एक्स्प्लोर
पंकजा-भुजबळ भेटीनंतर भुजबळ समर्थक दिलीप खैरे भाजपच्या वाटेवर?
नाशिक : पंकजा मुंडे आणि छगन भुजबळांच्या भेटीनंतर उधाण आलेल्या तर्कवितर्कांना आता बळ मिळताना दिसत आहे. पंकजा आणि भुजबळ भेटीनंतर नाशकात घडामोडींना वेग आला आहे. भुजबळ समर्थक भाजपच्या वाटेवर असल्याची चाहूल लागली आहे.
संबंधित बातमी : पंकजा मुंडे छगन भुजबळांच्या भेटीसाठी जे जे रुग्णालयात
छगन भुजबळांचे कट्टर समर्थक आणि विश्वासू दिलीप खैरे आणि भाजपचे नाशिक प्रदेश उपाध्यक्ष वसंत गीते यांची नाशिकमध्ये भेट झाली. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. तसंच भुजबळ समर्थकांचा 3 ऑक्टोबरला नाशिकमध्ये मोर्चा आहे. छगन भुजबळांच्या समर्थनार्थ या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी काल जेजे रुग्णालयात जाऊन छगन भुजबळ यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. मात्र ही सदिच्छा भेट होती. कौटुंबिक संबंधांमुळे आजारी भुजबळांची भेट घेतल्याचं स्पष्टीकरण पंकजा मुंडेंनी दिलं.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement