Bhandara : आधी पोलीस स्थानकात धिंगाणा, नंतर माफीनामा, अखेर आमदार कारेमोरे नमले
भंडाऱ्यात व्यापारी मित्राला पोलिसांनी बेदम मारहाण केली म्हणून आमदार राजू कारेमोरे यांनी पोलीस ठाण्यात धिंगाणा घातला. पोलिसांनी 50 लाख रुपयाची रक्कम पळवल्याची तक्रार राजू कारेमोरे यांच्या मित्राने पोलिसांत केली. तर पोलिसांनी देखील आरोपी विरुद्ध शासकीय कामात अडथळा करत असल्याची तक्रार केली. यानंतर त्यांनी माफी मागितलीय.