Pune Athletics Association : सध्या पर्यावरणाविषयी जनजागृती करणं काळाची गरज बनली आहे. एकीकडे होणारा विकास आनंद देणारा असला तरी दुसरीकडे त्यामुळे होणारी पर्यावरणाची हानी चिंता वाढवणारी आहे. अशातच पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी पर्यावरणाविषयी जनजागृती करणं ही काळाची गरज बनली आहे. अनेकदा आपण नकळत काही गोष्टी करतो, ज्यामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत असतो. अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या मोहिमा राबवत असतात. 


पर्यावरण रक्षणाचा संदेश घेऊन आठ पर्यावरणप्रेमींनी कश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत सायकल वरून प्रवास सुरु केला आहे. पुणे येथील मावळ अथलेटिक असोसिएशनच्या (Pune Athletics Association Cycle Ride) आठ मित्रांनी एकत्र येऊन पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. 24 डिसेंबर पासून काश्मीर मधल्या श्रीनगर पासून आपली सायकल यात्रा सुरु केली आहे आणि 14 दिवसांमध्ये ते कन्याकुमारी या ठिकाणी पोहोचणार आहेत. 


एकूण तीन हजार सातशे किलोमीटरचा हा प्रवास असून दहा राज्यातून ही सायकल यात्रा जाणार आहे. यामध्ये पर्यावरण रक्षणाचा संदेश ते देणार आहेत. दररोज 250 किलोमीटरचा प्रवास ते या सायकलवरून करतात. आज त्यांची सायकल यात्रा बीडमध्ये दाखल झाली होती. 


स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव वेगवेगळ्या उपक्रमांमधून साजरा केला जात आहे. त्यामुळे या आठ मित्रांनी एकत्र येऊन एक सामाजिक संदेश देऊन स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचा पण घेतला. ही सायकल यात्रा सुरु केली आहे. सहा जानेवारीला ते कन्याकुमारी या ठिकाणी पोहोचणार असून त्या ठिकाणी पर्यावरण रक्षणासाठी लोकांना मार्गदर्शन करणार आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा