एक्स्प्लोर

Belgaon News : किल्ल्यांची नावे असलेली भोजनाची दालने, जेवण्यासाठी भारतीय बैठक; शिवप्रेमीचं 'येस राजवाडा' हॉटेल

Belgaon News : हे हॉटेल एका शिवप्रेमीचं आहे. आपला वारसा, संस्कृती पुढील पिढीला समजावी म्हणून या शिवप्रेमीने 'येस राजवाडा' हे हॉटेल उभारले आहे. किल्ला नव्हे तर हॉटेल आहे, असं सांगितलं तर काही क्षण विश्वास बसणार नाही.

Belgaon News : एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो तर तिथल्या जेवणासोबत तिथलं वातावरण कसं आहे, हॉटेलची रचना कशी आहे, बैठकव्यवस्था कशी आहे, याकडेही आपण लक्ष देतो. सध्या वेगवेगळ्या रचना असलेली हॉटेल पाहायला मिळतात. असंच एक हॉटेल बेळगावमध्ये (Belgaon) आहे. बाहेरुन पाहिला तर तुम्हाला तो किल्ला (Fort) वाटेल. परंतु हा किल्ला नसून हॉटेल (Hotel) आहे, हे सांगितल्यावर काही क्षण विश्वास बसणार नाही. हे हॉटेल एका शिवप्रेमीचं आहे. आपला वारसा, संस्कृती पुढील पिढीला समजावी म्हणून या शिवप्रेमीने उभारलेले 'येस राजवाडा' हे हॉटेल आहे.

शेंगा आणि गूळ देऊन स्वागत, जेवण्यासाठी भारतीय बैठक
लक्ष्मीकांत पाटील म्हणजे अस्सल शिवप्रेमी व्यक्तिमत्त्व. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे त्यांचे दैवत. किल्ल्यासारखी तटबंदी, बुरुजावर उभारलेले मावळे पाहिले की आपण शिवकाळात जातो. हॉटेलच्या भव्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला की एका बाजूला नजरेस पडते छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आणि दुसऱ्या बाजूला राजमाता जिजाऊ आणि शिवराय. तिथून आत गेल्यावर अनेक किल्ल्यांची नावे असलेली भोजनाची दालने पाहिली की पाहणाऱ्यांचा उर अभिमानाने भरुन येतो. भोजनाच्या दालनात लोड तक्के असून जेवणाचे ताट चौरंगावर ठेवले जाते. अस्सल भारतीय बैठक असून मांसाहारी आणि शाकाहारी भोजनाचा आस्वाद घेता येतो. हॉटेलमध्ये आल्यावर ग्राहकाला प्रथम शेंगा आणि गूळ दिले जाते. आजही ग्रामीण भागात आजही घरी आलेल्या व्यक्तीला शेंगा आणि गूळ देऊन स्वागत केले जाते. आपली परंपरा जपण्याचा हा एक प्रयत्न.

किल्ल्यांची नावे असलेली भोजनाची दालने 
सिंधुदुर्ग, विशाळगड, पन्हाळा, सिंहगड,पारगड, प्रतापगड, रायगड, राजगड, तोरणा, शिवनेरी अशी भोजनाच्या दालनांची नावे आहेत. हॉटेलच्या मागच्या बाजूस एखाद्या राजवाड्याचा फील यावा अशा पद्धतीचे स्टेज आहे. तिथे तुम्ही सहकुटुंब किंवा मित्रमंडळीसह वाढदिवस  किंवा अॅनिवर्सरी साजरी करु शकता. 

शाही थाळी हे येस राजवाडा हॉटेलचे वैशिष्ट्य
हॉटेलमध्ये  छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन दर्शन घडवणारी  देखणी पोस्टर्स देखील लक्ष वेधून घेतात. शाही थाळी हे येस राजवाडा हॉटेलचे वैशिष्ट्य. एका थाळीत दोन जण भरपेट जेवण करु शकतात. मटण, चिकनचे विविध प्रकार आणि सोबतीला तांबडा, पांढरा रस्सा आणि बरेच काही आहे. शाकाहारी थाळी देखील येथे उपलब्ध आहे. विशेष म्हणजे हॉटेलचे कर्मचारी अगदी आग्रह करुन वाढतात. हॉटेलचे मालक लक्ष्मीकांत पाटील ग्राहकांशी संवाद साधून त्यांचा अभिप्राय जाणून घेतात. 

बाहेर हॉटेलात जेवायला तर सगळे जण जातात मात्र पूर्ण शिवमय वातावरणात जेवणाची संधी मिळाली तर त्याचा आनंद कसा असतो हे अनुभवायला येस राजवाडाला भेट द्यायलाच पाहिजे. कोल्हापूरहून येताना कोगनोळी टोलनाका पार करुन आल्यावर निपाणीकडे जाताना मांगुर फाटा येथे आत गेल्यावर जत्राट गावात नदीकाठी हे हॉटेल आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड घरात शिरला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड घरात शिरला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
Cheapest Flight Tickets : स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
Rahul Gandhi: मोठी बातमी : शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange : मराठयांवरती 100 टक्के अन्याय होणार, आता ताकदीनं उठाव करणारABP Majha Headlines : 03 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 26 June 2024 ABP MajhaTop 50 : टॉप 50 राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 26 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड घरात शिरला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड घरात शिरला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
Cheapest Flight Tickets : स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
Rahul Gandhi: मोठी बातमी : शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
Marathi Serial Updates Zee Marathi : 'लाखात एक दादा'ची ऑन एअरची वेळ ठरली,  झी मराठीवरील 'या' मालिकेचे काय होणार?
'लाखात एक दादा'ची ऑन एअरची वेळ ठरली, झी मराठीवरील 'या' मालिकेचे काय होणार?
Potential Benefits of Tea Free Diet : एक महिना चहा घेतलाच नाही, तर काय होईल? शरीरात कोणते बदल होऊ शकतात?
एक महिना चहा घेतलाच नाही, तर काय होईल? शरीरात कोणते बदल होऊ शकतात?
पराभवानंतर नवनीत राणा 23 दिवसांनी फडणवीसांना भेटल्या; भाजपातच राहणार, पराभवावर काय झाली चर्चा?
पराभवानंतर नवनीत राणा 23 दिवसांनी फडणवीसांना भेटल्या; भाजपातच राहणार, पराभवावर काय झाली चर्चा?
''उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन''; मतदान करताच उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं
''उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन''; मतदान करताच उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं
Embed widget