एक्स्प्लोर

भंडारा सामूहिक अत्याचार प्रकरणाला एक महिना लोटला; मुख्य आरोपी अद्यापही फरार, तपासात आतापर्यंत काय काय घडलं?

Bhandara Rape Case :   35 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भंडाऱ्यात (Bhandara) घडली  होती. या घटनेला आज एक महिना लोटला आहे.

Bhandara Rape Case :  मदतीचं आश्वासन देऊन 35 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भंडाऱ्यात (Bhandara) घडली  होती. या घटनेला आज एक महिना लोटला आहे.  गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात 35 वर्षीय महिलेवर घडलेल्या सामूहिक बलात्कार (Bhandara rape case update) प्रकरणातला फरार आरोपी घटनेच्या एक महिन्यानंतरही फरार आहे. 30 जुलै संध्याकाळपासून ते 2 ऑगस्टच्या पहाटेदरम्यान पीडित महिलेवर आधी गोंदिया जिल्ह्यात आणि त्यानंतर भंडारा जिल्ह्यात अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन वेळेला बलात्कार झाले होते. भंडारा जिल्ह्यातील बलात्काराच्या घटनेचे दोन आरोपी घटनेच्या बारा तासानंतरच अटक करण्यात पोलिसांना यश आले होते.  मात्र, गोंदिया जिल्ह्यातल्या घटनेचा आरोपी एका महिन्यानंतरही फरार आहे.

राज्याच्या गृह विभागाने या संदर्भात महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन केली होती. जोवर घटनेचा तपास पूर्ण होत नाही तोवर एसआयटी कार्यरत राहील असे गृह विभागाने जाहीर केले होते. एसआयटी गेले महिनाभरापासून गोंदिया जिल्ह्यात तळ ठोकून आहे. मात्र, आरोपी मिळालेला नाही. 

जंगलाचा भाग असल्यानं आरोपीचा शोध घेण्यात अडचणी

गोंदिया जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी घटना घडली होती तो जंगलाचा भाग आहे. तिथे सीसीटीव्ही नाहीत. त्यामुळेही गोंदिया जिल्ह्यातल्या घटनेच्या आरोपीचा शोध घेण्यात अडचणी येत असल्याची माहिती गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे.सुरुवातीचे पंधरा दिवस पिडितेची प्रकृती बरी नव्हती, त्यामुळे तिचे बयान होत नव्हते. गेल्या आठवड्याभरात पीडितेने बरीचशी माहिती पोलिसांना दिली असून पोलीस त्या माहितीच्या आधारावर शोध घेत असल्याचे संदीप पाटील म्हणाले.

पीडितेच्या माहितीनुसार स्केच बनवले

पीडित महिलेने गोंदिया जिल्ह्यातल्या घटनेसंदर्भातल्या आरोपीची जी माहिती सांगितली होती. त्या आधारे पोलिसांनी एक स्केचही बनवला होता. त्या स्केचशी आणि माहितीशी मिळते जुळते चार लोक ताब्यात घेण्यात आले होते . मात्र त्या चार जणांपैकी कोणाचाही बलात्काराच्या घटनेत सहभाग दिसून नाही.म्हणून त्यांना सोडून देण्यात आल्याचे पाटील म्हणाले.

पीडितेला बोलतं करण्यासाठी मानसोपचार तज्ञांची मदत

पीडितेला बोलतं करण्यासाठी मानसोपचार तज्ञांची ही मदत घेतली जात आहे. लवकरच आम्ही गोंदिया जिल्ह्यातल्या बलात्काराच्या घटनेच्या फरार आरोपीला अटक करण्यात यश मिळवू असा विश्वास संदीप पाटील यांनी व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Family In Surat Gujarat मोठी बातमी: कालव्यात फेकलेलं कुटुंब निघालं विमा घोटाळ्यातील साक्षीदार, हादरवणारी माहिती समोर, जळगाव ते सूरत तपासाची चक्र फिरली!
कालव्यात फेकलेलं कुटुंब निघालं विमा घोटाळ्यातील साक्षीदार, हादरवणारी माहिती समोर, जळगाव ते सूरत तपासाची चक्र फिरली!
Laxman Hake on Supriya Sule CM Post: सुप्रिया सुळे भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाल्या तर शरद पवारांच्या राजकारणाची विश्वासार्हता कायमची संपेल: लक्ष्मण हाके
सुप्रिया सुळे भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाल्या तर शरद पवारांच्या राजकारणाची विश्वासार्हता कायमची संपेल: लक्ष्मण हाके
Jalgaon Family In Surat Gujarat: गुजरातमध्ये महाराष्ट्रातील कुटुंबाला कालव्यात फेकलं; 3 जणांचे मृतदेह सापडले, दोन मुलं बेपत्ता, एक मुलगा पाईप पकडून थरथर कापत आला बाहेर, सगळे हादरले!
गुजरातमध्ये महाराष्ट्रातील कुटुंबाला कालव्यात फेकलं; 3 जणांचे मृतदेह सापडले, दोन मुलं बेपत्ता, एक मुलगा पाईप पकडून थरथर कापत आला बाहेर, सगळे हादरले!
Pune Devram Lande: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे मनसे कार्यालयात; राज ठाकरेंवरील वक्तव्याप्रकरणी मागितली माफी; प्रतिमेसमोर दिलगिरी व्यक्त करत म्हणाले....
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे मनसे कार्यालयात; राज ठाकरेंवरील वक्तव्याप्रकरणी मागितली माफी; प्रतिमेसमोर दिलगिरी व्यक्त करत म्हणाले....

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on Supriya Sule CM Post: सुप्रिया सुळे भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाल्या तर शरद पवारांच्या राजकारणाची विश्वासार्हता कायमची संपेल: लक्ष्मण हाके
सुप्रिया सुळे भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाल्या तर शरद पवारांच्या राजकारणाची विश्वासार्हता कायमची संपेल: लक्ष्मण हाके
UP Election 2027: 'बात सीट की नहीं, जीत की है', काँग्रेससोबतच्या जागावाटपावर अखिलेश यादवांची भली मोठी पोस्ट, दुसरीकडे काँग्रेसचे हायकमांडची नाराजी, जागावाटपावरून खलबतं सुरू
'बात सीट की नहीं, जीत की है', काँग्रेससोबतच्या जागावाटपावर अखिलेश यादवांची भली मोठी पोस्ट, दुसरीकडे काँग्रेसचे हायकमांडची नाराजी, जागावाटपावरून खलबतं सुरू
Sanjay Raut On Sanjay Shirsat: नाथानी हाइट्स बिल्डिंगच्या 72व्या मजल्यावर बोलावलं; 20 टक्के मागितले, मंत्री संजय शिरसाटांचं नाव घेत संजय राऊतांचा नवा बॉम्ब, नेमकं काय म्हणाले?
नाथानी हाइट्स बिल्डिंगच्या 72व्या मजल्यावर बोलावलं; 20 टक्के मागितले, मंत्री संजय शिरसाटांचं नाव घेत संजय राऊतांचा नवा बॉम्ब, नेमकं काय म्हणाले?
Pune Devram Lande: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे मनसे कार्यालयात; राज ठाकरेंवरील वक्तव्याप्रकरणी मागितली माफी; प्रतिमेसमोर दिलगिरी व्यक्त करत म्हणाले....
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे मनसे कार्यालयात; राज ठाकरेंवरील वक्तव्याप्रकरणी मागितली माफी; प्रतिमेसमोर दिलगिरी व्यक्त करत म्हणाले....
Pune Crime News: पुण्यातील शिवाजीनगर कोर्टासमोर गोळीबार; बंदूक टाकून आरोपी फरार, नेमकं काय घडलं?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टासमोर गोळीबार; बंदूक टाकून आरोपी फरार, नेमकं काय घडलं?
Pune Flex: पुण्यात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिम; भाजपचेच ‘नेते’ आघाडीवर, पालिकेकडून विद्रुपीकरण पुरस्काराचे मानकरी जाहीर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंसह नगरसेवक पृथ्वीराज सुतार, पांडे यादीत
पुण्यात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिम; भाजपचेच ‘नेते’ आघाडीवर, पालिकेकडून विद्रुपीकरण पुरस्काराचे मानकरी जाहीर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंसह नगरसेवक पृथ्वीराज सुतार, पांडे यादीत
Hinjewadi Crime News: साडेतीन वर्षांचे प्रेमसंबंध; तीन महिन्यांपासून वाद, रागात प्रेयसीचं डोकं आधी भिंतीवर मग बेडवर आपटलं... इन्फोसिसच्या शुभमने विप्रोच्या कोमलला संपवलं अन्...
साडेतीन वर्षांचे प्रेमसंबंध; तीन महिन्यांपासून वाद, रागात प्रेयसीचं डोकं आधी भिंतीवर मग बेडवर आपटलं... इन्फोसिसच्या शुभमने विप्रोच्या कोमलला संपवलं अन्...
Sunetra Pawar and Supriya Sule: यशवंतराव चव्हाणांचा स्मृतीदिन; साताऱ्यात सुनेत्रा पवार अन् सुप्रिया सुळे एकाच मंचावर, नतमस्तक होत चर्चा, नेमकं काय घडलं?
यशवंतराव चव्हाणांचा स्मृतीदिन; साताऱ्यात सुनेत्रा पवार अन् सुप्रिया सुळे एकाच मंचावर, नतमस्तक होत चर्चा, नेमकं काय घडलं?
Embed widget