एक्स्प्लोर

महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या विनयभंग प्रकरणी भाजप आमदाराला अटक, कोठडीत रवानगी

भाजपच्या नाराज नेत्यांची आमदार चरण वाघमारे यांची तिकीट कापण्यासाठी केलेला प्रयत्न असल्याच्या आरोप चरण वाघमारे यांच्या समर्थकांनी केला असून त्यांच्या निषेध म्हणून तुमसर मोहाडी बंदची हाक वाघमारे समर्थकांनी दिली आहे.

भंडारा : महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या तक्रारीवरून विनयभंगाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आलेल्या आमदार चरण वाघमारे यांना पोलिसांनी अटक केली आहे. तुमसर न्यायालयाने दहा ऑक्टोबरपर्यंत आमदार चरण वाघमारे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांद्वारे निष्पक्ष तपास न झाल्याने नाराज  होऊन विनयभंग प्रकरणी जामीन घेण्यास वाघमारे यांनी नकार दिल्यानंतर दहा ऑक्टोबरपर्यंत वाघमारे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे . त्यामुळे आता आमदार वाघमारे यांचा दहा ऑक्टोबरपर्यंत तुरुंगात मुक्काम राहणार आहे. दरम्यान भाजपच्या नाराज नेत्यांची आमदार चरण वाघमारे यांची तिकीट कापण्यासाठी केलेला प्रयत्न असल्याच्या आरोप चरण वाघमारे यांच्या समर्थकांनी केला असून त्यांच्या निषेध म्हणून तुमसर, मोहाडी बंदची हाक वाघमारे समर्थकांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख चार ऑक्टोबर असल्याने आमदारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, चरण वाघमारे यांनी आरोप खोटे असून जो पर्यंत माझ्या विरुद्ध गुन्हा सिद्ध होत नाही तो पर्यंत जामीन घेणार नसल्याचे आमदार वाघमारे यांनी कोर्टासमोर सांगितले. वाघमारे यांना 10 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्याने संतापलेल्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघात टायर जाळून निषेध व्यक्त केला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून जिल्हाला पोलीस छावणीचे रूप आले आहे.
कामगार सुरक्षा किट वाटप कार्यक्रमात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ करून त्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी भाजपचे आमदार चरण वाघमारे यांच्यासह शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांना भंडारा पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांविरोधात 18 तारखेला तुमसर येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा गुन्हा सिद्ध झाल्याने त्यांना शनिवारी सकाळी अटक करण्यात आल.
दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या आमदारावर महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या उमेदवारीवर ही प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ravi Rana: पंधरा दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री, तर दोन्ही शिवसेना...; आमदार रवी राणांच्या भविष्यवाणीनं भुवया उंचावल्या!
आमदार रवी राणांच्या भविष्यवाणीनं भुवया उंचावल्या! म्हणाले, पंधरा दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री तर राज्याची सूत्र सुनेत्रा पवारांच्या हाती
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
Ratnagiri News: दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri News: दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
Rohini Khadse: फडणवीसजी-शिंदे साहेब 2100-1500 सोडा, लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला साडीही परवडत नाही का? रोहिणी खडसेंचा सवाल
फडणवीसजी-शिंदे साहेब 2100-1500 सोडा, लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला साडीही परवडत नाही का? रोहिणी खडसेंचा सवाल
Monsoon Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?
Satej Patil on Jayant Patil: जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
Embed widget