एक्स्प्लोर

Beed Viral Video : मोकाट रेड्यांचा भर चौकात धुडगूस, एकमेकांना भिडले; व्हिडीओ होतोय व्हायरल

Beed Viral Video : तब्बल एक तासाहून अधिक काळ चाललेल्या या टक्करीमुळे वाहतूक तर ठप्प झालीच पण बघ्यांचीही धांदल उडाली. 

बीड : मोकाट जनावर रस्त्यावर फिरताना अनेक वेळा पाहिले असतील. पण बीड शहरातील शाहूनगर भागात ऐन चौकात दोन रेड्यांची टक्कर जुंपली. तब्बल एक तास ही टक्कर सुरू होती त्यामुळे वाहतूक तर ठप्प झालीच, पण धावाधावा व पळापळीच्या हाकेने बघ्यांचीही धांदल उडाली. दोन्ही रेड्यांच्या पायाला दोर बांधून त्यांना दोन वेगवेगळ्या दिशेला नेले तेव्हा ही टक्कर थांबली.आज दुपारी घडलेल्या या प्रकारामुळे मोकाट जनावरांची दहशत उघड झाली. रेड्यांच्या टकरीत गाड्यांचे नुकसान झाले. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

या झुंजीदरम्यान शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस तेथे पोहोचले. एरवी भांडणात दोन्ही गटांना शांत करणारे पोलीस रेड्यांच्या टकरीत काहीच करु शकले नाहीत. दोन्ही रेड्यांचे आक्रमक रुप पाहून पोलिसांनी जमावाला मागे सरकरण्याचा सल्ला देत तेथून निघून जाणे पसंद केले.

बीड शहरातील बसस्थानकाच्या पाठीमागे ऐन चौकात खासगी व्यक्तींच्या मालकीचे दोन रेडे समोरासमोर आले. प्रत्यक्षदर्शीच्या मते त्यांनी एकमेकांकडे रोखून पाहिले व धावतच समोरासमोर आले. त्यानंतर एकमेकांना शिंगाने मारुन टक्कर सुरु झाली. दोन्ही रेड्यांची शिंगे एकमेकांत अडकल्याने त्यांच्या शरीराचा तोल जात होता. मात्र, हा तोल सांभाळत त्यांची झुंज सुरु होती. पाहता-पाहता ते अधिक आक्रमक झाले. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहने खोळंबली. भररस्त्यात त्यांची ही झुंज सुरु असल्याने बघ्यांची गर्दीही वाढली. कधी रस्त्याच्या या बाजूला तर कधी त्या बाजूला असा त्यांचा मुक्त 'धिंगाणा' सुरु होता. तब्बल अर्धा तास हा सगळा प्रकार सुरु होता. त्यामुळे पादचाऱ्यांसह दुचाकीस्वारांना रस्त्यात अडकून पडावे लागले.

रेड्यांच्या झुंजीदरम्यान धक्का लागून ओळीने उभ्या केलेल्या तीन दुचाकी पडल्या. त्यानंतर एक रेडा नालीत कोसळला. मात्र, त्याने वर येऊन समोरच्या रेड्यावर शिंगाने हल्ला केला. काही व्यापाऱ्यांनी भीतीने दुकाने बंद केली. दोन्ही रेड्यांना शिंगे लागल्याने ते जखमी झाले. काठीने मारुन, शेपटी पिरगळून रेड्यांवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न असफल झाल्याने अखेर दोन्ही रेड्यांच्या पायांना दोरीने बांधून त्यांना एकमेकांपासून वेगळे केले.

महत्त्वाच्या बातम्या : 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget