाठी फारसा प्रवास नाही
शंभर कोटी लसीकरण झाल्याबद्दल राज्य भाजपमध्ये फारसे कार्यक्रम झाले नाहीत
देगलूर बिलोली मतदारसंघात भाजपला मोठ्या फरकाने आलेलं अपयश
आझादी का अमृत महोत्सव हा कार्यक्रम राज्यात नीटपणे राबवला नाही
नरेंद्र मोदी यांच्या प्रशासकीय राजकीय जीवनाची २० वर्षे या कार्यक्रमाची ही नीट आखणी झाली नाही.

याबद्दल केंद्रीय नेतृत्व चंद्रकांत पाटील यांच्या कार्य पद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. येत्या काही दिवसात चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करावी अशा सूचनाही केंद्रीय नेतृत्वाने दिल्याची माहिती आहे.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: नाशिकच्या येवला-नांदगाव रस्त्यावर लक्झरी बस पलटली; एक जण जागीच ठार, इतर प्रवासी किरकोळ जखमी
Maharashtra Live News Updates: नाशिकच्या येवला-नांदगाव रस्त्यावर लक्झरी बस पलटली; एक जण जागीच ठार, इतर प्रवासी किरकोळ जखमी
Jalgaon Accident News: हातावरची मेहंदी पुसत नाही तोच काळाचा घाला; माहेरी जाताना नववधूचा भीषण अपघातात मृत्यू, जळगावमध्ये काळीज चिरणारा आक्रोश
हातावरची मेहंदी पुसत नाही तोच काळाचा घाला; माहेरी जाताना नववधूचा भीषण अपघातात मृत्यू, जळगावमध्ये काळीज चिरणारा आक्रोश
Tukaram Mundhe FDA Nagpur: नागपूरमधील तीन बड्या हॉटेल्सवर एफडीएची कारवाई, किचनमध्ये प्रचंड अस्वच्छता अन् उंदरांचं साम्राज्य
नागपूरमधील तीन बड्या हॉटेल्सवर एफडीएची कारवाई, किचनमध्ये प्रचंड अस्वच्छता अन् उंदरांचं साम्राज्य
Pune Moshi Building Collapse: मोठी बातमी! अखेर मोशी दुर्घटना प्रकरणात कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, 'एबीपी माझा'ने पर्दाफाश केल्यानंतर आयुक्तांना जाग
मोठी बातमी! अखेर मोशी दुर्घटना प्रकरणात कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, 'एबीपी माझा'ने पर्दाफाश केल्यानंतर आयुक्तांना जाग

व्हिडीओ

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Iran Conflict: अमेरिकेचा सलग तिसऱ्या रात्रीही इराणवर कहर; ड्रोन अन् क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, '...अन्यथा आम्ही अणु ठिकाणही उडवू'
अमेरिकेचा सलग तिसऱ्या रात्रीही इराणवर कहर; ड्रोन अन् क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, '...अन्यथा आम्ही अणु ठिकाणही उडवू'
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
Sunetra Pawar NCP Crisis: सुनेत्रा पवारांच्या निवडीवर आक्षेप घेणाऱ्या नोटीसमागे वेगळाच मास्टरमाईंड? सुनील तटकरे-प्रफुल पटेलांनी....
सुनेत्रा पवारांच्या निवडीवर आक्षेप घेणाऱ्या नोटीसमागे वेगळाच मास्टरमाईंड? सुनील तटकरे-प्रफुल पटेलांनी...
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
Embed widget