एक्स्प्लोर

बेल्जियमचा नागरिक सह्याद्रीच्या प्रेमात, दोन महिन्यात 200 किल्ल्यांची भ्रमंती

पीटर हे मुळचे बेल्जियमचे. पण भारतात ते काही पाहुणे नाहीत. गेल्या 20 वर्ष ते कामानिमित्त चेन्नईमध्ये राहत आहेत. त्यांना फिरण्याची प्रचंड आवड आहे. दर उन्हयाळ्यात ते हिमालयाची सैर करतात. त्याचसोबत ते धावण्याचा सरावही करतात.

पुणे : महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहेच. पण मुळचे बेल्जियमचे असलेले पिटर वॅनग्या हे सह्याद्रीच्या कडांवरच्या गड किल्ल्यांनी इतके भारावून गेले की त्यांनी मागच्या दोन महिन्यांत 200 किल्ल्यांची भ्रमंती केली. पीटर हे मुळचे बेल्जियमचे. पण भारतात ते काही पाहुणे नाहीत. गेल्या 20 वर्ष ते कामानिमित्त चेन्नईमध्ये राहत आहेत. त्यांना फिरण्याची प्रचंड आवड आहे. दर उन्हयाळ्यात ते हिमालयाची सैर करतात. त्याचसोबत ते धावण्याचा सरावही करतात. पण सह्याद्रीची भेट घेण्याची ही त्यांची पहिलीच वेळ. इथल्या किल्ल्यांच्या फक्ते फोटोंनीच ते इतके भारावून गेले की त्यांनी संपूर्णं हिवाळ्यात यांची सैर करायचं ठरवलं आणि 2 महिन्यांमध्ये लहानमोठ्या अशा तब्बल 200 किल्ल्यांवर भ्रमंती केली. Peter Van Geit | बेल्जियमच्या नागरिकाकडून 200 किल्ल्यांची भ्रमंती | ABP Majha पाठीवरची फक्त एक स्लिपींग बॅग घेऊन त्यांनी हा प्रवास सुरु केला आणि फोनमध्ये ते आठवणी टीपत गेले. पीटर हे एका दिवसामध्ये 100 किलोमिटरपर्यंतही धावू शकतात असं त्यांनी सांगतिलं. त्यामुळे गड चढणं त्यांना फार कठीण वाटलं नाही. भंडारदरा भागातील किल्ले त्यांना जास्त निसर्गरम्य वाटले. तर महाबळेश्वरच्या सौंदर्यानेही ते भारावून गेले. महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. शिवरायांच्या वास्तव्यानं पवित्र झालेल्या किल्ल्याचं आकर्षण परदेशातही आहे. त्यामुळे मुळचे बेल्जियमचे असलेले पिटर वॅनग्या गड किल्ल्यांनी भारावून गेले आहेत. शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांना आधी फार माहिती नव्हता. पण प्रत्येक किल्ल्यानुसार त्यांना तो इतिहास उलगडत गेला. इथल्या स्थानिकांच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल एखाद्या देवासारखा आदर आहे असं जाणवल्याचंही त्यांनी सांगितलं. या सगळ्या भ्रमंतीच्या दरम्यान स्थानिक लोकांच्या आदरातिथ्याचा पिटर यांनी आवर्जून उल्लेख केला. पिठलं भाकरीच्या तर ते विशेष प्रेमात पडले. फिरण्याच्या आवडीसाठी पिटर यांनी काही वर्ष आधी नोकरी सोडली. संबंधित बातम्या : 

सिंहगड किल्ल्यावर जाणारा रस्ता महिनाभर पर्यटकांसाठी बंद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Laxman Hake: ब्राह्मणांनी शिक्षणाच्या जोरावर प्रगती केली, त्यांनी मागासलेल्यांना हक्क मिळवून दिले, ते ओबीसींचे शत्रू नाहीत: लक्ष्मण हाके
ब्राह्मणांनी शिक्षणाच्या जोरावर प्रगती केली, त्यांनी मागासलेल्यांना हक्क मिळवून दिले, ते ओबीसींचे शत्रू नाहीत: लक्ष्मण हाके
Chhagan Bhujbal : समीर भुजबळ आता हळूहळू फ्रंटफुटवर येत आहेत त्यांना आशीर्वाद द्या, छगन भुजबळ यांचं नांदगावकरांना आवाहन
समीर आणि पंकज स्वतःचे निर्णय घ्यायला शिका, पुतण्या अन् लेकाला सल्ला देताना छगन भुजबळ यांनी टायमिंग साधलं
Ratan Tata Death: PM मोदींनी टाटा घराण्यातील 'त्या' व्यक्तीशी फोनवरुन साधला संवाद, अंत्यसंस्कारासाठी सरकारच्यावतीने अमित शाह मुंबईत येणार
PM मोदींनी टाटा घराण्यातील 'त्या' व्यक्तीशी फोनवरुन साधला संवाद, अंत्यसंस्कारासाठी सरकारच्यावतीने अमित शाह मुंबईत येणार
Ratan Tata Death: रतन टाटांच्या निधनानंतर मुंबई पोलिसांचं ट्विट होतंय व्हायरल, इंडिया लॉस्ट इटस् रतन!
रतन टाटांच्या निधनानंतर मुंबई पोलिसांचं ट्विट होतंय व्हायरल, इंडिया लॉस्ट इटस् रतन!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal :  मुलगा पंकज आणि पुतण्या समीरला भुजबळांचा वडिलकीचा सल्लाRatan Tata Passed Away : रतन टाटांच्या निधनामुळे शासकीय दुखवटा; अमित शाह उपस्थित राहणारABP Majha Headlines :  9 AM : 10 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitin Gadkari on Ratan Tata Death : महान देशभक्त असण्यासोबतच ते तत्वांचे पालन करणारेही होते

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake: ब्राह्मणांनी शिक्षणाच्या जोरावर प्रगती केली, त्यांनी मागासलेल्यांना हक्क मिळवून दिले, ते ओबीसींचे शत्रू नाहीत: लक्ष्मण हाके
ब्राह्मणांनी शिक्षणाच्या जोरावर प्रगती केली, त्यांनी मागासलेल्यांना हक्क मिळवून दिले, ते ओबीसींचे शत्रू नाहीत: लक्ष्मण हाके
Chhagan Bhujbal : समीर भुजबळ आता हळूहळू फ्रंटफुटवर येत आहेत त्यांना आशीर्वाद द्या, छगन भुजबळ यांचं नांदगावकरांना आवाहन
समीर आणि पंकज स्वतःचे निर्णय घ्यायला शिका, पुतण्या अन् लेकाला सल्ला देताना छगन भुजबळ यांनी टायमिंग साधलं
Ratan Tata Death: PM मोदींनी टाटा घराण्यातील 'त्या' व्यक्तीशी फोनवरुन साधला संवाद, अंत्यसंस्कारासाठी सरकारच्यावतीने अमित शाह मुंबईत येणार
PM मोदींनी टाटा घराण्यातील 'त्या' व्यक्तीशी फोनवरुन साधला संवाद, अंत्यसंस्कारासाठी सरकारच्यावतीने अमित शाह मुंबईत येणार
Ratan Tata Death: रतन टाटांच्या निधनानंतर मुंबई पोलिसांचं ट्विट होतंय व्हायरल, इंडिया लॉस्ट इटस् रतन!
रतन टाटांच्या निधनानंतर मुंबई पोलिसांचं ट्विट होतंय व्हायरल, इंडिया लॉस्ट इटस् रतन!
Ratan Tata Death: रतन टाटांच्या श्नानप्रेमचा किस्सा , चक्क प्रिन्स चार्ल्सची भेट रद्द केलेली, राज ठाकरेंनी सांगितला तो किस्सा
रतन टाटांच्या श्नानप्रेमचा किस्सा , चक्क प्रिन्स चार्ल्सची भेट रद्द केलेली, राज ठाकरेंनी सांगितला तो किस्सा
Ratan Tata:'ती' बातमी कळताच JRD  संतापले, रतन टाटांना चांगलंच खडसावलं; स्वत:च्याच कंपनीत काम करण्यासाठी करावा लागला बायोडाटा
'ती' बातमी कळताच JRD संतापले, रतन टाटांना चांगलंच खडसावलं; स्वत:च्याच कंपनीत काम करण्यासाठी करावा लागला बायोडाटा
PETA Letter To Salman Khan : बिग बॉसच्या घरात बांधलेल्या गाढवामुळे सलमान खानच्या अडचणी वाढणार? PETA नं धाडलंय पत्र
बिग बॉसच्या घरात बांधलेल्या गाढवामुळे सलमान खानच्या अडचणी वाढणार? PETA नं धाडलंय पत्र
Ratan Tata Death: रतन टाटांच्या निधनानंतर भारतातून पळून गेलेला उद्योगपती विजय माल्ल्यालाही राहवलं नाही, ट्विट करुन म्हणाला
रतन टाटांच्या निधनानंतर भारतातून पळून गेलेला उद्योगपती विजय माल्ल्यालाही राहवलं नाही, ट्विट करुन म्हणाला
Embed widget