Raju Karemore Arrest Update : भंडारा जिल्ह्यातील तुमसरचे (Bhandara Tumsar) आमदार राजू कारेमोरे (Raju Karemore) यांना अटक करण्यात आली आहे. 31 डिसेंबरच्या रात्री मोहाडी पोलिस स्टेशनमध्ये त्यांनी राडा घातला होता. तसेच पोलिसांना अश्लील शिवीगाळ  केली होती. व्यापारी मित्रांना पोलिसांनी मारहाण केल्याचा अणि 50 लाख चोरी केले असल्याचा कारेमोरे यांनी आरोप लावला होता. आज त्यांना त्यांच्या घरातून भंडारा पोलिसांनी अटक केले. विविध कलमान्वये आज अटक करून त्यांना कोर्टात हजर केले आहे.


आमदार राजू कारेमोरे (Raju Karemore )  यांच्या व्यापारी मित्रांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळे आमदार कारेमोरे यांनी थेट पोलीस ठाणे गाठले होते. यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यातच धिगांना घातला होता. आमदारांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.  राजू कारेमोरे यांचे दोन व्यापारी मित्र काल रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान आमदारांच्या घरून 50 लाख रुपयांची रोकड घेऊन एका गाडीतून तुमसरकडे घेऊन जात होते.


यावेळी मोहाडी येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या स्ट्रॉंग रूमच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी गाडी चालकाला इंडिकेटर का दिले नाही? म्हणून गाडीचा पाठलाग करून गाडी थांबवली. गाडीतील यासीम छवारे आणि अविनाश पटले या दोन व्यक्तींना याबाबत विचारणा करण्यात आल्यानंतर पोलीस आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. पटले आणि छवारे यांच्याजवळील 50 लाख रुपयांची रोख रक्कम आणि एक सोन्याची चेन पोलिसांनी पळविल्याची तक्रार फिर्यादी यासीम छावारे यांनी मोहाडी पोलिसात दिली. 


बंदोबस्तावर तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक राणे यांनी देखील फिर्यादी यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर आमदार राजू कारेमोरे यांनी माफी देखील मागितली होती.



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा




इतर महत्वाच्या बातम्या



Bhandara : व्यापारी मित्राला पोलिसांकडून बेदम मारहाण, आमदार राजू कारेमोरेंचा पोलीस ठाण्यात धिंगाणा