एक्स्प्लोर

अंबाजोगाई: अल्पवयीन मुलीवर क्रौर्याची परिसीमा; दारू पाजून पोलिसांनी केले अत्याचार

rape of minor in Beed अंबाजोगाई अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी नवीन धक्कादायक बाबी समोर येत आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी दारू पाजून अत्याचार केल्याचे पीडितेने सांगितले.

rape of minor victim beed अंबाजोगाईतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार  प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १० जणांना अटक केली आहे. यामध्ये अंबाजोगाई शहरात राहणाऱ्या एका महिलेला व ग्राहक शोधण्याचं काम करणाऱ्या निलंबित मुख्याध्यापकाला पोलिसांनी  अटक केली  आहे.  या दोन्ही आरोपींना अंबाजोगाईतील जिल्हा व सत्र न्यायालयाने 19 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या अल्पवयीन मुलीच्या बालविवाह संदर्भात आणि पोक्सो कायदा अंतर्गत आतापर्यंत 15 जणांची चौकशी करण्यात आली आहे. त्यातील 10 जणांना अटक अथवा ताब्यात घेतले आहे.

कौर्याची परिसीमा 

पीडित अल्पवयीन मुलीचे १३ व्या वर्षीच धारूर तालुक्यातील एका गावातल्या तरुणासोबत लग्न लावून देण्यात आले होते. या पीडितेचा पती धारूरला एका ढाब्यावर काम करायचा. आठवड्यातून दोन-तीन दिवस तो घरी येत असे काम करत नाही म्हणून मारहाण करायचा. पतीकडून होणाऱ्या छळामुळे वैतागून ती आपल्या माहेरी वडिलांकडे आली. मात्र जन्मदात्यानेच तिच्या अब्रूवर हात टाकला. या अत्याचाराविरोधात तिने थेट पोलीस ठाणे गाठले. पण, पोलिसांनी तक्रार नोंदवून न घेता कुटुंबाला तोंडी समज दिली. घरी गेल्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार का केली, असा जाब विचारत पीडितेला विस्तवाचे चटके देण्यात आले. त्यामुळे तिने घरातूनही पळ काढला. घरातून ती अंबाजोगाई शहरात आली. मात्र, तिथेही पीडितेच्या असहाय्यतेचा फायदा घेत अनेकांनी तिच्यावर अत्याचार केले.

जेवण देतो म्हणून अत्याचार केला

या पीडित अल्पवयीन मुलीने होणाऱ्या अत्याचाराला विरोध केल्यानंतर काहींना तिला जबर मारहाण केली. या पीडितेला दारू पाजणे, धुम्रपान करण्यास सांगणे आदी प्रकारही काही नराधमांनी केले. काहींनी तिच्याकडून वेश्याव्यवसाय ही करून घेतला असल्याची घटना समोर आली. अंबाजोगाई बस स्थानकात दोन मुलांनी जेवण देतो म्हणून तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार करून हे दोघे थांबले नाहीत. तर, या पीडितेबाबत अनेकांना यांनीच माहिती दिली. काही लोकांकडून पैसे घेऊन त्यांच्यासोबत तिला पाठवले जाऊ लागले. 

दोन पोलिसांनी केले अत्याचार

आपल्यावर ओढावलेल्या संकटाची माहिती या पीडितेने बालकल्याण समितीसमोर सांगितली आहे. अल्पवयीन मुलीवर दोन पोलिसांनी अत्याचार केला. एका पोलिसाने लॉजवर, तर दुसऱ्याने त्याच्या घरी नेऊन अत्याचार केला. या पीडितेला अत्याचार केलेल्या पोलिसांची नावे ठाऊक नाही. या दोन पोलिसापैकी एकानेच तिला अंबाजोगाईजवळच्या एका कला केंद्रावर सोडले. तिथे तिला नाचकाम करायला लावले. 

पोलिसांच्या तपासावर ताशेरे

दरम्यान, मंगळवारी या प्रकरणात अंबाजोगाई न्यायालयाने पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढले. या प्रकरणात आरोप झालेले पोलीस कर्मचारी अद्यापही तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना का सापडत नाहीत अशी विचारणा न्यायालयाने केली आहे. या पीडित मुलीने सुरुवातीला माहिती सांगितल्याप्रमाणे अंबाजोगाई पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. आणखी चार जणांना याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडितेने बालकल्याण समितीसमोर दिलेली माहिती अद्यापही पोलिसांसमोर येणे बाकी आहे. अशा प्रकारचा पुरवणी जबाब नोंद झाल्यानंतरच या संदर्भाने पुढील कारवाई होणार आहे. या प्रकरणी रोज नवीन गोष्टींचा खुलासा होत असून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Maharashtra News Live Updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
Maharashtra News Live Updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
Raj Thackeray in Nashik press conference: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Raj Thackeray in Nashik press conference: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mumbai Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
Bhandara Crime News: भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
Nagpur Crime: नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
Embed widget