एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दारुची वाहतूक करणाऱ्या दुचाकीचा अपघात, एकाचा मृत्यू
बीड : दोन दुचाकींची समोरा-समोर धडक झाल्यामुळे दोन्ही गाड्यांनी पेट घेतला. या आगीत एका दुचाकीस्वाराचा जागीच जळून मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग 222 वर दुगड पेट्रोलपंपाजवळ ही घटना घडली.
जखमी दुचाकीस्वाराला बीड जिल्हा रूग्णायालत उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. या अपघातातील एका दुचाकीस्वाराजवळ दारु बाटल्याची बॅग असल्यामुळेच दोन्ही दुचाकींनी पेट घेतल्याची माहिती आहे. तसेच अपघातस्थळी दारुच्या बाटल्याही आढळून आल्या.
अपघातातील दुचाकीस्वार नितीन जयस्वाल (वय 24 वर्षे) हा गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी नितीन जयस्वालला माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं.
जयस्वाल हा मोठ्या प्रमाणात भाजलेला असल्यामुळे त्याला प्राथमिक उपचार करुन बीड जिल्हा शासकिय रूग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं. मात्र जागीच जळून मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराची ओळख अद्याप पटलेली नाही, मृतदेह माजलगाव ग्रामीण रूग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement