भंडारा : जिल्ह्याच्या तुमसर मोहाडी विधानसभेचे आमदार राजू कारेमोरे (Raju Karemore ) यांच्या व्यापारी मित्रांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळे आमदार कारेमोरे यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यातच धिगांना घातला. आमदारांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आमदार राजू कारेमोरे यांचे दोन व्यापारी मीत्र काल रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान आमदारांच्या घरून 50 लाख रुपयांची रोखड एका आरटीका गाडीतून तुमसरकडे घेऊन जात होते. यावेळी मोहाडी येथील महिला आर्थिक विकास महामंळाच्या स्टँग रूमच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी गाडी चालकाला इंडिकेटर का दिले नाही? म्हणून गाडीचा पाठलाग करून गाडी थांबवली. गाडीतील यासीम छवारे आणि अविनाश पटले या दोन व्यक्तींना याबाबत विचारणा करण्यात आल्यानंतर पोलीस आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे पोलिसांनी दोघांनाही मारहाण केली.
पटले आणि छवारे यांच्याजवळील 50 लाख रुपयांची रोख रक्कम आणि एक सोन्याची चेन पोलिसांनी पळविल्याची तक्रार फिर्यादी यासीम छावारे यांनी मोहाडी पोलिसात दिली आहे.
बंदोबस्तावर तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक राणे यांनी देखील फिर्यादी यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांची तक्रार दाखल करून घेत तपास सुरु केला आहे. तर दुसरीकडे आमदार राजू कारेमोरे यांनी खाकी वर्दी घालून दबंग गिरी करणाऱ्या पोलीस उप निरीक्षकावर कारवाई करण्याची मागणी आमदार राजू कोरेमोरे यांनी केली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर पोलीस ठाण्याच्या परिसरात थोडावेळ तणावाचे वातावरण होते. वरिष्ठांनी मध्यस्ती करून वाद मिटवला. त्यामुळे काही काळातच तणावाचे वातावरण निवळले.
महत्वाच्या बातम्या
- Corona Vaccination : मुलांचे लसीकरण का गरजेचे आहे? काय आहेत फायदे? तज्ञांनी सांगितली महत्वाची माहिती
- Florona: ओमायक्रॉननंतर जगासमोर आता प्लोरोनाचं संकट! इस्रायलमध्ये आढळला पहिला रुग्ण; कोरोना- इन्फ्लूएंझाचा डबल इन्फेशक्शन असल्याचा दावा
- Coronavirus Testing : कोरोना चाचणीसाठी 24 तास बूथ उभारा, केंद्राचे राज्यांना आदेश