एक्स्प्लोर
ग्रामपंचायत निवडणूक जिंकण्यासाठी जादूटोण्याचा वापर? भिवंडीतील भिनार येथील खळबळजनक प्रकार समोर
निवडणूक जिंकण्यासाठी जादूटोण्याचा वापर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडी तालुक्यातील भिनार या गावात समोर आला आहे.

सांकेतिक छायाचित्र
भिवंडी : तालुक्यातील 53 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. एक दोन ठिकाणच्या घटना वगळता या निवडणुका शांततेत पार पडल्या आहेत. मात्र, प्रतिस्पर्धी उमेदवाराला हरविण्यासाठी चक्क जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीतील भिनार ग्रामपंचायतमध्ये समोर आला आहे. या अशा जादूटोण्याला गाववाले घाबरणार नाहीत, असे सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे.
एकीकडे राज्यात जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार अंधश्रद्धा निर्मूलनासाठी राज्यशासन प्रयत्नशील असून दुसरीकडे निवडणुकांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांना हरवण्यासाठी किंवा इजा पोहचविण्यासाठी चक्क जादूटोणा होत असल्याची घटना भिवंडीतील भिणार गावात समोर आली आहे. भिनार गावात ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड क्रमांक एकमधून शिवसेना व वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत जय बजरंग पॅनल भीमराव कांबळे, करून भोईर व लक्ष्मी भोईर असे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मात्र, या उमेदवारांना हरविण्यासाठी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी चक्क त्यांच्या प्रचार पत्रकात अर्धा लिंबू कापून, कुंकू व तांदूळ असा उतारा करून गावातील तलावाच्या बाजूला असलेल्या बोरीच्या झाडाखाली फेकून दिला होता. शनिवारी गावातील एक व्यक्ती बोरं खाण्यासाठी या झाडाजवळ गेला असता सदर प्रकार त्याला दिसल्याने त्यांनी गावातील नागरिकांना सांगितला. त्यानंतर तिन्ही उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी या ठिकाणि धाव घेत एकच गर्दी केली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























